जाग येऊ दे मायबापा ..


शेतकरी रस्त्यावर स्वतःच्या मागण्यासाठी खूप कमी वेळा उतरतो, कारण त्याला अन्याय सोसायची सवयच झाली आहे. शेतकरी राजा मागील वर्षी संपावर गेला तेव्हाच त्याच्या सहनशीलतेचा अंत झाला होता. पण सरकारने आश्वसनाची यादीच समोर ठेवून बळीराजाला सोयीस्कररीत्या माघार घेण्यास भाग पाडलं होत. आज पुन्हा एकदा १८० किलोमीटर चालून, मुंबईला वातानुकूलित खोलीत बसलेल्या सरकारला दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेचा जाब विचारण्यासाठी शेतकरी राजा विधानभवनाला धडकलाय. अनवाणी पायानं इतकी मोठी पायपीट करून मुंबई गाठताना त्याच्या मनात नक्कीच दोनवेळच्या पोटापाण्याचा, मुलाबाळांच्या शिक्षणाचा आणि मुलीच्या लग्नाचा प्रश्न तर असेलच ना?

काल रात्रीपासून प्रसारमाध्यमात बातमी फिरतेय कि मुंबईतल्या दहावी बारावीच्या विद्यार्थाना परीक्षा स्थळावर पोहचण्यास अडथळा येवू नये म्हणून शेतकरी बांधवानी रात्रीचा विश्रांतीचा मुक्काम न करता, दिवसभराच्या प्रवासानंतर रात्री चालून मुंबई गाठली. स्वतःच्या जीवावर नेहमीच ओढून घेणारा बळीराजा एका रात्रीच चालण्याचं संकट मुंबईकरांच्या मुलांच्या परीक्षेसाठी स्वतःवर घेऊन चालत गेला, म्हणजे त्याच्या समजुदारपणाची पावतीच देऊन गेला. शेतकऱ्याच्या मुलांची पण काळजी घेणार कोणी वाली हवं म्हणून तो दुसऱ्याच्या मुलाला त्रास न होऊ देता स्वतः चालत गेला हे त्याच मोठेपण म्हणणं किंवा दिलदारपणा म्हणल तरी वावगं ठरणार नाही. शेतकऱ्यांच्या मुलांची आपल्याला पण थोडी काळजी वाटायला हवी म्हणून आदोलनाला समर्थन करायला जमत नसेल तर टीका तरी करू नका म्हणजे त्याच मनोबल तरी वाढेल.

सरकारने कर्जमाफी जाहीर करून सहा महिने झाले, अनेक अटीनुसार झालेली कर्जमाफी अजून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहचली सुद्द्धा नाही. स्वामिनाथन आयोग फक्त निवडणुकीपुरता समोर आणला जातो आणि नंतर त्यावर भाष्य सुद्धा केले जात नाही. सरकारला विजय माल्या, निरव मोदींसारखे बुडवणारे चालतात पण सामान्य मायबाप शेतकऱ्याचं कर्ज चालत नाही. जगाचा पोशिंदाच उपाशी राहत असण्याइतकी वाईट गोष्ट ह्या भूतलावावर राहूच शकत नाही. शहरात राहून उगाच शेतकऱ्यावर टीका करणार्यानी विचार करा, जर त्याने पिकवल नाही तर तुमचं किती दिवस चालणार? काल मिळणारी कीटकनाशकांची १०० रुपयांची बाटली आता ५०० रुपयाला झाली पण शेतकऱ्याच्या मालाला तेव्हा मिळणारा ५०० रुपये भाव आज पण ५०० च आहे. विचार करा कधी नोकरदाराला आपल्या पगारात वाढ नाही झाली तर कसं वाटत? उद्योगधंदा करणाऱ्याला नफा नाही भेटला तर कसं वाटत? सरकार विचार करत नसेल तर त्याच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन त्याच मनोबल वाढवण्याचं छोटंसं काम तरी करा.

मागच्या वर्षी आपल्या शेतकरी बापाने आत्महत्या करू नये म्हणून एका मुलीने सरकारला विनंती केली होती कि "आमच्या लग्नापुरता तरी आमचा बाप जिवंत राहू देण्याचं उपकार मायबाप सरकार आमच्यावर करा". मायबाप सरकार तुम्हाला जरी आम्ही निवडून दिलंय तरी आता मायबाप म्हणून संवदेनशील होऊन बळीराजाची आश्वासन न देता प्रत्क्षात मदत करा हीच विनंती. जाग येऊ दे मायबापा. आमचा बाप टिकला तर काळीआई टिकेल आणि काळीआई टिकली तर सामन्याचा पोटाचा प्रश्न सुटेल.

जय हिंद .. जय महाराष्ट्र ..

डॉ. प्रशांत शिरोडे.

छावा शिवरायांचा...


जन्मापासून मरेपरेपर्यंत अनेक संकटाना जवळ करत पराक्रमाची यशोगाथा भूतलावावर गाजवणारा पराक्रमी, बुद्धिमान, महायोद्धा, स्वराज्य संवर्धक, धर्माभिमानी राजा म्हणजेच शिवपुत्र संभाजी राजे..

शंभूराजे जन्माला आले तेव्हा छत्रपती शिवरायांना आनंदाची बातमी कानावर पडली कि युवराज जन्माला आले पण ते पालथे जन्माला आले. हि बातमी म्हंटल तसं शुभबरोबर अशुभ, पण त्यावर शिवराय तितक्याच आनंदाने म्हणाले "हो युवराज पालथे जन्मले ते स्वराज्य संकटाना पालथे करण्यासाठीच". जन्मावेळी शिवाजी महाराजांच्या ह्या आनंद उदगाराला प्रत्यक्षात सार्थ ठरवणारा राजा म्हणजे संभाजी महाराज. जिजाऊंनी आपल्या मोठ्या पुत्राच्या स्मृतिना आठवणीत ठेवण्यासाठी शिवपुत्राचं नाव संभाजी राजे ठेवलं होत. संभाजी राजांना जन्माच्या दोन वर्षांनंतर जन्मदाती आई सोडून गेल्याच दुःख जिजाऊंनी भरून काढलं. जिजाऊनच्या शिकवणीत स्वराज्याच दुसरं राजाश्रय घडवलं, वाढवलं आणि स्वराज्यासाठी उभं केलं.

वयाच्या ९ व्या वर्षी स्वराज्यासाठी मोगलांच्या तहात राजा जयसिंगाच्या अटीवर औरंगजेबाची मनसबदार आनंदाने घेणारा संभाजी राजा. वयाच्या १३ व्या वर्षी सुरतेवर चाल करून सुरत लुटणारा शिवाजी महाराजांचा पराक्रमी संभाजी राजा. वयाच्या १४ व्या वर्षी बुधभुषणम नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिणारे शास्र पंडित संभाजी राजे. संस्कृत, ऊर्दू, इंग्रजी सह १४ भाषणावर प्रभाव असणारे संभाजी राजे. अतिशय सुरेख नियोजनाने छत्रपती शिवरायांना आग्र्याच्या बंदीतून सोडवणारे शंभूराजे.. आग्र्याच्या भेटीत औरंगजेबाने कुस्तीसाठी आमंत्रित केल्यावर औरंगजेबाला उभ्या दरबारात बोलणारा "आमच्या लायकीचा कुस्तीगीर तुमच्या दरबारात नसल्याचं ठणकावून सांगणारे" पराक्रमी संभाजी राजे. वयाच्या १७ व्या वर्षी स्वराज्याचे पहिले युवराज म्हणून सन्मानित होऊन शिवरायांच्या राज्यकारभाराला सन्मानित करणारे राजकारणी संभाजी राजे. औरंगजेबाने कंटाळून आपला राजसन्मान मुकुट काढून, जो पर्यंत संभाजीला अटक करणार नाही तो पर्यंत राजमुकुट घालणार नाही अशी प्रतिज्ञा ज्यासाठी घेतली तो शौर्यपुरुष म्हणजे संभाजी राजे. स्वराज्य जिंकण्यासाठी स्वतः औरंगजेबाला दखनात येण्यास भाग पाडून त्याच स्वराज जिंकण्याचा स्वप्न अपूर्ण ठेवणारे संभाजी राजे. औरंगजेब, आदिलशाह, निजामशाह ह्या सर्व राजशायाना सळो कि पळो करणारा महापराक्रमी शंभू राजा. जगाच्या पाठीवर एक हि लढाई न हरणारा शौर्यपुरुष म्हणजे शिवपुत्र संभाजी महाराज.

स्वतःच्या स्वराज्यात आप्तस्वकीयांकडून वाईट वागणूक भेटल्यावर त्यावर मात करून स्वराज्य रक्षक झालेले संभाजी राजे. तत्कालीन दृष्ट राजकारणामुळे वडिलांच्या अंत्यसंस्कारास मुकणारे, रायगडावर दाखल झाल्यावर पुन्हा महाराजांचे अंत्यसंस्कार विधी पूर्ण करून घेणारे संभाजी राजे. स्वतःच्या नातलगांकडून फसवणूक होऊन औरंगजेबाच्या जाळ्यात अडकवलं गेल्या नंतर मरण यातना भोगताना अंगाची कातडी, हाताची नख, कान, डोळे, जीभ असे एक एक अवयव कित्येक दिवस काढत असताना औरंगजेबाची धर्मांतराची मागणी मरेपर्यंत न स्वीकारणारा धर्माभिमानी संभाजी राजा. म्हणूनच म्हंटल जात "जगावं तर शिवासारखं आणि मरावं तर संभासारखं".

जन्मापासून मरेपर्यंत संकटाना हरवणारा महान योद्धा औरंगजेबाच्या अनेक मरण यातना स्वीकारत शिवरायांच्या स्वराज्य स्वाभिमान शिकवणुकीला सार्थ ठरवून ११ मार्च १६८९ रोजी मरणाला आनंदाने जवळ करणाऱ्या युगपुरुष संभाजी महाराजांना स्मृतीदिनी मानाचा मुजरा..

जय हिंद.. जय महाराष्ट्र...

डॉ. प्रशांत शिरोडे.

स्त्री जन्मा तुझी कहाणी...



घरात मुलगी जन्माला आली कि सर्वात जास्त आनंद होतो तो बापाला आणि ह्या आनंदात बाप आपल्या अश्रुना अलगद वाट मोकळी करून देतो. जन्मानंतर लेक अंगाखांद्यावर खेळता खेळता केव्हा चालू लागते, केव्हा बोलू लागते, केव्हा पळू लागते आणि केव्हा मोठी होते ते बापाला कळत सुद्धा नाही. मुलीच्या जन्मापासून ते तिच्या लग्नापर्यंत, पोटाची खळगी भरून बाप आपल्या कमाईतला हिस्सा लेकीच्या लग्नासाठी बाजूला काढून ठेवतो. मुलीचं लग्न इच्छेसारखं करण्याचा प्रयत्न करून तो डोळ्याचं पारणं फेडतो. मुलगी जन्माला आल्यावर आनंदाश्रूना वाट मोकळी करणारा बाप, आपलं धन दुसऱ्याला देताना डोळ्यातल्या आसवांना आनंदातून दुःखाकडे घेऊन जाताना रोजच्या प्रेमासाठी कासावीस होतो... आईनंतर बापाची काळजी घेणारी व्यक्ती म्हणजे मुलगी. कारण मुलीची आई बापावर असलेली माया, तिची काळजी आणि तीच प्रेम हे काही वेगळच असत. हे फक्त मुलगी आणि मुलगीच करू शकते.

मुलगी ते स्त्री हा प्रवास तसा खूप वळणावळणाचा, जितका आनंदाचा तितका संकटांचा.. आनंद हा बालपणापासून ते शालेय जीवनापर्यंत छान चालेला असतो. शालेय जीवनानंतर तो काहीप्रमाणात सामाजिक आणि कौटुंबिक बंधनांमध्ये अडकतो. स्त्रीचा रोजच्या जीवनातला प्रवास तसा पुरुषप्रधान संस्कृतीला भेदून स्वतःला सिद्ध करण्याचा असतो. स्त्री मुळातच सोज्वळ आणि प्रेमळ स्वभावाची असते पण अन्याय विरुद्ध लढली तर रणरागिणीसारखी असते..

आपण नेहमी ऐकत असतो स्त्रीचा सन्मान व्हायला हवा, स्त्रीला चांगली वागणूक भेटायला हवी, स्त्रीला समजून घेतलं पाहिजे, स्त्रीला पुरुषांइतके अधिकार भेटले पाहिजे, स्त्रीला प्रत्येक क्षेत्रात अस्तित्व निर्माण करता यावं.. पण आपण कधी विचार केला का आपलं यात योगदान किती? स्त्रीच स्त्रीसाठी योगदान किती? घरातून विचार केला तर बाहेर सुद्धा वागणूक चांगली का भेटणार नाही? आम्ही मुलीला जीव लावतो तितका सुनेला लावतो का? बहिणीचा सन्मान करतो तितका बायकोचा करतो का? घरात होणारा स्त्रीसन्मान बाहेर होतो का? प्रश्न तसे रोजच्या जीवनातले पण आम्ही कधी मनापासून विचारात घेतले का?

दुसरी बाजू बघितली तर, अलीकडच्या काळात काहीप्रमाणात स्त्री स्वतःच्या अस्तित्वाच्या नादात सामाजिक बांधिलकी विसरून जाताना दिसतेय. ज्याचं रूपांतर घटस्फोट सारख्या विचित्र चालीरितींमध्ये होत. स्त्रीने अस्तित्व नक्की टिकवावं पण संस्कृतीच्या चौकटीत राहील तर स्त्री सन्मान झाल्याशिवाय राहणार नाही.

असो, प्रत्येकाला आई हवी, बहीण हवी, बायको हवी, मग मुलगी का नको? ह्यात स्त्रीचा वाटा तितकाच असतो. स्त्रीच्या जन्माला जर स्त्रीचीच साथ नसेल तर आपसूकच म्हणावं लागेल स्त्री जन्मा तूझी कहाणी...

महीला दिनाच्या शुभेच्छा ..

डॉ. प्रशांत शिरोडे .

शिवजन्मोत्सव


जगाच्या पाठीवर सुमारे चारशे वर्षानंतर कुण्या राजाची जयंती साजरी होत असेल तर तो एकमेव राजा म्हणजे "छत्रपती शिवाजी महाराज"..

सकाळी उठल्यावर सगळीकडे भगवमय वातावरण बघताना, मनाशी कुठंतरी प्रश्न पडल्यासारखं वाटतंय कि शिवजयंती मागच्याच महिन्यात झाली आणि मग आज पुन्हा कशी? प्रश्न तसा स्वाभाविक आणि गंभीर सुद्धा तितकाच आहे. शिवरायांची जयंती दोन वेळा का साजरी होते? जयंती तारखेला का तिथीला? महाराज महापुरुष का दैवपुरुष? शिवजयंती नक्की कधी सुरु झाली? शिवजयंती कोणी सुरु केली? लोकमान्य टिळकांनी कि महात्मा फुलेंनी? महान शिवचरित्राला हि द्विमनस्थिती मान्य असेल का?

अनेक प्रश्नांच्या श्रुंखलेनंतर मनाला प्रश्न पडतो कि ज्या राजांच्या आदर्शाला जगाने डोक्यावर घेतल आणि आज ४०० वर्षानंतर सुद्धा महाराजांवर तितकंच प्रेम करत असताना मग दोन वेळा जयंती का? अनेक संशोधनानंतर अनेक न्यायालयीन संभाषणानंतर हा प्रश्न मार्गी लागत नाही. महाराज एक महान आणि पराक्रमी व्यक्ती. महाराजांचे समकालीन राष्ट्रायोध्ये गुरुनानकांना धर्मगुरू किंवा दैवपुरुष म्हणून संबोधले जात, मग शिवाजी महाराज का नाही?दुसरीकडे राष्ट्रपुरुष म्हंटल तर महाराजांसारखा दुसरा कोणीच नाही. आजकालच्या राष्ट्रपुरूषात महाराजांचा एखादा गुण असतो आणि आम्ही त्यांना महाराजांच्या पंगतीत आणून बसवतो. मग प्रश्न तोच राष्ट्रपुरुष कि दैवपुरुष? कारण ह्यावरच तारीख का तिथी? जयंती का सण?

महाराजांची जयंती हि मुळतः त्यांच्या विचारांच्या सन्मानासाठी आणि ते आत्मसात करण्यासाठी, महाराजांची जयंती राष्ट्रऐक्यसाठी आणि मानवाच्या कल्याणासाठी, महाराजांची जयंती मानवी सलोख्यासाठी आणि मनुष्य प्रेमासाठी, महाराजांची जयंती आदर्शाच्या ठेव्यासाठी आणि नीतीमूल्यांच्या वाढीसाठी, महाराजांची जयंती स्त्री संरक्षणासाठी आणि स्त्रीशक्तीच्या उत्कर्षासाठी, महाराजांची जयंती सर्वधर्म समभावासाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी, महाराजांची जयंती आदर्श घेण्यासाठी आणि त्या आदर्शांना पुढे नेण्यासाठी..

तिथी आणि तारीख सोडून ३६५ दिवस शिवजयंती साजरी करूया आणि महाराजांच्या आदर्शांना पुढे नेवून राष्ट्रहितासाठी योगदान देऊया ह्याच शिवजयंतीच्या शुभेच्छा...

जय हिंद. जय महाराष्ट्र...

डॉ. प्रशांत शिरोडे...

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...