मी महाराष्ट्र बोलतोय..



वेगळं वाटलं ना थोडं.. असंच सगळ्या देशाला आणि माझ्या मराठी माणसाला पण वेगळं वाटतंय. त्याच कारण पण तेच सत्तेसाठी भुकेले माझ्या भूमीतले राजकारणी. राजकारणाची पूर्ण गरिमा संपवून टाकली.. मी सगळ्या देशाला राजकारण शिकवलं आणि आज माझ्याच शिकवणीवर बोट ठेवला गेला...

एक महिना झाला मी माझ्या प्रदेशाचा मालक होण्याची वाट बघतोय आणि त्या मुख्य पदाला गलिच्छ राजकारणाने काळिमा फासली. विशेष म्हणजे दिल्लीच्या हुकूमशहांना माझ्यावर हुकूमुत गाजवताना बघून मला खूप दुःख झाल, ज्यांनी राजकारणाचे धडे माझ्याकडून घेतले आणि तेच आता माझं राजकारण करतायेत. आज इतकी मत माझ्याकडे उद्या तितकी मत त्याच्याकडे, आम्ही इतके फोडले त्यांनी तितके पळवले, हे सर्व बघून तर मला चीड येत होती.

शब्दाला जगणारा माझा मराठी माणूस आज दिल्लीशाहीपुढे शब्दाला बदलला आणि युती आघाडीचं राजकारण जणू मुंबईच्या समुद्रात वाहून गेल्याच वाटलं आणि काहीतरी वेगळंच वाटलं. जे घडलं ते चांगल्यासाठीच घडलं असेल असच म्हणावं लागेल, कारण ह्या सत्तेच्या खेळात राष्ट्रपती राजवट एका रात्रीत हटवून राज्यपाल भल्या पहाटे शपथविधी हि आटपून घेतात. ह्या लपवाछपवी आणि घाणरेड्या राजकारणात माझ्या अब्रूची लख्तरे टांगल्याची मला खूप जाणीव झाली. मला माझ्यातला स्वाभिमान माझ्याच लोकांकडून विकला गेल्याची मोठी जाणीव झाली. लढणारा महाराष्ट्र, लपणारा महाराष्ट्र अशी माझी चर्चा माझ्या मनाला बोचत राहिली.

मला चिंता पडली माझ्या सामान्य मतदारांची कि पुढच्या वेळेस ते मतदानासाठी कितीपत उत्सुक असतील? तो तर माझ्या मनाला मोठा प्रश्नच आहे. नवीन सरकारने माझी गरिमा सांभाळुन माझ्या मराठी माणसाची आणि खास करून शेतकऱ्याची काळजी घ्यावी हीच इच्छा... आणि "जय महाराष्ट्र" ह्या भावनेतील स्वाभिमान टिकवाल हीच सदीच्छा...

डॉ. प्रशांत शिरोडे..

सत्ता ...


सकाळी झोपेतून उठल्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पाहून अनेकांची थोडी राहिलेली झोपच उडाली. झोप उडण्याच कारण म्हणजे रात्रीपर्यंत सत्तेची गणित जुळत असताना आज वेगळाच काहीतरी घडताना महाराष्ट्राला दिसतंय.

युती आणि आघाडी निवडणूकीपुरता होत, राजकीय पक्षांची खरी भूक हि सत्ता होती. सर्व एकाच गोष्टीसाठी धडपडत होते ती म्हणजे सत्ता. मग पक्षनिष्ठा, शब्दनिष्ठा हे सर्व काळाच्या ओघात संपण्यात जमा झालं. सत्ता एकच निष्ठा बाकी दुसरं काहीही नाही, हेच आताच्या राजकारणाचं फलित आहे. महाराष्ट्राचं राजकारण नेहमी महाराष्ट्रात राहील पण आताच्या राजकारणाला दिल्लीची काळी नजर लागली असं दिसून  येत. स्वाभिमान, अभिमान जणू मानपणाच्या गर्दीत हरवून गेलेत..

प्रत्येक पक्ष सत्तेचा भुकेला असताना सतेची गणित हि सत्यासाठी नाही तर स्वार्थासाठी आहेत हे म्हणणं तितकच योग्य ठरू शकत. महाराष्ट्राने ह्या एक महिन्यात अनेक समीकरणे बघितली, राष्ट्रपती लागवट पण बघितली आणि राहिलेलं अवेळी मुख्यमंत्रीपदाची शपथ हि बघितली. विशेष म्हणजे इतक्या सकाळी सरकारी काम आणि त्यात राज्यपालांकडे जाऊन शपथविधीही होणं आणि राष्ट्रपती राजवट पण मागे घेणं, हे सर्व काहीतरी अघटित झाल्यासारखं होत. कदाचित राज्यपालही ह्या घडामोडींचे प्यादे असतील, पण ते नसावेत म्हणजे लोकशाहीला काहीतरी अनुसरून झाल्यासारखं असेल.

अजून महाराष्ट्राला काय बघायला भेटत ते बघावच लागेल. कदाचित महाराष्ट्राला याची आतुरता न राहता महाराष्ट्राला ह्या राजकारणाची चीड येऊ शकते. राजकारणाचं काय होत ते होतच राहील पण ह्यातून खरंच शिकण्यासारखं आहे, ते म्हणजे सत्तेसाठी होणार राजकारण आपापसातले संबंध न बिघडवता ह्या गोष्टींना हलकंफुलकं घेणंच महत्वाचं आहे...

आता प्रतीक्षा महाराष्ट्राच्या नव्या राजकारणाची..

डॉ. प्रशांत शिरोडे..

सूत्र...



सूत्रांच्या माहितीनुसार किंवा विश्वसनीय सूत्रांनुसार किंवा खात्रीलायक सूत्रानुसार हे शब्द इलेक्ट्रॉनिक मीडियावर नेहमी ऐकू येतात, पण सध्याच महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तर ह्या सूत्रांनी राजकीय पक्षांपेक्षा जास्त काम केलेलं दिसत.

सूत्रांनी विश्वसनीय आणि खात्रीलायक होताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच नव्हे तर मंत्रिमंडळच बनवून टाकलं. युती आणि आघाडी पेक्षा सुंत्राचीच माहिती जास्त येत होती, ती इतकी कि नवीन होणारी आघाडी जणू सुत्रानीच घडवून आणली काय? असा प्रश्न सामन्यांना पडू लागला. नवीन होणाऱ्या आघाडीला सूत्रांनीच महाशिवआघाडी आणि नंतर महाविकासआघाडी नाव देऊन टाकलं. सूत्रांनी संभाव्य मंत्रिमंडळ बनवलं, सूत्रांनी अनेक फार्मुले बनवली.. खरंच ह्या सूत्रांच कुतुहूलच..

ह्या सूत्रांनी बाकी कमालच केली, बंददरवाजाआडच्या बैठकीतले विषय सुध्दा सूत्रांनी आम जनतेसमोर आणलीत. सूत्रांनी तर नेत्यांच्या मनातल्या गोष्टीसुध्दा ओळखून सांगून टाकल्या. सरकार स्थापण्यासाठी पाठिंब्याचं पत्र प्रत्यक्षात अजून भेटलं नाही पण खात्रीलायक सूत्रांनी ते पोहचल्याच सांगूनही टाकलं. सूत्रांनी अनेकांच्या भेटीगाठीही परस्पर घडवून आणल्या आणि त्या भेटीगाठीनमधले निर्णयही सांगून टाकले.

नक्की हे सूत्र कोण असतील? हा प्रश्न जणू सगळ्यांनाच पडला असेल.. कदाचित हा प्रश्न महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल? ह्या प्रश्नापेक्षा जास्त महत्वाचा झाला आहे. हि सूत्र म्हणजे त्या पक्षातील कोणी व्यक्ती असतील किंवा त्या ठिकाणी काम करणारे नौकर किंवा पत्रकारांच्या मनातलाच असू शकतो. जो असेल तो पण सूत्रांनी काम मात्र अगदी जोमानं केलं, क्षणभरासाठी सामान्यांच्या मनातील प्रश्नांना उत्तर देवून तात्विक समाधान करून टाकलं.

आता प्रतीक्षा सरकार बनण्याची आणि खात्रीलायक सूत्रांची माहिती विश्वसनीय होण्याची...

डॉ. प्रशांत शिरोडे..

खेळ मांडला...



महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हाच विषय सत्तेसाठी महत्वाचा ठरला.. निवडणुकीच्या आधी नेत्याची पक्षनिष्ठा खुंटीला टांगलेली बघितलेली असताना आता पक्षाचीच निष्ठा खुंटीला टांगलेली महाराष्ट्राने बघितली. एकंदर निष्ठा, प्रतिष्ठां ह्या राजकारणातील गोष्टी इतिहास जमा झाल्यासारखं दिसतंय..

युती आणि आघाडी जणू राजकीय परिस्थिती पाहून जुळवाजुळव करतायेत.. वैचारिक मतभेद असतील तर राजकीय मत एक होताना दिसतायेत. सत्ता केंद्रस्थानी असं महत्वाचं आहे आणि ते असावं कारण सत्तेचा उपयोग जसा होतो तसा दुरुपयोगही करता येतो हे मागील सरकारने राज्यात करून दाखवलं. सत्तेतून सामन्याचे प्रश्न सोडवण्यापेक्षा राजकारणातील चढाओढ कशी करता येईल ह्याकडे आवर्जून लक्ष दिल गेलं.

पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला शोभेसा निकाल महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत लागला. महाराष्ट्र जणू आता आमची मक्तेदारी आहे आणि आम्ही म्हणू तेच होईल अश्या दुनियेत असणाऱ्या लोकांना महाराष्ट्राने सत्तेच्या गणितापासून दूर ठेवलं. सत्तेचं गणित अपुरं पडत असताना सुद्धा आम्ही म्हणू तेच ह्या अविर्भावात असल्यामुळे सत्तेची चावी मागील सत्ताधाऱ्यांच्या हातून जाताना दिसतेय. मित्रपक्षाला ठरवलेली पद देण्यापेक्षा विरोधात बसणं महत्वाचं मानलं गेलं. ह्यातून प्रादेशिक पक्षांना कमी लेखण्याशिवाय दुसरी कोणतीही भावना दिसत नाही.

राज्यातला शेतकरी अवकाळी पावसाने होरपळला आहे पण ह्याची जाण राजकीय पक्षांना नाही कारण त्यांचा सत्तेचा खेळ काही संपताना दिसत नाही. राज्याच्या विस्कटलेल्या घडीला बसवण्यासाठी आता सरकारची गरज आहे. राष्ट्रपती लागवट राज्याला न परवडणारी आहे. सत्तेचं गणित जुळवताना राज्याने चांगले धडे दिले जेणेकरून कोणी राज्याला आपली मक्तेदारी समजणार नाही. ज्या राज्याने अनेक चांगली सरकार बघितली, आज तेच राज्य सत्तेसाठी, सरकारसाठी आस लावून बसलंय.

जी सत्ता नीती बिघडवताना दिसतेय, तीच सत्ता चांगल्या नीतीने राज्याच्या विकासाला गती देवो ह्याच सदभावना..

डॉ. प्रशांत शिरोडे..

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...