सभ्येतेतील विविधता.



गेल्या महिन्यात थायलंड ह्या जगाच्या नकाशावरच्या छोट्याश्या देशात जायचा योग आला. त्या देशात फिरताना सगळीकडे एक वेगळंच वातावरण पाहायला मिळालं. अगदी स्वागतापासून ते निरोपापर्यंत खूप काही वेगळं अनुभवायला भेटलं.

थायलंड तसा लष्करशाही असलेला देश. ह्या देशात स्त्री ७० टक्के आणि पुरुष ३० टक्के प्रमाणात आहेत. कुठल्याही क्षेत्रात स्त्री हि असण्या मागे हेच मुख्य कारण आहे. सभ्यतेची आणि नम्रतेची खरी भाषा इथं कळली कारण येथील प्रत्येक माणूस समोर भेटलेल्या माणसाला वाकून नमस्ते म्हणतो. कोणी आपल्यापेक्षा मोठा असेल तर त्याच्या पुढे वाकून चालतील. समोरच्याच म्हणणं व्यवस्थित ऐकून घेतील. चुकीचं काही होत असेल तर क्षणांचा विलंब न करता माफी मागतील. मोठ्या आवाजात बोलणं तर बघायला सुद्धा भेटलं नाही. नेहमी हसरा चेहरा असणारी लोक सगळीकडे दिसत होती.

बँकॉक येथे मागील काही वर्षभरापासून काम करणारी काही भारतीय लोक अनुभव सांगताना म्हणतात कि गेल्या तीन चार वर्षात कधी भांडण बघायला भेटलं नाही. रस्त्यावर कधी अपघात झाला तर पोलीस आणि विमा कंपनीची व्यक्ती येऊन त्या अपघाताची चौकशी करतात आणि योग्य ती कारवाई करतात पण अपघातातील व्यक्ती अपशब्दही काढत नाही. कामाच्या ठिकाणी कोणी अपशब्द किंवा वरच्या आवाजात बोललं तर समोरची व्यक्ती दुसऱ्या दिवसापासून कामाला येत नाही. याचाच अर्थ कुठल्याही व्यक्तीवर कुठलाही दबाव टाकला जात नाही. कधी चोरी हा प्रकार सुद्धा कानावर ऐकायला येत नाही.

थायलंड ह्या देशात अनेक देशातून लोक स्थायिक झालेली आहेत आणि ह्या देशात त्यांना योग्य ती वागणूक दिली गेली आहे. पण अलीकडच्या काळात त्यावर निर्बंध आणण्यात आली आहेत. बाहेरून आलेल्या पर्यटकाला अतिशय नम्रपणे मदत केली जाते. हिंदुस्थानातून गेलेल्या भगवान बुद्धांच्या विचारांवर चालणारा देश तितकाच हिंदू देवतांना मानताना दिसतो. ज्या देशातून सभ्यता शिकवली गेली त्याच देशात हि सभ्यता लोप पावत चालली असताना थायलंड सारखा देश त्यावर आपली अस्मिता टिकवून उभा आहे.

थायलंड म्हंटल का आपल्या मनात प्रथम वेगळी कल्पना येते पण ते तसं नाही कारण एवढ्या छोट्याशा देशाकडून शिकण्यासारखं खूप आहे. अतिशय स्वच्छ असे रस्ते. कामाच्या ठिकाणी स्त्री, पुरुष आणि तृतीय पंथी कुठलाही लिंग भेद केला जात नाही. स्रियांचं प्रमाण जास्त असल्यामुळे स्त्रीला अनेक व्यवसायातून जावं लागत पण त्या देशाच्या परिस्थिती नुसार ते कदाचित बरोबर राहू शकत.

सभ्येतेतील विविधता अनुभवताना आपल्या देशात सुद्धा हि गोष्ट होती पण काळानुसार आम्ही गमावली आणि दुसऱ्या देशांनी टिकवली..

डॉ. प्रशांत शिरोडे.

राजस्व ...



स्वराज श्रीकांत ठाकरे... मराठी मनाचा "राज ठाकरे..." आजच्या ५० वर्षांपूर्वी जन्माला आलेली एक कडवट स्वाभिमानी मराठी व्यक्तिरेखा..

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्या अदभूत विभूतीच्या छत्रछायेखाली मोठी झालेली विभूती म्हणजेच राज ठाकरे.. अगदी जन्मापासून ते वयाच्या ४० वर्षापर्यंत बाळासाहेबांना अगदी जवळून अनुभवणारा बाळासाहेबांचा निष्ठावंत चाहता.. हिंदुस्थानातील राजकारणाचा एक वेगळा पैलू म्हणजे बाळासाहेब आणि त्या पैलूला उभेऊभ जपणारा राजकारणी म्हणजे राज ठाकरे..

राजकारण म्हंटल तर सामान्यांना न पटणारी गोष्ट. राजकारणातल्या चांगल्या विचारसरणीच एक उत्तम उदाहरण म्हणजे राज ठाकरे. भविष्यातला राजकारणाची दिशा अगदी अचूकपणे ओळखणारा राजकारणी. राजकारणातील मुख्य पैलूत उत्तम वक्ता, हजर जबाबी, परिस्थितीची सखोल माहिती, योग्य निर्णय, विकासमुख आणि स्वाभिमान ह्या सर्व पैलूंची योग्यं सांगड घातलेला नेता. आदोलनांची दिशा ठरवून योग्य रीतीने आंदोलन यशस्वी करणारा योग्य आंदोलक. राष्ट्राच्या विकासासाठी योग्य ती विकसनशील कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याची धडपड असणारा नेता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारणा अग्रस्थानी मानणारा शिवप्रेमी.

मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी लढणारा मराठी हृदयसम्राट. जीवाची पर्वा न करता १०० च्या वर केसेस स्वतःवर घेणारा एकमेव राजकारणी. हिंदुस्थानच्या पाठीवर विकासाचं प्रेसेंटेशन देणारा एकमेव नेता. सत्ता नसताना विकासाचं ब्लू प्रिंट सादर करणारा अभ्यासक. मराठी माणसाचा स्वाभिमान जागा करत असताना स्वाभिमानाला अग्रस्थानी ठेवणारा नेता. कुठल्याही अन्यायावर वाचा फोडणारा आणि सामन्यां करता धावून जाणारा राजकारणी. तरुणाईवर अविरत राज्य करणारा तरुण नेता. राष्ट्रीय राजकारणात सक्रिय नसताना प्रादेशिक राजकारणात कुठलीही सत्ता नसताना स्वतःच वर्चस्व निर्माण करणारा कणखर नेता.

आयुष्याच्या वाटचालीवर अनेक संकटाना समोर जाताना काही चुकांना मागे टाकून पुढे जाण्याची ईच्छाशक्ती ठेवणारा नेता. पक्षसंघटना, राजकीय घडामोडीत कमी पडलेला नेता. सामन्यांना कमी प्रमाणात उपलब्ध होणारा माणूस सर्व गोष्टींवर विचार करून स्वतःला सिद्ध करण्याची धडपड बाळगणारा नेता.

राजकीय इच्छाशक्तीने मार्गक्रमण करणाऱ्या राज ठाकरे ह्या जिद्दी नेत्याला ५० व्या वाढदिवशी राजकीय "राजस्व" प्रस्थापित होवो ह्याच शुभेच्छा.

(राजकीय वारसा १)

डॉ. प्रशांत शिरोडे.

माझा राजा छत्रपती झाला..



शिवाजी महाराज... तत्कालीन परिस्थितीला आणि ऐतिहासिक नियतीला पडलेलं सोनेरी स्वप्न. स्वप्नातील विश्वाला लाभलेलं चंदेरी आकाश. विश्वातील मानवसृष्टीला भेटलेला अदभूत आदर्श. आदर्शांचा राजा म्हणावा कि राजांचा तो आदर्श. राजा म्हणून भूतलावावर हिंदुस्थानात राजस्वाचं अभिमान म्हणजे "छत्रपती". छत्रपती शिवाजी महाराज..

हिंदुस्थान सर्व बाजूनी मोगल, निजाम, कुतुबशाही सारख्या परकीय अतिक्रमणांनी वेढलेला होता. सगळीकडे मानवतेची शेकोटी पेटली होती. जंगलांतील वणवा पेटवा तसा सर्वत्र हैवानाचा कहर झाला होता. अत्याचार तर जणू खेळच बनला होता. स्वतःच्या विचारांना गुलामीचा पेहराव होता. जगण्यासाठी तुटपुंज्या भाकरीचा घास होता. कष्ट जनतेची आणि अधिकार परकीयांचा होता. हे सगळं सगळं विचित्र होत..

जिजाऊंना स्वराज्य हवं होत. रयतेला जगण्याचा अधिकार द्यायचा होता. महाराष्ट्राला पराक्रमाचा इतिहास द्यायचा होता. हिंदुस्थानाला सुवर्ण काळ द्यायचा होता. साम्रज्याशाहीतून स्वराज्य घडवायचं होत. जनतेला हक्काचा जाणता राजा द्यायचा होता. संस्कारातून संस्कृती घडवायची होती. राष्ट्रसेवा, धर्मसेवा आणि जनसेवा करायची होती. मूलभूत हक्क, न्याय आणि जगण्यासाठी स्वतंत्रता द्यायची होती. मावळ्यांच्या मनगटात पराक्रमाची मशाल पेटवायची होती. रयतेला राजा आणि राजाला छत्रपती बनवायचं होत.. ह्या सर्व मनस्वी भावनांना प्रत्यक्षात उतरवायचं होत..

शिवाजी महाराज जिजाऊंच्या स्वराज्य संस्कारात घडत असताना रयतेच्या सानिध्यात वाढत होते. रयतेच्या गरजा, इच्छा आणि अपेक्षा समजून घेत होते. जिजाऊंच्या भावनांना प्रत्यक्षात उतरवत होते. मावळ्यांना लढण्याच बळ देत होते. हे सगळं करत असताना राजे छत्रपती होणं तितकाच महत्वाचं होत. परकीयांची घोडदौड चालत असताना स्वराज्याच तोरण बांधण्यासाठी राज्याभिषेकाची तयारी चालू झाली. मावळ्यांच्या आणि रयतेच्या मनात आनंदाची दिवाळी सजवू लागली. सगळं होत असताना तत्कालीन मनोवृत्तीने क्षत्रित्वाच्या मुद्यावर राज्याभिषेकास नकार दिला. ह्या नकारानंतर काशीहून गागाभटांना राज्याभिषेकासाठी आमंत्रित करण्यात आलं. सर्व नद्या सागरांचं पाणी मागवण्यात आलं. पंचक्रोशीतील जनमाणसाला सामान्य रयतेला सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं. रायगडाला सजवण्यात आलं. सुवर्ण सिंहासन बनवण्यात आलं.

हिंदुस्थानच्या इतिहासातील सुवर्ण दिवस उजाडला आणि दैदिप्यमान राज्यभिषेक सोहळा मंत्रघोषात, चैतन्यरुपी वातावरणात, रयतेच्या आनंदात पार पडत असताना माझा राजा छत्रपती झाला...

डॉ. प्रशांत शिरोडे.

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...