आजही रायगड बोलतो..



छत्रपती शिवाजी महाराज.. मराठी माणसाच्या जीवनघडणीचा अविभाज्य संस्कार.. पावणे चारशे वर्षांनंतर त्याच सन्मानानं मराठी मनावर अविरत राज्य करणार दैदिप्यमान व्यक्तिमत्व.. महापुरुष, महानायक, महाविचारी, महापराक्रमी राजा.. कितीही विश्लेषण केलं तरी कमीच.

रायगडावर आजही गेलं तरी वाटत महाराज कसे असतील? रायगडावर कुठे बसत असतील? रायगडावरच्या पाऊलखुणा त्याच्याच आठवणींचा उजाळा देत असतात. राजदरबार, होळीचौक, बाजार, जगदीश्वराचं मंदिर, टकमक टोक, महाराजांची समाधी.. सर्व जणू आपल्याशी बोलतात. हाच तो पावन दुर्ग, ज्याने महाराजांचं उभं स्वराज्य बघितलं, वाढवलं आणि घडवलं..

रायगडावर जगदीश्वराच्या मंदिरात दहा मिनिट आजही शांत बसलं तर परमेश्वराचं वास्तव्य जाणवत. राजदरबारात आजही कुठूनही बोललं तर तो आवाज सिहासनापर्यंत पोहचतो. जणू तो दरबार महाराज असल्याची जाणीव करून देतो. हिरकणीच्या बुरुजावर बघितलं तर त्या आईच्या गौरवाची शाबासकी महाराज देताना दिसल्याची जाणीव होते.. पाचाडातील जिजाऊंच्या स्मारकांकडे बघितलं तर शिवाजी महाराज जिजाऊंच नित्यनियमाचं दर्शन घेताना दिसतात. संभाजी महाराजांचं राणीमहालातील वावरणं हि डोळ्यांसमोर उभं राहत..

रायगड आजही बोलतो आणि महाराजांचा इतिहास दाखवतो आणि दुःख हि व्यक्त करतो त्या इतिहासाच्या वारसदारांवर..

रायगडाच्या साक्षीने उभं आयुष्य श्रींच्या स्वराज्यसेवेत घालवून जगाच्या समोर आदर्श उभारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा..

डॉ. प्रशांत शिरोडे..

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...