ईडी झाली येडी...



ऑफिसमध्ये एका मित्राने विचारलं हे ईडी म्हणजे काय? सध्या खूप ऐकू येतंय.. त्याचा प्रश्न तसा साहजिकच होता. गेल्या एकदोन वर्षात हे ईडी म्हणजेच एन्फोर्समेंट डायरेक्टरेट म्हणजेच अंमलबजावणी संचालनालय खूपच कामाला लागलाय. जणू एवढं एकच सरकारी कार्यालय जे काम करतंय. काम करतंय किंवा त्यांच्याकडून काम करून घेतलं जातंय.

अंमलबजावणी संचालनालय पैश्यांची घेवाणदेवाण योग्य रीतीने झाली नसेल तर त्याची चौकशी करून "निरपक्षपणे" संबधीतानावर गुन्हा दाखल करत. देशस्थरावर कर्त्याकरवित्याच्या जोरावर कामाला लागलेले हे कार्यालय सामान्यांना माहित नव्हतं. अचानक निवडणुका आल्या कि हे चमत्कार व्हावा तसं हे कार्यालय काम करू लागत. सर्व सरकारी कार्यालय असंच काम करू लागले तर देशाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. प्रश्न येतो तो ह्या अगोदर अशी वेळ कधीच आली नसेल का? आली असेल पण ती राजकीय फायद्यासाठी तर नव्हती. आजच्या घडीला ईडी म्हणजे एक राजकीय बाहुला म्हंटल तरी चुकीचं ठरणार नाही.

देशस्थरावर चालेल ईडीच हे निपक्ष काम महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावर जोराने चालू आहे. विशेष म्हणजे जुन्या कुठल्यातरी गोष्टी ईडीला चौकशीसाठी आता म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर आठवतायत. अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे चौकशीसाठी जावून आले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात राजकीय भूकंप केल्यानंतर विधानसभेत काळजी घेण्यासाठी ईडीने हि कारवाही केली असेल, शेवटी निपक्षपात.. गेल्या दोन दिवसापूर्वी शिखर बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांवर गुन्हा दाखल केला.. थोडं अचंबित होण्यासारखं होत, कारण त्यांचं कि शरद पवार ह्या बँकेवर कधी सदस्यच नव्हते. मग पवारांनीच ठरवलं जावून येवू ईडीच्या कार्यालयात तर इडीनेच थोडं विचार करून सांगितलं तुमची चौकशीची गरज नाही..

शरद पवार वयाच्या ८०व्या वर्षी महाराष्ट्र दौऱयावर निघाले आणि ईडीला चमत्कार झाला आणि घाईघाईत गुन्हा दाखल केला. जेव्हा हे अंगाशी आलं तेव्हा ईडीने आपला निर्णय थोडा सबुरीने घेतला. ईडी नक्की आपली स्वायत्त, निरपेक्ष आणि सरकारी असलेलं काम विसरली असं वाटू लागलं. कोणीतरी इशारा द्यावा आणि दावणीला बांधलेला जनावरासारख ईडीने पळत सुटाव हे तितकं योग्य नाही.

अंमलबजावणी संचालयानाने नावाप्रमाणे निरपक्षपने कामाची अंमलबजावणी केली तर सामन्यांना ईडी झाली येडी...? हा प्रश्न पडणार नाही..

डॉ. प्रशांत शिरोडे.

कोकणोत्सव गणरायाचा...



आनंदाचा, चैतन्याचा, मांगल्याचा आणि उत्साहाच्या मंतरलेल्या दिवसातला शेवटचा दिवस म्हणजे "अनंत चतुर्दशी".. दहा दिवस परमेश्वर कुठलीतरी जादूच करून जातो.. महाराष्ट्राच्या भूमीवर तर स्वर्गाचं वात्सल्य दरवळत. काय जादू आहे ना ह्या सणात..! जणू परमेश्वर वर्षातील दहा दिवस भूतलावर विशेष रूपात येवून भूतलावावर आनंदाचं खिरापत वाटून जातो. जाणऱ्यावर्षी पुढच्या वर्षी लवकर येण्याची आस लावून जातो आणि येणाऱ्या वर्षी त्या दिवसाची ओढ लावून ठेवतो. हा काहीतरी भावनिक खेळ आहे आणि ती मनाची एक वेगळीच श्रद्धा आहे.. अरे हो मी गणेशोत्सवाबद्दलच बोलतोय..

आज अनंत चतुर्दशी .. दहा दिवस उत्साहाचं रोमांकित झालेलं वातावरण आज बाप्पाला थोड्या दिवसांसाठी दूर घेऊन जाणार झालय.. किती छान असतात ना गणेशउत्सवातले दिवस.. गणपती बाप्पा येणार म्हणून ती तयारीची लगबग.. बाप्पासाठी कुठलं मखर, बाप्पासाठी कुठला प्रसाद, बाप्पासाठी कुठला देखावा, बाप्पाच्या दर्शनासाठी प्रेमाच्या लोकांना आमंत्रण ह्या सगळ्याची तयारी काही वेगळीच असते. बाप्पाची आरती, बाप्पाचे रूप, बाप्पाचा प्रसाद आणि सभोतालच बदलेल वातावरण सगळं काही अलबेलच असत.. दहा दिवस वातावरणात झालेला बदल मानवी मनाला भावून जातो, कदाचित हि परमेश्वराची लिलयाच म्हणावी..

गणेशोत्सव म्हंटलं तर कोकणात त्याच विशेष महत्व आहे.. दिवाळीपेक्षा मोठ्या उत्साहाने आणि आत्मीयतेने गणेशोत्सव साजरा केला जातो. बाप्पाच्या प्रसादात दिवाळीसारखा फराळ बनवला जातो. साधारणतः कोकणात चार -पाच खोलीचं घर असत. बाप्पाला दोन्ही हातात धरून घरात आणलं जात आणि सर्वात पुढच्या खोलीत पाटावर ठेवून पूजा केली जाते. नंतर बाप्पाला पूर्ण घर, जनावरांचा गोठा, शेती आणि घराचा परिसर दाखवून, गेल्या वर्षी जी आमची प्रगती झाली ती तुझ्याच कृपादृष्टीमुळे झाली असं बाप्पाला सांगितलं जात. त्यानंतर बाप्पाची आरास जिथे असते तिथे बाप्पाला ठेवलं जात आणि प्राणप्रतिष्ठा केली जाते. रोज सकाळी आणि संध्याकाळी मनोभावे आरती केली जाते. ह्या काळात बाप्पाची भजन गायली जातात. एकमेकांच्या घरी बाप्पाच्या  दर्शनाला बोलवलं जात. शेवटच्या दिवशी बाप्पाची पूजा झाल्यानंतर गावातील गणपती एका घरानंतर दुसरं घर असे शिस्तबद्ध पारंपरिक वाद्यात परतीच्या वाटेवर निघतात..

घरी येताना हातावर आणलेल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी डोक्यावरूनच घेऊन जातात, कारण त्याची प्राणप्रतिष्ठा झालेली असते आणि त्याच्या दैवीरूपामुळे तो भारदस्त झालेला असतो आणि तो माणसाच्या हातांना न पेलवणारा झालेला असतो. बाप्पा ज्या मार्गातून घरी आला त्या मार्गापेक्षा निरोपाचा मार्ग वेगळा असतो, कारण बाप्पाचं घरातलं वास्तव्य ह्या दहा दिवसारखं कायम रहावं हि त्यामागची भावना असते. सर्व गावातले बाप्पा पाटावर नदीकिनारी ठेवले जातात आणि गावासमोर बाप्पाला गार्हाणे मांडलं जातात. बाप्पाला गाऱ्हाण्यातून साऱ्या गावासमोर इच्छा व्यक्त केली जाते. हे साकडं साऱ्या गावासमोर मांडलं जात कारण त्या अडचणींसाठी किंवा इच्छेसाठी गावातूनच कोणीही धावून येत. गाऱ्हाणं हे एकांतात किंवा कुटुंबासमोर मांडलं तर त्याला महत्व नसत. नदीतीरावर बाप्पाची मनोभावे पुजा, आरती करून पाच वेळेस पाण्यात बुडवून बाप्पाला विसर्जित केलं जात. विसर्जनानंतर पाटावर नदीची वाळू आणली जाते आणि त्या पाटाची घरी आल्यावरही आरती केली जाते. पाटावरची वाळू घरात, शेतात आणि आजूबाजूच्या परिसरात टाकली जाते, ज्यातून बाप्पाचा सहवास दरवळत राहील अशी भावना असते.

निरोपाच्या दिवशी जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप देताना डोळ्यातील अश्रुनी "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" ह्या भावनिक विनवणीने मनाची समजूत काढली जाते.. सजवलेले मखर बाप्पाच्या जाण्याने आज सुने होतील, बाप्पाच्या जाण्याने आज डोळे पाणवतील... बाप्पा सर्वाना सुखी ठेवो हीच प्रार्थना.. "निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी, चुकले अमुचे काही त्याची क्षमा असावी"...

डॉ . प्रशांत शिरोडे..

इसरोचा योद्धा ..



चांद्रयान २ ची चर्चा जणू देशातील कान्याकोपऱ्यात घुमतेय .. गेले ५५ दिवस हि मोहीम चालू झाल्यापासून तर चांद्रयान चंद्रावर पोहोचण्याच्या दिवसाच्या रात्री २ वाजेपर्यंत ह्या मोहिमेला जितकं चर्चिल गेलं नाही तितकं ह्या दोन दिवसात ते चर्चेत राहील. ना कुठली मॅच होती ना कुठला विशेष कार्यक्रम होता पण सारा देश चांद्रयान २ ह्या मोहिमेच्या अखेरच्या टप्याकडे मन लावून टेलिव्हिजन समोर बसला होता.

रात्री १.५२ मिनिटांनी चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा अंदाज असताना सर्व ठरल्याप्रमाणे घडत होत. इसरोच्या प्रेक्षपण गृहात लाल रेषेवरून हिरवी रेषा त्या मोहिमेचं गणित स्पष्ट करत होती. चांद्रयान कमी वेगात व्यवस्थितरीत्या चांदोमामाच्या कुशीत उतरावं हे ह्या मागचा उद्देश असताना, सर्व तसंच घडतही होत आणि शास्रज्ञ टाळ्या वाजवून आपला आनंद व्यक्त करत होते. अवघ्या २.१ किलोमीटर अंतरावर असताना चांद्रयानाचा संपर्क इस्रोच्या कक्षागृहापासून सुटला आणि सगळीकडे स्मशान शांतता पसरली. शास्रज्ञ ह्या थोड्या चुकलेल्या क्षणाला जणू जिवंत करण्याचा प्रयत्न करत होती आणि रात्रभर प्रयत्न करताना आशेची किनार यशाची वाट शोधत होती. हे प्रयत्न १२ वर्षाच्या अथक कष्टाची परीक्षा होती..

चांद्रयान मोहिमेचं नेतृत्व करताना ह्या मोहिमेचं सर्व माहिती आणि प्रसारण हाताळणाऱ्या एम. विनिता शेवटच्या क्षणापर्यंत माहिती देत होत्या. चांद्रयानाशी संपर्क तुटल्यानंतर त्या भावुक झाल्या आणि काय बोलावं ह्या विचारात शांत झाल्या. अशा वेळेस देशासह जगाला आणि समोर बसलेल्या प्रतप्रधानांना माहिती देण्यासाठी स्वतः इसरो प्रमुख म्हणून पुढे येऊन मोहिमेच्या स्थितीची जबाबदारी घेतली.

सकाळी देशाला ह्या विशेष प्रयत्नावर प्रतंप्रधानांनी संबोधल्यानंतर, प्रतंप्रधान इसरोच्या कार्यालयातून बाहेर पडताना एक भावनिक क्षण घडला. इसरोचे मुख्य डॉ. के. शिवन प्रंतप्रधानांना निरोप देताना भावुक होऊन ह्या मोहिमेचा प्रमुख म्हणून जबाबदारी घेताना प्रतंप्रधानाच्या खांद्यावर भावनेच्या भरात रडू लागले. जगाच्या पाठीवर पहिल्यांदा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मोहीम हाताशी घेणारा हा भावनिक झालेला योद्धा म्हणजेच डॉ. के. शिवन. ह्या भावनिक क्षणानंतर जगाला माहित झालेला अतिशय साध राहणीमान असलेला अवलिया म्हणजे डॉ. के. शिवन.

तामिळनाडूच्या खेड्या गावात गरीब शेतकऱ्याच्या घरात जन्मेलाला साधारण मुलगा. आठवी पर्यंत गावात शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी पैसा नसताना आंबे विकून बारावी पर्यंत शिकून नंतर बी. एस्सी. केलं. गणितात १०० पैकी १०० गुण मिळवून शिष्यवृत्ती मिळवून इंजिनेरींग करून पुढे अंतराळ क्षेत्रात पदवीत्तर अभ्यास करून आय. आय. टी. मुंबई येथून पीएचडी केली. पदवीच्या अभ्यासक्रमापर्यंत गरिबीमुळे पायात चप्पल न घातलेला हा सामान्य मनुष्य अंतराळक्षेत्रात अनेक दैदिप्यमान रचू लागला आणि त्या जोरावर इसरो ह्या भारतीय अंतराळ संस्थेचा मुख्य पदावर पोहचला. आपल्या कारकिर्दीत चांद्रयान सारख्या मोहिमेला पहिल्याच प्रयत्नात यशाच्याजवळ नेणाऱ्या ह्या योध्याचा भारत भूमीला नक्कीच गर्व आहे. भारत मातेच्या ह्या पुत्राच चांदोमामाच्या कुशीतल्या कुतूहलतेच स्वप्न प्रत्यक्षात घडो ह्याच मनोभावे शुभेच्छा ..

डॉ. प्रशांत शिरोडे.

प्रवास चांद्रयानाचा ..


आज मध्यरात्री सुमारे २ वाजेच्या दरम्यान चांद्रयान २ चांदोमामाच्या दुनियेत पोहचणार होत. ५५ दिवसाच्या यशस्वी प्रवासानंतर व्यवस्थितरीत्या चांद्रयान चंद्रावर पोहचण्याचा प्रवास करत होता. भारतीय अंतराळ केंद्र म्हणजे इसरो च्या बंगळुरू केंद्रातून सर्व शास्रज्ञ, प्रतप्रधान आणि सर्व अंतराळ प्रेमी ठरल्या वेळाप्रमाणे चांद्रयानावर आपला डोळा लावून बसले होते.

रात्रीचा तो क्षण काही वेगळाच होता, जस चांद्रयान चंद्राच्या जवळ जवळ जात होत तसं शास्त्रज्ञाचा आनंद वाढत होता. अगदी २.१ किलोमीटर वर चांद्रयान येईपर्यंत सगळं अलबेल होत आणि अचानक चांद्रयानाशी अंतराळ केंद्राचा संपर्क तुटला. सगळी कडे काही क्षणापुर्वी असलेलं आनंदाचं वातावरण चिंतेत बदललं. होत्याच नव्हतं झालं.. साऱ्या जगाचं लक्ष लागलेली मोहीम अचानक स्तब्ध झाली. रात्रभर जागून प्रयत्नांची पराकाष्टा करत चांद्रयानावर माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न चालू होता आणि तो अजूनही चालू आहे.

जागतिक स्थरावर चंद्रावर अशी मोहीम करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीन नंतर चौथा देश होता. सर्वात कमी खर्चात हि मोहीम हाती घेण्यात आली होती. दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरणार होता. गेल्या १० वर्षांपासून हि मोहीम हाती घेण्यात आली होती..

चांद्रयान २ हि मोहीम तशी खूप रहस्यमय होती. चांद्रयान अवघ्या २.१ किलोमीटरवर चंद्राच्या पृष्ठभागावर पोहचण्यापासून संपर्कातून तुटला.. जणू काल्पनिक गोष्टीसारख्या चांदोमामाच्या कुशीत तो माहिती देण्याचं विसरला...असो.. प्रतप्रधानांनी शास्त्रज्ञांचं मनोबल वाढवून संबोधीत करताना "प्रयोग हा प्रयोग असतो अपयश नसतो..". प्रतप्रधान इसरो केंद्र सोडत असताना इसरो प्रमुख डॉ. के. शिवन प्रंतप्रधानांच्या गळ्यात पडून आपले आसू अनावर करू शकले नाही...सगळं भावनिक वातावरण झाल होत. असो.. तरीहि हि मोहीम इसरो ह्या भारतीय अंतराळ संस्थेला एक विशेष स्थरावर घेऊन गेली. सर्व शास्त्रज्ञांचं अभिनंदन आणि भावी वाटचालीस भारतीयांच्या शुभेच्छा...

डॉ. प्रशांत शिरोडे..

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...