शिवजन्मोत्सव


जगाच्या पाठीवर सुमारे चारशे वर्षानंतर कुण्या राजाची जयंती साजरी होत असेल तर तो एकमेव राजा म्हणजे "छत्रपती शिवाजी महाराज"..

सकाळी उठल्यावर सगळीकडे भगवमय वातावरण बघताना, मनाशी कुठंतरी प्रश्न पडल्यासारखं वाटतंय कि शिवजयंती मागच्याच महिन्यात झाली आणि मग आज पुन्हा कशी? प्रश्न तसा स्वाभाविक आणि गंभीर सुद्धा तितकाच आहे. शिवरायांची जयंती दोन वेळा का साजरी होते? जयंती तारखेला का तिथीला? महाराज महापुरुष का दैवपुरुष? शिवजयंती नक्की कधी सुरु झाली? शिवजयंती कोणी सुरु केली? लोकमान्य टिळकांनी कि महात्मा फुलेंनी? महान शिवचरित्राला हि द्विमनस्थिती मान्य असेल का?

अनेक प्रश्नांच्या श्रुंखलेनंतर मनाला प्रश्न पडतो कि ज्या राजांच्या आदर्शाला जगाने डोक्यावर घेतल आणि आज ४०० वर्षानंतर सुद्धा महाराजांवर तितकंच प्रेम करत असताना मग दोन वेळा जयंती का? अनेक संशोधनानंतर अनेक न्यायालयीन संभाषणानंतर हा प्रश्न मार्गी लागत नाही. महाराज एक महान आणि पराक्रमी व्यक्ती. महाराजांचे समकालीन राष्ट्रायोध्ये गुरुनानकांना धर्मगुरू किंवा दैवपुरुष म्हणून संबोधले जात, मग शिवाजी महाराज का नाही?दुसरीकडे राष्ट्रपुरुष म्हंटल तर महाराजांसारखा दुसरा कोणीच नाही. आजकालच्या राष्ट्रपुरूषात महाराजांचा एखादा गुण असतो आणि आम्ही त्यांना महाराजांच्या पंगतीत आणून बसवतो. मग प्रश्न तोच राष्ट्रपुरुष कि दैवपुरुष? कारण ह्यावरच तारीख का तिथी? जयंती का सण?

महाराजांची जयंती हि मुळतः त्यांच्या विचारांच्या सन्मानासाठी आणि ते आत्मसात करण्यासाठी, महाराजांची जयंती राष्ट्रऐक्यसाठी आणि मानवाच्या कल्याणासाठी, महाराजांची जयंती मानवी सलोख्यासाठी आणि मनुष्य प्रेमासाठी, महाराजांची जयंती आदर्शाच्या ठेव्यासाठी आणि नीतीमूल्यांच्या वाढीसाठी, महाराजांची जयंती स्त्री संरक्षणासाठी आणि स्त्रीशक्तीच्या उत्कर्षासाठी, महाराजांची जयंती सर्वधर्म समभावासाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी, महाराजांची जयंती आदर्श घेण्यासाठी आणि त्या आदर्शांना पुढे नेण्यासाठी..

तिथी आणि तारीख सोडून ३६५ दिवस शिवजयंती साजरी करूया आणि महाराजांच्या आदर्शांना पुढे नेवून राष्ट्रहितासाठी योगदान देऊया ह्याच शिवजयंतीच्या शुभेच्छा...

जय हिंद. जय महाराष्ट्र...

डॉ. प्रशांत शिरोडे...

६ टिप्पण्या:

  1. सर्व प्रथम श्रींच्या या जन्मोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!💐
    डॉक्टर साहेब खरच आपल्या प्रगल्भ शिव विचारांना आणि उराच शिव कुंड करून त्यात शिव चरित्राच्या शब्द पुष्पांजली वाहून या अखंड शिव भारताचा आणि श्रीं च्या स्वराज्याच्या या एक शिव सेवकांचा खरंच..!
    सार्थ अभिमान..!
    शिव मुजरा .!

    उत्तर द्याहटवा
  2. ।।छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!💐।।

    उत्तर द्याहटवा
  3. धन्यवाद, आपल्या शुभेच्छा आमचा प्रेरणाश्रोत ..

    उत्तर द्याहटवा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...