मैत्री..


जगाच्या पाठीवरच रक्ताचं नसून रक्तापेक्षा जास्त जवळच नातं म्हणजे मैत्री.. मैत्रीसाठी विचारांची सांगड जुळणं हा एक सर्वसाधारण सोपा नियम. मैत्रीत जे व्यक्त करू शकतो ते दुसऱ्या नात्यात व्यक्त करायला तितकं शक्य नसत.

मैत्री व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा तरुणाईचा अलीकडच्या काळातला सण म्हणजे "मैत्री दिवस" म्हणजेच "फ्रेंडशिप डे". आता प्रश्न पडतो कि हा दिवस साजरा करावा लागतो? तसं मग मदर्स दे, फादर्स डे असे नवीन नवीन सण गेल्या १०-१५ वर्षात जगाच्या पाठीवर साजरे होऊ लागले त्यातलाच एक फ्रेंडशिप डे. पाश्चत्य देशात अश्या सणाची गरज पडू लागली कारण त्यांना संस्कृतीचा वारसा नव्हता आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी ते असे सण साजरा करू लागले आणि आपण हि त्याला स्वीकारू लागलो. आपल्याकडे संस्कृतीच्या वारसामुळे अनेक सण आहेत पण आपण पाश्चत्य सणांना क्षणिक आनंदासाठी साजरा करू लागलो आणि आपल्या मूलभूतं चालीरीतींपासून तत्त्वता दूर होऊ लागलो हे तितकच कटू सत्य आहे.

फ्रेंडशिप डे १९१९ च्या सुमारास पहिल्यांदा साजरा करण्यात आला कालांतराने २०११ साली अमेरिकेच्या संसदेने ३० जुलै हा "जागतिक फ्रेंडशिप दिवस" म्हणून साजरा करण्याचं जाहीर करण्यात आलं. भारतात हा सण ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. तरुणाईचा हा सण रविवार असला तरी महाविद्यालयांचे आवार मैत्री व्यक्त करण्यासाठी भरगच्च भरलेले असतात. आपल्या कडे तस वयक्तिक नातं व्यवस्थित रित्या सांभाळलं जात आणि मैत्रीचं तर खूप छान पद्धतीने निभावलं जात. तरी मग आपल्या देशात हे खूप जास्त प्रमाणात का साजर केलं जात?

आपल्या देशात मैत्रीची अनेक प्रमाण आहेत ज्यात श्रीकृष्ण सुदामा, शिवाजी महाराज आणि मावळे, संभाजी राजे आणि कवी कलश, भगतसिंग राजगुरू सुखदेव. गरिबीची जाणीव न होऊ देता मैत्रीसाठी सुदामाचे पोहे आनंदाने खाणारा देव श्रीकृष्ण, पोटच्या पोराचं लग्न असताना स्वराज्यासाठी कोंडाणा जिकंण्याचं शिवरायांचं स्वप्न पूर्ण करून स्वर्गवासी होणारे तानाजी, शरीराराचा तुकडा तुकडा झाला पण तरी शेवटपर्यंत कवी कलशांची संभाजी महाराजांच्या मैत्रीची दिलेली साथ, स्वातंत्र्यासाठी फासाचा दोर गळ्यात पहिले जाण्यासाठी भांडणारी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेवची मैत्री. हि सर्व नाती शेवटच्या श्वासापर्यंत मैत्रीसाठी जगत होती आणि अशी एकाहून एक उदाहरण असताना आम्ही मैत्रीचा दिवस साजरा करतो..?

असो ह्या मैत्रीच्या दिवसातून जर नाती वाढत असतील, नाती टिकत असतील, नाती जुळत असतील तर नक्कीच हा सण साजरा व्हावा..
मैत्री दिनाच्या शुभेच्छा...

डॉ. प्रशांत शिरोडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...