देव तू क्रिकेटचा...



सचिंन्न्न..., सचिंन्न्न... ह्या प्रेक्षकांच्या मनापासून निघणाऱ्या भावनेला जगभरातल्या क्रिकेटप्रेमींना अवाक करणारा आवाज. आज जरी प्रत्यक्षात खेळत नसला तरी तुजी कर्मभूमी वानखेडे मैदान अजून हि कुठल्याही सामन्यात तुज्या नावाच्या आवाजाचा जयघोष करते. हे सगळं फक्त तुज्यातल्या खेळाडूवृत्तीमुळे..

"सचिन रमेश तेंडुलकर" तमाम भारतीयांच्या नव्हे तर जगभरातल्या क्रिकेट प्रेमींच्या मनावर कित्येक वर्षांपासून अधिराज्य गाजवणार महान व्यक्तिमत्त्व. आमच्यासाठी सचिन, सच्य्या, सचू. हो एकेरी हाक. कारण तू आमच्या हृदयात आहेस. तू राजीव गांधी खेलरत्न, पदमविभूषण आणि सर्वोच भारतरत्न पुरस्कार विजेता आहेस. भारताचा सर्वश्रेष्ठ पुरस्कार विजेता असला तरी तुज्यासाठी सर, मास्टर ब्लास्टर, लिटल मास्टर अश्या अनेक पदव्या असताना आम्ही मात्र सचिनचं म्हटलो आणि म्हणत राहू.

क्रिकेटच्या विश्वातील सर्व रेकॉर्डस् तुज्याच नावावर, जगातील सर्व बॉलर तुलाच घाबरता, जगातील सर्व क्रिकेट टीम तुलाच खेळताना बघायला तडफडतात, जगात सर्वात जास्त प्रेक्षक वर्ग तुझाच, ऑस्ट्रेलियाचा सन्मानाचा पुरस्कार तुलाच, अनेक नवीन खेळाडू तुला डोळ्यासमोर ठेवून घडत आहेत. इतकं सगळं असताना तुझे पाय मात्र जमिनीवरच. तुज्यात एवढ्या मोठ्या गोष्टींचा किंचितसा सुद्धा गर्व नाही. सर्वाना सांभाळून प्रामाणिकपणे खेळणारा फक्त तूच. हो प्रामाणिक, कारण पंचांचा निर्णय तुला नेहमी अंतिम असायचा मग तू कधीच त्यावर
प्रश्न उपस्थित केला नाही मग तो निर्णय चुकीचा असला तरी. तुज्या खेळाडू वृत्तीला खरा सलाम.

सचिन खेळत असताना सारा भारत झोपायचा नाही हे तितकंच खरं, कारण सर्व भारतीयांना तुज्या खेळाची चाहूल लागलेली असायची. तू खासदार हि राहिलास, तू "अपनालय" ह्या सामाजिक संस्थेतून दरवर्षी २०० मुलांची जबाबदारी घेतोस. तुझी सामाजिक बांधिलकी हि तितकीच कौतुकास्पद.

तू ज्या दिवशी क्रिकेटला अलविदा दिलास तो दिवस आज हि आठवतो. तुझं ते खेळपट्टीला नमस्कार करून डोळ्यांना आसू आलेलं आम्हाला खूप भावून गेलं. तुझ ते शेवटच भाषण हे जग कधीच विसरू शकत नाही. तू तूच आहेस. तू आला तू बघितलं आणि तू जिंकलस. तू त्या दिवशी अलविदा हा व्यवसायिक खेळाचा घेतला, क्रिकेटचा अलविदा तर तू मरेपर्यंत नाही घेऊ शकत हे आम्ही जाणून आहोत. जगातील क्रिकेट प्रेमिंनवर अधिराज्य करणारा तू आमच्यासाठी एक मराठी असल्याचा सार्थ अभिमान आहेस आणि खरंच तू देव आहेस क्रिकेटचा...

४५ व्या वाढदिवसानिम्मित मनःपूर्वक मराठमोळ्या शुभेच्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

राजकीय वारसा



"राजकारण" दिवसातून एकदा तरी कानावर पडणारा शब्द. राजकारण म्हंटल तर ती सर्वसामान्यांची गोष्ट नाही असंच म्हंटल जात. राजकीय वारसा असला तर राजकारणात येणं सोपं असत. राजकारणात स्वतःच्या कर्तृत्वावर येणं तितकं सोपं नसत आणि ते प्रत्येकाला जमत पण नसत. राजकारणात संधीच सोन करण जेवढ महत्वाचं असत तेवढ वेळ बघून निर्णय घेणं पण महत्वाचं असत. राजकारणात लोकभावना समजून जेवढ महत्वाचं असत तेवढच वैक्तिक स्वार्थ बघणं हि स्वाभाविकच असत. राजकारण हुकूमशाही, लष्करशाही आणि लोकशाही ह्या मुख्य प्रवाहातून जगभरात दिसून येत पण सर्वात जास्त प्रमाणात लोकशाहीतून होताना दिसते. लोकशाही म्हणजे काय तर, लोकांनी लोकांसाठी उभी केलेली राजव्यवस्था. पण हि राजव्यवस्था लोकांसाठी निवडणुकीपुरता जास्त प्रमाणात दिसताना, लोकहितासाठी कमी प्रमाणात दिसते. प्रसारमाध्यम, न्यायव्यवस्था आणि साहित्य हे लोकशाहीचे मुख्य आधारस्तंभ. आधारस्तंभांनी आपली भूमिका निर्भीड आणि निस्वार्थ पणे मांडली तर लोकशाही भक्कमपणे टिकून राहते.

राजकारण म्हंटल तर सत्ता आलीच, आणि सत्ता म्हंटली कि केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण आलंच. सत्तेच्या केंद्रीकरणात एकहाती आणि आघाडी हि दोन पद्धती आल्याचं. एकहाती सत्ता मिळवून राजकीय प्रवास करण हे जितकं सोपं असत तितकं आघाडी करून सत्ता चालवणं अवघड असत. सत्ता असली तर राजकारण व्यवस्थितपणे करता येत. सध्याच राजकारण हे पूर्णपणे सत्ताभिमुख झालंय आणि सत्तेच्या उपयोग करण्याऐवजी दुरुपयोग जास्त प्रमाणात होताना दिसतोय. कदाचित केंद्रीकरणातून सत्तेचं विकेंद्रीकरण होतंय.

राजकारणात यशस्वी होण्यासाठी अनेक पैलू असावे लागतात. काही जन्मताच येतात काही आत्मसात करावे लागतात. लोकसहभाग, लोककार्य, वक्तृत्व, नेतृत्व, प्रभुत्व अश्या अनेक पैलूंना आचरणात आणावं लागत.

राजकारण म्हंटल तर ते व्यक्तीप्रत बदलत, अश्याच काही राजकीय नेत्यांचा व्यक्तिविशेष  "राजकीय वारसा" ह्या श्रुंखलेची सुरवात...

डॉ. प्रशांत शिरोडे.

राजा त्रैलोक्याचा


स्वर्गाला चाहूल लागली होती, चैत्र पौर्णिमेच्या प्रकाशात सुद्धा अंधाराची दिशा भरकटली होती, चैत्राची देवदेवतांची पूजा मंदावली होती, मजीद मध्ये नमाज पठणानंतर अर्ध्या चंद्रकोराची आस संपली होती, देव पाण्यात आणि जनता पाण्यातल्या देवाकडे आस लावून बसली होती, तोंडाला अन्नाचा घास लागत नव्हता, पाचाडला रायगडाची आस लागली होती, रायगडाच्या प्रवेशद्वारात मावळ्यांची रात्रंदिवस चिंता लागली होती, सहयाद्रीच्या कड्याकपारातला वारा शांत झाला होता, गनिमाला चुणूक लागली होती. सगळं अघटित घडल्यासारखं वाटत होत.. शिवरायांना गोड लागत नव्हतं. आमचं राज दिसत नाही म्हणून सार रान कासावीस होत होत. शिवबा संभाजी राजांची वाट बघत होते. नियतीच्या मनात काहीतरी वेडंवाकडं चालू होत..

सगळ्यांना राजाला बर वाटत नसल्याची खबर भेटली होती, स्वराज्याचा धनी काहीतरी संकटात आहे म्हणून जनता काळजाचा ठोका लावून धरत होती. राजाला कुणी काहीतरी केलं नाही ना? ह्या प्रश्नात जनता व्याकुळ झाली होती. शिवरायांवर असच एकदा विषप्रयोग करून संकट आणलं गेलं होत, सर्व उपचार झाले होते तरीही ह्या संकटातून शिवरायांना एक वैदूबाबान संजीवनी देऊन वाचवल होत. त्या वैदूबाबाला संभाजी महाराजांनी जीवाची काळजी न करता आपल्या पाठीवर धावत धावत घेऊन गडावर आणलं होत. महाराजांना बर करण्यात यश आलं होत. शंभूराज्यांच्या प्रयत्नाला फळ भेटलं होत. महाराज बरे झाल्यानंतर वैदूबाबाला महाराजांनी विचारलं बाबा काय हवं तुम्हाला? तेव्हा वैदू बाबा म्हणाला "राज तुमच्या मुळे जगतोय तुम्ही बर झालात हेच माझ्यासाठी खूप हाय. खूप संकट भोगलीत पण स्वराजात लय खुश हाय. स्वराज्याचा धनी वाचवण्यात माझा हातभार लागला मी धन्य झालो राज मी धन्य झालो". केवढ प्रेम होत सामान्य जनमानसाच माझ्या राजावर. कारण राजानं हे स्वराज्य उभं केलं होत त्या गोरगरिबांसाठी, सामान्य जनतेसाठी. म्हणून जगाच्या पाठीवर असा राजा होणं शक्य नाही..

ह्या संकटामुळे जनता जास्त काळजीत होती, काहीही होवो आपल्या राजाला काहीही नको व्हायला. चैत्रपौर्णिमेचा दिवस जणू पौर्णिमा नव्हे तर अमावस्या म्हणून उजाडला. समध्या स्वराज्यात हनुमान जयंती असल्यासारखी वाटत नव्हती. भर दुपारच्या पहारी राजधानी रायगडाच्या द्वारावर काळा ढग जमू लागला होता. स्वराज्याच्या संस्थापकाला जणू स्वर्गाचं आमंत्रण आल्याचं वाटत होत. दुपार काही संपत नव्हती आणि संध्याकाळ काही होत नव्हती. नियतीला ह्यावेळेस ऐकायचं नव्हतं आणि स्वराज्याची पौर्णिमा जणू आमवस्याच झाली. यमाने महाराजांना रायगडाच्या महालातून स्वर्गाच्या महालात नेण्याचं ठरवलं होता आणि स्वराजाला पोरकं केलं. चैत्र पौर्णिमा, ०३ एप्रिल १६८० महाराजांना स्वराज्यातून घेऊन गेला. स्वराज्याचा राजा त्रैलोक्याचा राजा झाला.

महाराज गेल्या नंतर दुष्मनाच्या तोंडून सुद्धा चांगली दुवा निघाली ती म्हणजे "ये अल्ला किसी को दुश्मन देना होगा तो शिवा जैसा नेक बंदा दे". म्हणून म्हणावं लागत "असा राजा पुन्हा होणे नाही".

या भूमंडळाचे ठायी धर्म रक्षी ऐसा नाही..
महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे..

राज घ्या मनाचा मुजरा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...