म माझ्या मराठीचा म ..*

*म माझ्या मराठीचा म ..*

जन्माला आल्यानंतर बाळ रडू लागत आणि त्याच्या ह्या रडण्याच्या सुरात "आ आ आ" असा सूर असतो. त्याच रडणं बघताना आईला आतुरता असते ती बाळाच्या त्या सुरात "इ" ह्या अक्षराची.. बाळ थोडा मोठा झाला कि एखाद्या दिवशी हसता हसता ते बाळ हाक देत "आई".. आणि त्या बाळाच्या आई ह्या भावुक सुरात आईचा आनंद जणू अनेक आनंदाच्या समुद्रापार गेलेला असतो.. आई हा पहिला मराठी शब्द मुखातून पडतो आणि हा माय मराठीचा मुखसहवास आई शब्दापासून ते मरेपर्यंत सोबत कायमस्वरूपी असतो.. म्हणूनच ह्या प्रेमळ सहवासामुळे म्हणावं लागतं "म माझ्या माय मराठीचा म ..".

मराठी भाषा आम्हा मराठी माणसाला लाभलेलं सर्वात पहिल वरदान. भाषा म्हणजे राष्ट्राला एकसंघटित  करणारा दुवा. भाषा म्हणजे भावनात्मक बांधिलकीचा वारसा. भाषा म्हणजे व्यक्तिगत जीवनाचा स्वाभिमान. भाषा म्हणजे हृदयाची हाक. भाषा म्हणजे जगण्याची कला. भाषा म्हणजे संस्कारांचा ठेवा. भाषा म्हणजे कलेचं प्रतीक. भाषा म्हणजे माणूसपणाचा अलंकार.

माझी मराठी भाषा म्हणजे ऐतिहासिक भाषा .. माझी मराठी भाषा हि चक्रधर स्वामी, जगदगुरु संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कुसुमाग्रज अशा अनेक महान व्यक्तींच्या मुखातून, लेखनातून मराठमोळ्या मराठी माणसापर्यंत वेळोवेळी हृद्यस्त झाली. मराठी भाषा हि जगाच्या पाठीवर मुख्यतः महाराष्ट्र ह्या शूरवीरांच्या भूमीत बोलली जाते. महाराष्ट्राबरोबर मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोवा ह्या राज्यांच्या काही भागात बोलली जाते. महाराष्ट्रातील माणसाची ओळख सुद्धा भाषेवर होते ती म्हणजे "मराठी माणूस". शिवरायांच्या स्वराज्याला सुद्धा भाषेच्या तत्वावर "मराठा साम्राज्य" म्हणून ओळखलं गेलं. राष्ट्रगीतात सुद्धा ह्याच एकमेव प्रांताचा उल्लेख भाषेच्या अनुषंगाने "मराठा" म्हणून गायला जातो. मराठी हि १३०० वर्षांपूर्वीची भाषा, साधारणतः ९ कोटी बोलणारे लोक, १६ स्वर आणि ३६ व्यंजन ५२ अक्षरांची लिपी, जगात १५ व्या स्थानावर आणि  देशात ४ थ्या स्थानावर. अतिशय सोज्वळ असणारी मराठी भाषा तेवढीच पुरातन सुद्धा आहे आणि हि पुरातन भाषा आज "अभिजात भाषेच्या" दर्जासाठी केंद्राच्या राजकारणात अडकून पडली आहे, हे ह्या हिंदुस्थानाच दुर्भाग्यच म्हणावं लागेल.

भाषेच्या साहित्यात सर्वश्रेष्ठ असलेल्या मराठी भाषेने अनेक साहित्यरत्न दिलीत. अनेक वर्षांपासून प्रत्येक वर्षी साहित्य संमेलन घडवणार साहित्य म्हणजे *"मराठी साहित्य संमेलन"*. महाराष्ट्रात नव्हे देशातल्या अनेक शहरात नव्हे तर आतंरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा मराठी साहित्य संमेलन झालीत हि गर्वाची आणि अभिमानाची बाब फक्त मराठी जणांना लाभली. ह्या अभिमानाची महाराष्ट्रातल्या सरकारंनी कालच विधासभेत राज्यपालांच्या अभिभाषवेळी लक्तर टांगली हि गोष्ट तितकीच शरमेची आणि कीव येण्यासारखी आहे.

आज जागतिक मराठी भाषा दिन कुसुमाग्रजांच्या म्हणजे वि. वा. शिरवाडकरांच्या जन्मदिनी साजरा केला जातोय हि मराठी जणांसाठी भाषेच्या उत्कर्षासाठी पर्वणीच आहे. चला तर ह्या शुभ दिनी काही इच्छा मनाशी बाळगूया, त्या म्हणजे *"महाराष्ट्रात कुठेही मराठीतच बोलूया, मराठी शाळांना वाचवूया, मराठी साहित्याला प्रेरित करूया, मराठी चित्रपटांचे नाटकाचे प्रेक्षक बनवूया, मराठी लढ्यासाठी लढणाऱ्या राजकारण्यांना साथ देऊया, एकसंग महाराष्ट्र टिकवूया, शिवरायांच्या मनातील स्वराज्य घडवूया.."*. जेव्हा ह्या सर्व इच्छा आपण पूर्णत्वाला नेवू तेव्हा नक्कीच म्हणावं लागेल..

*लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.. जात, धर्म, पंथ एक मानतो मराठी...*

जय हिंद, जय महाराष्ट्र..

डॉ. प्रशांत शिरोडे.

राज घ्या मानाचा मुजरा..

इतिहासाची भूमी असणाऱ्या हिंदुस्थानात अनेक इतिहासानच्या गाथा लिहल्या गेल्या. जगाच्या पाठीवर ह्या इतिहासाला विशेष महत्व दिल गेलं. हिमालयाच्या इतिहासाला सह्याद्रीच्या इतिहासाची नेहमीच भक्कम साथ भेटली. सह्याद्रीच्या इतिहासाला मराठ्यांच्या ठसठशीत ज्वलंत इतिहासाची ओळख भेटली. मराठ्यांच्या इतिहासाला छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या हृदयातील "स्वराज्य" हि नवसाम्राज्याची ओळख भेटली

अनेक इतिहास झालेत, अनेक इतिहास घडवले गेले, अनेक इतिहास लिहले गेले, मात्र ह्या सर्व इतिहासात स्वराज्य हा स्वतःचा  वाटणारा एकमेव इतिहास जगाच्या पाठीवर सुमारे ४०० वर्षानंतर सुद्धा त्याच भावनेनं जिवंत आहे. कारण इतर इतिहास राजसत्तेसाठी झालीत आणि स्वराज्य हे फक्त स्वतःच्या राजाश्रयासाठी झालं.  💪🏻

शिवरायांचं स्वराज्य म्हणजे जिथं मरण्यासाठी स्पर्धा व्हायची. स्वराज्य म्हणजे स्वतःच्या हितासाठी चालली राज्यव्यवस्था, स्वराज्य म्हणजे माणसाचा माणूसपण जिवंत असण्याची भावना, स्वराज्य म्हणजे एक योग्य न्यायासाठी चालणारी न्यायव्यवस्था, स्वराज्य म्हणजे स्वतःच्या हक्कासाठी व्यासपीठ, स्वराज्य म्हणजे पोटाची खळगी भरण्याचं अन्नछत्र, स्वराज्य म्हणजे जातीधर्माचा सलोखा, स्वराज्य म्हणजे जगण्याचा हक्क, स्वराज्य म्हणजे नीतीमूल्यांची खाण, स्वराज्य म्हणजे आईबहिणीचा आदर, स्वराज्य म्हणजे शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांच्या सन्मान, स्वराज्य म्हणजे जगण्याची उमेद.. हे सगळं स्वराज्यात फक्त जिजाऊंच्या शिकवणीमुळे आणि शिवरायांच्या राजाश्रयामुळे.

युद्धनीतीत रणांगणात सैनिक पुढे आणि राजा पालखीत मागे, हा सर्व राजशाहीचा नियमच पण स्वराज्यात स्वतः राजे पुढे आणि मावळे मागे हा खरा शौर्याचा नियम म्हणजे शिवराय. गनिमीकावा हा युद्धनीतीचा नवा अध्याय राज्यव्यवस्तेला बहाल करणारे शिवराय. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांना साहसाचा इतिहास आणि स्वाभिमाचा सहवास देणारे शिवराय. सह्याद्रीच्या बाहूंना पराक्रमाचा, संघर्षाचा आणि समृद्धीचं बळ देणारे शिवराय. जनतेच्या मनातलं स्वराज्य निर्माण करणारे शिवराय. पराक्रमाची यशोगाथा रचणारे शिवराय. दिल्लीच्या परकीय शक्तीला झुकवणारे शिवराय, आम्हा मराठीजनांचा आणि तमाम हिंदुस्थानी जनतेचा अभिमान म्हणजे शिवराय.. 👏🏻

छत्रपती शिवरायांच्या जन्मदिनी मनातील भावनेचा आणि भावनेतील शब्दांचा "स्पर्श" ह्या लेखन श्रुंखलेला (मराठी ब्लॉग) जनमाणसापर्यंत  पोहचवण्याचा ध्यास हाच मानाचा मुजरा.. राज घ्या मानाचा मुजरा..

 डॉ. प्रशांत शिरोडे.😌

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...