ठाणेकरांनो.. माणूसकीसाठी ..


आई आणि बाळाचं नातं काही वेगळंच असत. जगाच्या पाठीवर वावरताना अगदी पोटातील नाळेपासून ते रोजच्या जगण्यापर्यंत हे नातं निराळच असत. असंच, अविनाश जाधवांच फेसबुक अकाउंट बघत असताना एका आईची आणि बाळाची मनाला धक्का लावून जाणारी पोस्ट बघितली..

बाळाची तब्येत बरी नसल्यामुळे त्याला हॉस्पिटल ऍडमिट केलं होत. एक महिना झाल्यानंतर त्याच बिल साडेतीन लाखापर्यंत झालं होत. ते कुटुंब ७० हजारापर्यंत बिल भरू शकत होत, हॉस्पिटलने आईला आणि बाळाला पुढचे १८ दिवस फक्त बाळाला दूध पाजण्यापुरतं १५ मिनटं भेटू दिल. पैश्यांसाठी बाळाचे आईवडील टाटा, गोपाळ शेट्टी, शाहरुख खान, सलमान खान अश्या मदत करणाऱ्या लोकांच्या ऑफिसला गेले पण त्यांना कुठूनही मदत भेटली नाही. नंतर ३ दिवस हॉस्पिटलने आईला बाळाला भेटू देण्याचं बंद केलं.

आईबापांचा जीव कासावीस झाला आणि कुठूनही मदत मिळत नसताना ते मतदीसाठी अविनाश जाधवांकडे पोहचले. अविनाश जाधवांनी कुठलाही वेळ न घेता सरळ हॉस्पिटल गाठलं आणि बाळाला स्वतःच्या हाताने हॉस्पिटल बाहेर आणून आईवडिलांच्या हाती सोपवलं. त्या आईवडिलांना हे सगळं बघून काय करावं आणि काय नाही असं झालं. आनंदाच्या भरात भरल्याडोळ्यानी आईवडीलांनी अविनाश जाधवांचे पायच धरले आणि आपसूकच बोलले तुम्ही आमच्यासाठी देव आहात. विशेष म्हणजे हे कुटुंब उत्तर भारतीय होत. हे मुद्दामून नमूद करण्याचं कारण माणूसकीसाठी ते काहीही न बघता धावून गेले.

माणुसकीसाठी कशाची पर्वा न करणाऱ्या अविनाश जाधवांना जर ह्याबद्दल विचारलं तर त्यांचं मत असत "सामान्य माणसावर अमानुष अत्याचार होत असेल तर तो मला सहन होत नाही. मी हाथ जरी उचलला तरी तो सामन्यानवर उचलला नाही. जिथे चुकीचं तिथेच आम्ही टोकाची भूमिका घेतो, शेवटी आम्ही माणूसच आहोत आणि आमच्या इतकी माणुसकी कोणी दाखवणार नाही हेही तितकंच खरं आहे. मी आजपर्यंत हे सर्व निस्वार्थपणे केलं. मला हीच सेवा प्रतिनिधी म्हणून करायची आहे.."

ठाणेकरांनो, माणूसकीसाठी आणि आपल्या हक्काच्या माणसासाठी अविनाश जाधवांमागे उभं राहणं आपली जबाबदारीच आहे..

डॉ. प्रशांत शिरोडे.

ठाणेकरांनो ... फेरीवाला..


एल्फीस्टन स्टेशनच्या चेंगराचेंगरीनंतर अमानुष लोकांचे हकनाक बळी गेले. ह्या घटनेमागे अनेक कारण होती, आणि त्यातलं एक कारण म्हणजे फेरीवाला.. ह्याच्या विरोधात राज ठाकरे यांनी मोर्चा काढला आणि फेरीवाला मुक्त रेल्वे स्टेशन परिसरासाठी मनसे रस्त्यावर उतरली. रेल्वे अधिकारी, पोलीस आणि संघटना यांची मिलीभगत ह्या फेरीवाल्याना पाठीशी घालत होती. राज ठाकरेंच्या आव्हानाला साथ देताना ठाणे रेल्वे स्टेशन फेरीवालामुक्त करण्यासाठी जो माणूस अग्रेसर होता तो म्हणजे "अविनाश जाधव"..

मध्यरेल्वेवरच सर्वात जास्त वर्दळीच स्टेशन म्हणजे ठाणे स्टेशन. सुमारे ४००-४५० फेरीवाल्यांच्या साखळीने ठाणे स्टेशनला घेरलं होत. सामान्य प्रवाश्याला लोकल इतकाच स्टेशन परीसरात जीव मुठीत घेऊन चालावं लागत होत. फेरीवाल्यांची दडपशाही वाढली होती, कदाचित त्यांच्यावर प्रशासनाचा हप्त्यांच्या मायेने आशीर्वाद होता. प्रवाशांचे होणारे हाल कोणाला दिसत नव्हते. मुंबई ठाणेसह सर्व उपनगरात हि दयनीय अवस्था होती.

ऐन दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी अविनाश जाधव आपल्या कार्यकर्त्यांसोबत ठाणे स्टेशन परिसरात जाऊन फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाविरुद्ध उतरला. बघता बघता स्टेशन फेरीवालामुक्त होण्यास सुरवात झाली आणि ती २-३ महिने व्यवस्थित राहिली आणि नंतर पुन्हा तीच परिस्थिती दिसू लागल्यानंतर पुन्हा आंदोलन केल्यामुळे आजपर्यंत स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त आहे. भाऊबिजेसारख्या सणाच्या दिवशी जनसामान्यांच्या सोयीसाठी आंदोलन करून दिवाळीसारख्या सणाच्या दिवसात चार दिवस तुरंगात काढणारा व्यक्ती म्हणजे "अविनाश जाधव".

अविनाश जाधवांना विचारलं तर त्यांचं मत असत "सामान्य माणूस घरातून निघताना जीव मुठीत घेऊन निघतो आणि स्टेशन परिसरात फेरीवाल्यांच्या गराड्यात अडकतो. सामान्य माणसाला मोकळा श्वास घेता यावा. चेंगराचेंगरी सारखा प्रकार होऊ नये. स्टेशन स्वच्छ व सुंदर व्हावं हि त्यामागची भूमिका आहे. कोणाच्या पोटावर पाय ठेवणं आमची संस्कृती नाही, पण जनतेचं रक्षण करण हि आमची प्राथमिकता आहे".

मग ठाणेकर विचार काय करतायेत? आपलं मत मोकळ्या श्वासासाठी, आपलं मत फेरीवालामुक्त स्टेशन परिसरासाठी..

आपलं मत अविनाश जाधवांनाच...

डॉ. प्रशांत शिरोडे.

ठाणेकरांनो... पुरग्रस्तांच्या मदतीसाठी..



ऑगस्ट महिन्यात सांगली कोल्हापूर ह्या पश्चिम महाराष्ट्राच्या भागात पावसाने थैमान घातलं आणि अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढलं. झोपलेलं सरकार, नियोजनशून्य कारभार, श्रेयाच राजकारण ह्याशिवाय काहीही दिसलं नाही. देश स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना हा पूरग्रस्त भाग स्वतःच्या जीवाला ह्या संकटातून स्वातंत्र्य करत होता. अचानक आलेल्या ह्या नैसर्गिक आपत्तीत होत्याच नव्हतं झालं. निसर्गाचा विकोप बघवत नव्हता. माणसं जीव मुठीत घेऊन जगण्यासाठीची खटाटोप करीत होते. सगळं सगळं काही भयानक होत.

महाराष्ट्राच्या अनेक भागातून मदतीचा ओघ सुरु होता. कोणी खाण्याच्या वस्तू, कोणी औषध तर कोणी कपडे पाठवत होत. सगळीकडे पाणीच पाणी असताना मदत पोहोचवणं तसं अवघड काम होत. शौर्याची भूमी जणू संकटाची भूमी झाली आणि तिला अवघ्या महाराष्ट्राची आस लागली. दिवसा मागून दिवस जात होते पण पाऊस काही थांबत नव्हता.. अनेक मदती पोहचल्या पण प्रत्यक्षात जावून मदत करणारे अगदी थोडे होते आणि त्यात अग्रभागी एक नाव होत ते म्हणजे "अविनाश जाधव".

०९-१० ऑगस्टला ठाण्यात मदतीची हाक देवून हा ध्येयवेडा माणूस, मराठी माणसाच्या मदतीसाठी स्वतः हि मदत घेवून सांगलीत पोहचला. मदत करणाऱ्यांपैकी जास्त लोक शहरी भागात पोहचले पण अविनाश जाधव आपल्या टीमसह खेड्या गावात पोहचले. सांगली तालुक्यातही अमनापूर आणि ब्रह्मनाळ गावांना प्रत्यक्ष मदत केली. ब्रह्मनाळ गावात बोट उलटून १७ लोकांचा मृत्यू झाला तिथे भेट देवून त्यांचं सांत्वन केलं. अश्या परिस्थितीत रात्रंदिवस पाच दिवसापासून काम करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांचं मनोबल वाढवलं. त्यानंतर इचलकरंजी आणि मिरजमधील गावांमध्ये मदत करून. कोल्हापुर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील टाकोडा गावात जाऊन लोकांची मदत करताना मनस्थिती समजून घेतली. नुसती मनस्थिती नाहीतर तिथल्या घरांचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली आणि त्यासाठी अजूनही काम करताना हा माणूस धडपडताना दिसतोय.

ठाणेकरांनो, ठाण्याच्या बाहेर जाऊन मदत करणारा हा माणूस ठाण्यातील संकटात नेहमीच कामी येतो. ह्या विषयावर अविनाश जाधवांना प्रत्यक्ष विचारलं तर ते म्हणता "माझा मराठी माणूस संकटात मला बघवला जात नाही, माझा मराठी माणूस त्याच्या भूमीत हक्काने सुखी रहावा, मग ते नैसर्गिक संकट असो वा मनुष्यनिर्मित संकट असो. कोणीही नसेल तरी मी नक्कीच असेल..". संकटात सुखदुःखात मदतीला धावून येणाऱ्या अविनाश जाधवांना सरकारात पोहचवण्याची जबाबदारी तुमचीआमची..

मग विचार काय करता? आपलं मत संकटात धावून येणाऱ्या ध्येयवेड्या माणसासाठी... आपलं मत मराठी माणसाच्या संरक्षणकर्त्यासाठी..

डॉ. प्रशांत शिरोडे..

ठाणेकरांनो



ठाणे म्हणजे दहीहंडी सणासाठी ओळखलं जाणार शहर. स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या प्रेरणेने ह्या सणाचं महत्व द्विगुणित झालं. ह्याच सणाच्या निम्मिताने एक-दोन महिने सराव करून मराठी तरुण एकत्र येतात. मराठी माणसाला एकत्र आणणारा हा मराठमोळा सण.. मराठी तरुणांना ह्या सणाची एक वेगळीच आतुरता लागलेली असते..

मराठमोळ्या ह्याच सणावर काही वर्षांपूर्वी निर्बंध आणण्यात आले. सगळीकडे हा सण इतिहासजमा होण्याचं वातावरण झालं. सत्तेत असणारे अकार्यक्षम झाले होते. न्यायालयाने ह्या सणावर जाचक अटी लादल्या. मराठी तरुण हतबल झाला. मराठी सणाची आणि मराठी तरुणाची हि हतबलता एका महाराष्ट्र सैनिकाने हेरली तो म्हणजे "अविनाश जाधव" ..

न्यायालयाचा आदेश असताना, मनात न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करण्याची कुठलीही इच्छा नसताना, हा माणूस दहीहंडी मराठी सण साजरा करण्यासाठी मैदानात उतरला. "जय जवान" सारख्या जगप्रसिद्ध गोविंदा पथकाने अविनाश जाधवांच्या तळमळीला होकार दिला आणि मनसेच्या माध्यमातून सर्वात मोठी दहीहंडी मोठ्या आनंदाने साजरी केली. ह्या दहीहंडीसाठी स्वतःच्या अंगावर अविनाश जाधवांनी केसही घेतली. पण, ह्या माणसाने मराठी सणासाठी घेतलेला वसा मोठ्या उत्साहाने पुढे नेला..

अविनाश जाधवांना त्यांचं मत विचारलं तर ते म्हणता "माझा मराठी तरुण पब मध्ये जाऊन लाखो पैसे खर्च करून आनंद नाही घेऊ शकत. माझ्या लाखो मराठी तरुणाच्या एकतेसाठी आणि आनंदासाठी दहीहंडीची संस्कृती मी विकोपाला जाऊ देणार नाही. माझ्या मराठी माणसाच्या आनंदासाठी माझं जीवन समर्पित आहे. दहीहंडी सणासह सर्व मराठी सण अजून उत्साहाने साजरे होतील आणि मी त्यात अग्रभागी असेल..".

*ठाणेकरांनो, मग विचार काय करता..? आता, आपलं मत मराठी सणासाठी, मराठी संस्कृतीसाठी..आपलं मतं अविनाश जाधवांना..*

डॉ. प्रशांत शिरोडे.

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...