स्त्री जन्मा तुझी कहाणी...



घरात मुलगी जन्माला आली कि सर्वात जास्त आनंद होतो तो बापाला आणि ह्या आनंदात बाप आपल्या अश्रुना अलगद वाट मोकळी करून देतो. जन्मानंतर लेक अंगाखांद्यावर खेळता खेळता केव्हा चालू लागते, केव्हा बोलू लागते, केव्हा पळू लागते आणि केव्हा मोठी होते ते बापाला कळत सुद्धा नाही. मुलीच्या जन्मापासून ते तिच्या लग्नापर्यंत, पोटाची खळगी भरून बाप आपल्या कमाईतला हिस्सा लेकीच्या लग्नासाठी बाजूला काढून ठेवतो. मुलीचं लग्न इच्छेसारखं करण्याचा प्रयत्न करून तो डोळ्याचं पारणं फेडतो. मुलगी जन्माला आल्यावर आनंदाश्रूना वाट मोकळी करणारा बाप, आपलं धन दुसऱ्याला देताना डोळ्यातल्या आसवांना आनंदातून दुःखाकडे घेऊन जाताना रोजच्या प्रेमासाठी कासावीस होतो... आईनंतर बापाची काळजी घेणारी व्यक्ती म्हणजे मुलगी. कारण मुलीची आई बापावर असलेली माया, तिची काळजी आणि तीच प्रेम हे काही वेगळच असत. हे फक्त मुलगी आणि मुलगीच करू शकते.

मुलगी ते स्त्री हा प्रवास तसा खूप वळणावळणाचा, जितका आनंदाचा तितका संकटांचा.. आनंद हा बालपणापासून ते शालेय जीवनापर्यंत छान चालेला असतो. शालेय जीवनानंतर तो काहीप्रमाणात सामाजिक आणि कौटुंबिक बंधनांमध्ये अडकतो. स्त्रीचा रोजच्या जीवनातला प्रवास तसा पुरुषप्रधान संस्कृतीला भेदून स्वतःला सिद्ध करण्याचा असतो. स्त्री मुळातच सोज्वळ आणि प्रेमळ स्वभावाची असते पण अन्याय विरुद्ध लढली तर रणरागिणीसारखी असते..

आपण नेहमी ऐकत असतो स्त्रीचा सन्मान व्हायला हवा, स्त्रीला चांगली वागणूक भेटायला हवी, स्त्रीला समजून घेतलं पाहिजे, स्त्रीला पुरुषांइतके अधिकार भेटले पाहिजे, स्त्रीला प्रत्येक क्षेत्रात अस्तित्व निर्माण करता यावं.. पण आपण कधी विचार केला का आपलं यात योगदान किती? स्त्रीच स्त्रीसाठी योगदान किती? घरातून विचार केला तर बाहेर सुद्धा वागणूक चांगली का भेटणार नाही? आम्ही मुलीला जीव लावतो तितका सुनेला लावतो का? बहिणीचा सन्मान करतो तितका बायकोचा करतो का? घरात होणारा स्त्रीसन्मान बाहेर होतो का? प्रश्न तसे रोजच्या जीवनातले पण आम्ही कधी मनापासून विचारात घेतले का?

दुसरी बाजू बघितली तर, अलीकडच्या काळात काहीप्रमाणात स्त्री स्वतःच्या अस्तित्वाच्या नादात सामाजिक बांधिलकी विसरून जाताना दिसतेय. ज्याचं रूपांतर घटस्फोट सारख्या विचित्र चालीरितींमध्ये होत. स्त्रीने अस्तित्व नक्की टिकवावं पण संस्कृतीच्या चौकटीत राहील तर स्त्री सन्मान झाल्याशिवाय राहणार नाही.

असो, प्रत्येकाला आई हवी, बहीण हवी, बायको हवी, मग मुलगी का नको? ह्यात स्त्रीचा वाटा तितकाच असतो. स्त्रीच्या जन्माला जर स्त्रीचीच साथ नसेल तर आपसूकच म्हणावं लागेल स्त्री जन्मा तूझी कहाणी...

महीला दिनाच्या शुभेच्छा ..

डॉ. प्रशांत शिरोडे .

६ टिप्पण्या:

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...