पक्षांतर...


फ्लेमिंगो (रोहित) पक्षी आपल्या मूळ जागेपासून काही कालावधीसाठी एका विशिष्ट मोसमात महाराष्ट्रात येतो आणि आपल्या ठरलेल्या वास्तव्यानंतर पुन्हा मूळ जागेवर परततो. ह्या दोन जागेतील पक्षाचं अंतर म्हणजे काही तरी बदल व्हावा म्हणून केलेलं पक्षांतर...

सध्या महाराष्ट्रात असंच काहीतरी चाललंय. एका पक्षाने जणू मेगाभरतीच भरवली आहे.. हि मेगाभरती जर तरुणांच्या नोकरीसाठी असती तर बेराजगोरीचा प्रश्न काही स्वरूपात सुटला असं वाटलं असत, पण सध्यस्थितीत चाललेली मेघाभरती हि राजकारणातली आहे.. रोज माध्यमातून भरतीची बातमी आहेच. अरे काय हे..? राजकारण कोणी करावं ज्याने पक्षासाठी हाडामासाचा कार्यकर्ता म्हणून काम केल्यानंतर पक्षाच्या घटनेने मोठा होऊन नेता झालेल्या व्यक्तीने.. पण होत काही वेगळच.. कार्यकर्ते कुणाचे आणि नेते कुणाचे.. सगळं काही सत्तेसाठीच...

पक्षनिष्ठा, पक्षशिस्त, पक्षकार्य, पक्षप्रेम, पक्षधोरण, पक्षप्रेरणा, पक्षघटना हे सगळं जुन्या राजकारणातील पैलू म्हणण्याची वेळ महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यावर आली. भारतवर्षाला राजकारणाचे नवनवीन धडे शिकवणारा महाराष्ट्र जणू चुकीच्या विषयाचा धडा भारतीय राजकारणाला शिकवतोय कि काय?पक्षनिष्ठा जणू खुंटीला शर्ट टांगतो तशी टांगून ठेवलीये, जसा शर्ट केव्हाही टांगायचा आणि केव्हाही घालायचा तशी पक्षनिष्ठा. पक्षशिस्त?? शिस्त नावाचा शब्दच राजकारणातून हद्दपार झाला असं म्हंटल तर चुकीचं ठरणार नाही. पक्षकार्य हाडामासाच्या कार्यकर्त्याने करावं पण हाडमास फक्त निवडणुकीच्या काळात खाण्यापुरती राहिलीत. पक्षप्रेम म्हणजे सत्तेची लाचारी. पक्षधोरण म्हणजे मतदारसंघ काबीज करून आपला माणूस तिथे बसवण. पक्षप्रेरणा म्हणजे जुन्याजाणत्या लोकांनी उभ्या केलेल्या पक्षाच्या विचारसारणीला बाजूला करून फक्त स्वहितासाठी अयोग्य गोष्टींचा पायंडा पाडणं. पक्ष घटना म्हणजे दिल्लीतील एकदोघांच्या आदेशावर राज्य चालवण. सगळं सगळं बघावं ते सत्तेसाठीच..

स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर देशाला राजकारण शिकवणारा महाराष्ट्र.. आज तोच महाराष्ट्र कदाचित आपल्या स्वाभिमानाचा मानबिंदू आणि स्वराज्यशिकवणं विसरतोय कि काय? राज्याच्या विकासासाठी प्रांतीय पक्ष टिकावेत आणि राज्याच्या प्रगतीसाठी विरोधी पक्ष असावेत. पक्षांतराचं राजकारण थांबून महाराष्ट्र राज्याच्या विकासाचं, मराठमोळ्या भूमिपुत्रांच्या रोजगाराच, काळ्यामातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताचं राजकारण झालं तर शिवरायांना सुद्धा महाराष्ट्राच्या स्वाभिमानातला अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही...

डॉ. प्रशांत शिरोडे.

२ टिप्पण्या:

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...