राज घ्या मानाचा मुजरा..

इतिहासाची भूमी असणाऱ्या हिंदुस्थानात अनेक इतिहासानच्या गाथा लिहल्या गेल्या. जगाच्या पाठीवर ह्या इतिहासाला विशेष महत्व दिल गेलं. हिमालयाच्या इतिहासाला सह्याद्रीच्या इतिहासाची नेहमीच भक्कम साथ भेटली. सह्याद्रीच्या इतिहासाला मराठ्यांच्या ठसठशीत ज्वलंत इतिहासाची ओळख भेटली. मराठ्यांच्या इतिहासाला छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या हृदयातील "स्वराज्य" हि नवसाम्राज्याची ओळख भेटली

अनेक इतिहास झालेत, अनेक इतिहास घडवले गेले, अनेक इतिहास लिहले गेले, मात्र ह्या सर्व इतिहासात स्वराज्य हा स्वतःचा  वाटणारा एकमेव इतिहास जगाच्या पाठीवर सुमारे ४०० वर्षानंतर सुद्धा त्याच भावनेनं जिवंत आहे. कारण इतर इतिहास राजसत्तेसाठी झालीत आणि स्वराज्य हे फक्त स्वतःच्या राजाश्रयासाठी झालं.  💪🏻

शिवरायांचं स्वराज्य म्हणजे जिथं मरण्यासाठी स्पर्धा व्हायची. स्वराज्य म्हणजे स्वतःच्या हितासाठी चालली राज्यव्यवस्था, स्वराज्य म्हणजे माणसाचा माणूसपण जिवंत असण्याची भावना, स्वराज्य म्हणजे एक योग्य न्यायासाठी चालणारी न्यायव्यवस्था, स्वराज्य म्हणजे स्वतःच्या हक्कासाठी व्यासपीठ, स्वराज्य म्हणजे पोटाची खळगी भरण्याचं अन्नछत्र, स्वराज्य म्हणजे जातीधर्माचा सलोखा, स्वराज्य म्हणजे जगण्याचा हक्क, स्वराज्य म्हणजे नीतीमूल्यांची खाण, स्वराज्य म्हणजे आईबहिणीचा आदर, स्वराज्य म्हणजे शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांच्या सन्मान, स्वराज्य म्हणजे जगण्याची उमेद.. हे सगळं स्वराज्यात फक्त जिजाऊंच्या शिकवणीमुळे आणि शिवरायांच्या राजाश्रयामुळे.

युद्धनीतीत रणांगणात सैनिक पुढे आणि राजा पालखीत मागे, हा सर्व राजशाहीचा नियमच पण स्वराज्यात स्वतः राजे पुढे आणि मावळे मागे हा खरा शौर्याचा नियम म्हणजे शिवराय. गनिमीकावा हा युद्धनीतीचा नवा अध्याय राज्यव्यवस्तेला बहाल करणारे शिवराय. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांना साहसाचा इतिहास आणि स्वाभिमाचा सहवास देणारे शिवराय. सह्याद्रीच्या बाहूंना पराक्रमाचा, संघर्षाचा आणि समृद्धीचं बळ देणारे शिवराय. जनतेच्या मनातलं स्वराज्य निर्माण करणारे शिवराय. पराक्रमाची यशोगाथा रचणारे शिवराय. दिल्लीच्या परकीय शक्तीला झुकवणारे शिवराय, आम्हा मराठीजनांचा आणि तमाम हिंदुस्थानी जनतेचा अभिमान म्हणजे शिवराय.. 👏🏻

छत्रपती शिवरायांच्या जन्मदिनी मनातील भावनेचा आणि भावनेतील शब्दांचा "स्पर्श" ह्या लेखन श्रुंखलेला (मराठी ब्लॉग) जनमाणसापर्यंत  पोहचवण्याचा ध्यास हाच मानाचा मुजरा.. राज घ्या मानाचा मुजरा..

 डॉ. प्रशांत शिरोडे.😌

२२ टिप्पण्या:

  1. छान लिहिलय डॉ. प्रशांत ����
    पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा ������

    उत्तर द्याहटवा
  2. खुप छान लेख,असेच लेख हयापुढेही यावे हयासाठी शुभेच्छा-अशोक शेंडे

    उत्तर द्याहटवा
  3. खुप छान लेख,असेच लेख हयापुढेही यावे हयासाठी शुभेच्छा-अशोक शेंडे

    उत्तर द्याहटवा
  4. प्रशांत सर, आपला ध्यास हाच आमचा सहवास।

    उत्तर द्याहटवा
  5. उस्फुर्त लिखाण..

    शिवरायांबद्ल, स्वराज्यव्यवस्थेबद्दल कितीही वाचले लिहिले तरी कमीच...दरवेळी प्रत्येकाच्या लेखणीतून राजे आणी स्वराज्याचे मावळे नव्यानेच उमगले.
    👍

    उत्तर द्याहटवा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...