तानाजी ...


गेल्या शुक्रवारपासून हे नाव सारखं कानावर पडतंय आणि विशेष म्हणजे मराठी माणसाचं हे नाव इतर भाषिकांकडूनही तितक्याच जोमानं घेतलं जातंय. कारण पण तसच "तान्हाजी द अनसंग वॉरिअर " हा अजय देवगण निर्मित चित्रपट सिनेमाच्या अनेक सीमा पार करून लोकांच्या हृदयावर राज्य करतोय.. दाक्षिणात्य चित्रपटांना जस डोक्यावर घेतलं जात तसंच काही मराठी माणसांसह देशाने तानाजी चित्रपटास घेतलं.

"गड आला पण सिंह गेला" इतिहासाला सुपरिचित असलेली हि कहाणी नरवीर तानाजी मालुसरेंची.. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातही सुर्वण पानातील एक देदीप्यमान पान म्हणजे तानाजी. पोटच्या पोराचं लग्न असताना छत्रपतींच्या इच्छेसाठी कोंडाणा लढवण्याचं चंग बांधणारा मर्द मावळा. "आधी लगीन कोंडाण्याच मग माझ्या रायबाचं" गर्जना करून शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा मुख्य शिलेदार "किल्ले कोंडाणा" स्वराज्यात आणला ते तानाजी मालुसरे.

तानाजी सिनेमात इतिहासाच्या आठवणींना उजाळा देताना तानाजी पात्रास अजय देवगणने पूर्ण दाद दिली आहे. सिनेमात सत्य परिस्थितीला थोडं मनोरंजनात्मक रूप देऊन इतिहासात नेण्याचा उत्तम प्रयत्न करण्यात आला. अगदी सुरवातीपासून सिनेमाचं प्रत्येक पात्र उत्तमरीत्या काम करताना दिसत. छत्रपतींच्या इतिहासातील सुवर्णक्षणांना थोड्या काल्पनिक गोष्टींची जोड देऊन त्यातील रहस्यता उत्कृष्टरित्या मांडलेली  दिसते आणि संवाद पण तितकेच तोडीस तोड अनुभवायला भेटतात.

मराठी कलाकारांनी आपली भूमिका साजेशी पार पाडली आहे. शरद केळकर सारख्या मराठी कलाकाराला पत्रकार परिषदेत "आप शिवाजीका रोल कर रहे हो" ह्या वाक्याला तेथेच कापत पत्रकाराला त्याची चूक तिथेच दाखवून "छत्रपती शिवाजी महाराज" म्हणायचं असं छातीठोकपणे सांगितलं. आपला हा अभिमानाचा इतिहास जर बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यावर येत असेल तर त्याला प्रतिसाद देणं आपलं कर्तव्य आहे.

आपल्या इतिहासावरील चित्रपट बॉलीवूडला भुरळ पाडत असतील तर त्याला दाद देणं हि आपली जबाबदारी आहे.. एकदा तानाजी नक्की बघा..

डॉ. प्रशांत शिरोडे..

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...