महापूर ..



सांगली, कोल्हापूर ह्या दोन जिल्ह्याना महापुराच्या संकटाचा विळखा अजून काही सुटत नाही.. काही दिवसापूर्वी दुष्काळाचं संकट महाराष्ट्रभूमीवर असताना आता ओला दुष्काळ काही भागात पडलाय.. सगळ्यांची नजर ह्या तिन्ही जिल्ह्यांच्या पुराकडेच.. कधीकाळी २००५ मध्ये पाण्याचा कहर झाल्यानंतर आता आलेला हा महाप्रलय जणू होत्याच नव्हतं करून गेला..

लाखो लोकांना ह्या संकटातून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात प्रशासनाला आणि मदतीला धावून आलेल्या सर्वाना यश आलं. ह्या मदतीच्या कार्याला थोडं गालबोट लागला आणि काही निरपराधांना ह्या निसर्ग प्रलयात आपला जीव गमवावा लागला. जीवाचा हा खेळ थांबता थांबेना कारण वरुणराजाचं हे बरसलेलं रूप महाकाय होत, ते सावरायला अजून थोडी प्रतीक्षाच करावी  लागेल. काही ठिकाणी अजून मदत पोहचू शकलेली  नाही तरी भारतीय सैनिक, नौदल, महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्राचे सुपुत्र तिथे पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत.

भारतीय सैनिक आणि सर्व मदतीला धावून येणारे जणू परमेश्वराचे अवतार असल्याचं पुरग्रस्तांची स्वाभाविक प्रतिक्रिया येत आहे. ऐका चित्रफितीत  "सुजाता अंबी" नावाची महिला सुरक्षित वाचल्यानंतर जवानांचा पाय पडताना दिसत आहे. तिची प्रतिक्रिया हि जणू परमेश्वराच रूपच बघितल्यासारखं आहे. सर्व पूरग्रस्तांना जवानांची हि मदत बघून जणू तेच परमेश्वराचे रूप आहेत हि भावना आहे. त्यांच्या मते "मंदिर मज्जीद सब डूब गये, भगवान वर्दी मी घूम रहे". ह्या सर्व सैनिकांना पूरग्रस्त महिलांनी राखी बांधून आपली प्रेमाची भावना व्यक्त केली.

महाराष्ट्र एकीकडे कोरड्या दुष्काळाने होरपळत आहे आणि दुसरीकडे महापुरात भिजत आहे. हि सर्व काही वरुणराजाची इच्छा. महापुराच्या ह्या ओघात सर्व परिस्थिती विस्कटलेली असताना आता मदतीचा महापूर येऊ दे हेच सर्व महाराष्ट्रीय जनतेला आव्हान..

डॉ. प्रशांत शिरोडे.

स्वराज...



"ज्या दिवसाची वाट पाहत होते तो आज आला" असं तीन तासापूर्वी देशाच्या काश्मीर मुद्यावरून आपलं मत व्यक्त केलं. कदाचित ह्या दिवसाची त्या वाट पाहत होत्या. काश्मीरचा ट्विट हे त्यांचं शेवटचं ट्विट. काश्मीर आज खराखुरा स्वराज्याचा आनंद लुटत असताना नावात स्वराज असणाऱ्या सुषमा स्वराज हृदयाच्या झटक्याने कालवश झाल्यात.

वयाच्या २७ व्या वर्षी सर्वात कमी वयातील कॅबिनेट मंत्री, पहिली महिला विपक्ष नेता, पहिल्या दिल्लीच्या महिला मुख्यमंत्री. हरियाणात जन्म झाल्यानंतर मध्यप्रदेश मध्ये आपली राजकीय कर्मभूमी विस्थापित करणारी लोहमहिला होत्या. इंदिरा गांधींनंतर दुसऱ्या परराष्ट्र मंत्री. सात वेळा खासदार आणि तीन वेळा आमदार असल्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. भारताचं वर्चस्व विदेश स्थरावर नेताना आपल्या संभाषणाने जगाला भारत बदलतोय हे दाखवण्यात त्या यशस्वी ठरल्या होत्या.

पेशाने वकील असणाऱ्या सुषमांनी आपला पेशा लोकसभेत आपल्या खणखणीत आवाजाचा ठसा उमटवला. कुठलाही राजकीय वारसा नसताना अटलजी आणि मोदींच्या मंत्रिमंडळात आपल्या कार्यशैलीचा प्रभाव पाडला. बोलण्यातील तारतम्य, बोलण्यातील कौशल्य, बोलण्यातील सभ्यता आणि बोलण्यातील राजकीय शैली त्यांच्या नसानसात भरलेली होती. भारतीय जनता पक्षाला जनतेच्या नजरेत उंचावण्याच मुख्य काम करणाऱ्या त्या एक जनमाणसातल्या नेत्या होत्या. परराष्ट्रमंत्री असताना जगातील कुठल्याही भारतीयाला मदत हवी तर ती ते स्वतः करत होत्या. त्यांच्या ह्या कार्यशैलीची जगभरात चर्चा झाली होती.

बाळासाहेब ठाकरेंनंच्या इच्छेतील असलेल्या प्रंतप्रधान, भारतीय जनता पार्टीतील महिला शक्तीच्या नेत्या आज आपल्यात नाहीत. संसदेत सर्वाना ऐकवास वाटणार उत्कृष्ट हिंदी वक्तृत्व असलेला आवाज आज शांत झाला...

भावपूर्ण श्रद्धांजली..

डॉ. प्रशांत शिरोडे.

राष्ट्रीयत्व...



जम्मूरियत आणि काश्मिरीयत असा नागिरकत्वाचा वेगळा असणारा प्रवाह, भारतीय नागरिकत्वाच्या मुख्य प्रवाहापासून नेहमीच वेगळा राहिला. २६ जुलै पासून काश्मिरात चाललेल्या हालचाली विशेष घडामोडींसाठीच होत असाव्यात असा अंदाज वर्तवला जात होता आणि घडलंही तसंच. आज सकाळी राज्यसभेत जम्मूकाश्मीरच्या विशेष अधिकारातले कलम ३५ अ आणि ३७० हटवण्याचा प्रस्थाव मांडण्यात आला आणि पूर्ण देशात ह्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं.

देशाच्या राष्ट्रीयत्वाला आणि एकतेला ह्या कलमामुळे नेहमीच तडा देण्याचं काम झालं.  काश्मिरातली शांतता दुभंगण्याच सर्वात मोठं कारण म्हणजे हि दोन कलम. देशाशी एकनिष्ठता ह्या दोन कलमाच्या आवरणामुळे येत नव्हती. वेगळी राज्यघटना, वेगळा झेंडा भातीयत्वाला कधीच आत्मसात करू शकत नव्हता. काश्मीरखोऱ्याची अशांतता आणि पाकपुरस्कृत आतंकवादाचं मुख्य कारण हि दोन कलम. निसर्गाने सौंदर्य बहाल केलेल्या जम्मूकाश्मीरला ह्या कलमाने विद्रुप केलं. कुण्या एकदोन स्थानिक पक्षांनी आपली जहागिरी मानून हि आग जाणूनबुजून तेवत ठेवली. लोकांच्या हितापेक्षा स्वहित ठेवलं म्हणून हि कलम अबाधीत राहिली.

३७० कलमानुसार स्वायत्त राज्याच्या दर्जा, परराष्ट्र, अर्थ, संरक्षण आणि दूरसंचार वगळता इतर विभागांमध्ये केंद्राचा कायदा लागू करण्यासाठी राज्य सरकारची संमती आवश्यक, भारतीय नागरिक तिथे स्थायिक होऊ शकत नाही, एक वेगळी राज्यघटना, जम्मू-काश्मीर महिलेने इतर राज्यातील मुलाशी लग्न केलं असेल तर त्यालाही इथे जमीन खरेदी करता येणार नाही.. अशा अटी होत्या ज्यामुळे त्या राज्याचा विकास होणं कदापि शक्य नव्हतं. ३५ अ नुसार, 'कायम नागरिक' तोच आहे जो १४ मे १९५४ रोजी राज्याचा नागरिक होता आणि कायदेशीरदृष्ट्या त्याने राज्यात स्थावर संपत्ती खरेदी केली होती.

भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व हि स्थानिक जम्मूकाश्मिरी नागरिकांची इच्छा आज पूर्णत्वाला आली. काही विनाशकारी विपरीत बुद्धिना हा निर्णय कदाचित आत्मसात होणार नाही कारण त्यांची स्वायतत्ता आता अबाधित राहणार नाही. ह्या निर्णयामुळे जम्मूकाश्मीर शांत होऊन भारताचं नंदनवन पुन्हा फुलो आणि भारतीय संस्कृती गुण्यागोविंदाने नांदो हि सद्धीच्छा. केंद्र सरकारचे अभिनंदन आणि ह्या निर्णयाच्या अमलबजावणी नंतर पाकव्याप्त काश्मीर भारतात आणण्यासाठी असाच निर्णय होवो ह्याच शुभेच्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

पक्षांतर...


फ्लेमिंगो (रोहित) पक्षी आपल्या मूळ जागेपासून काही कालावधीसाठी एका विशिष्ट मोसमात महाराष्ट्रात येतो आणि आपल्या ठरलेल्या वास्तव्यानंतर पुन्हा मूळ जागेवर परततो. ह्या दोन जागेतील पक्षाचं अंतर म्हणजे काही तरी बदल व्हावा म्हणून केलेलं पक्षांतर...

सध्या महाराष्ट्रात असंच काहीतरी चाललंय. एका पक्षाने जणू मेगाभरतीच भरवली आहे.. हि मेगाभरती जर तरुणांच्या नोकरीसाठी असती तर बेराजगोरीचा प्रश्न काही स्वरूपात सुटला असं वाटलं असत, पण सध्यस्थितीत चाललेली मेघाभरती हि राजकारणातली आहे.. रोज माध्यमातून भरतीची बातमी आहेच. अरे काय हे..? राजकारण कोणी करावं ज्याने पक्षासाठी हाडामासाचा कार्यकर्ता म्हणून काम केल्यानंतर पक्षाच्या घटनेने मोठा होऊन नेता झालेल्या व्यक्तीने.. पण होत काही वेगळच.. कार्यकर्ते कुणाचे आणि नेते कुणाचे.. सगळं काही सत्तेसाठीच...

पक्षनिष्ठा, पक्षशिस्त, पक्षकार्य, पक्षप्रेम, पक्षधोरण, पक्षप्रेरणा, पक्षघटना हे सगळं जुन्या राजकारणातील पैलू म्हणण्याची वेळ महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यावर आली. भारतवर्षाला राजकारणाचे नवनवीन धडे शिकवणारा महाराष्ट्र जणू चुकीच्या विषयाचा धडा भारतीय राजकारणाला शिकवतोय कि काय?पक्षनिष्ठा जणू खुंटीला शर्ट टांगतो तशी टांगून ठेवलीये, जसा शर्ट केव्हाही टांगायचा आणि केव्हाही घालायचा तशी पक्षनिष्ठा. पक्षशिस्त?? शिस्त नावाचा शब्दच राजकारणातून हद्दपार झाला असं म्हंटल तर चुकीचं ठरणार नाही. पक्षकार्य हाडामासाच्या कार्यकर्त्याने करावं पण हाडमास फक्त निवडणुकीच्या काळात खाण्यापुरती राहिलीत. पक्षप्रेम म्हणजे सत्तेची लाचारी. पक्षधोरण म्हणजे मतदारसंघ काबीज करून आपला माणूस तिथे बसवण. पक्षप्रेरणा म्हणजे जुन्याजाणत्या लोकांनी उभ्या केलेल्या पक्षाच्या विचारसारणीला बाजूला करून फक्त स्वहितासाठी अयोग्य गोष्टींचा पायंडा पाडणं. पक्ष घटना म्हणजे दिल्लीतील एकदोघांच्या आदेशावर राज्य चालवण. सगळं सगळं बघावं ते सत्तेसाठीच..

स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर देशाला राजकारण शिकवणारा महाराष्ट्र.. आज तोच महाराष्ट्र कदाचित आपल्या स्वाभिमानाचा मानबिंदू आणि स्वराज्यशिकवणं विसरतोय कि काय? राज्याच्या विकासासाठी प्रांतीय पक्ष टिकावेत आणि राज्याच्या प्रगतीसाठी विरोधी पक्ष असावेत. पक्षांतराचं राजकारण थांबून महाराष्ट्र राज्याच्या विकासाचं, मराठमोळ्या भूमिपुत्रांच्या रोजगाराच, काळ्यामातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताचं राजकारण झालं तर शिवरायांना सुद्धा महाराष्ट्राच्या स्वाभिमानातला अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही...

डॉ. प्रशांत शिरोडे.

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...