विश्वविजेता...


"अरे यार न्यूझीलंड जिंकायला हवं होत, काय मॅच झाली जबरदस्त, वर्ल्डकप फायनल व्हावी तशीच मॅच झाली, वर्ल्डकप फायनलला सुपरओव्हर?? काय खेळला स्टोक्स, विलिअमसनने काय कॅप्टनशिप केली".. हे सर्व कालच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर तर ते आतापर्यंतच्या चर्चेचा विषय..

भारतीय टीम विश्वचषकातून सेमी फायनल हरल्यानंतर भारतीयांचा ह्या स्पर्धेत रस राहिलाच नव्हता कारण विश्वचषकाचा ह्या वर्षीचा प्रभळ दावेदारचं स्पर्धेतून बाहेर गेला होता. विश्वचषकात १० पैकी ८ संघाना धूळ चारणारा भारतीय संघ ज्या दोन संघांसोबत पराभूत झाला तेच दोन संघ अंतिम सामन्यात पहिल्यांदा विश्वचषकाचे दावेदार  होण्यासाठी खेळत होते. गेल्या दोन्ही विश्वचषकात अंतिम सामन्यात पराभूत झालेला न्यूझीलंडचा संघ ह्या विश्वचषकात जिंकावा अशी कुठेतरी परिस्थिती झाली होती. इंग्लंड २७ वर्षानंतर अंतिम सामन्यात आपलं नशीब अजमावत होता. क्रिकेट ह्या खेळाला जन्म देणारा इंग्लंड हा क्रिकेटचा विश्वउत्सव असलेला चषक जिंकू शकला नव्हता.

विश्वचषकाचा कालचा अंतिम सामना म्हणजे न भूतो न भविष्यती. इंग्लंडची फलंदाजी चालू असताना हा सामना इतका रोमांचक होईल असं मुळीच वाटत नव्हतं. अखेरच्या चेंडूवर मॅच वेगळ्याच वळणाकडे गेली आणि अंतिम पर्याय सुपरओव्हर झाली आणि तिथे पण मॅच अंतिम चेंडूपर्यंत पोहचली आणि जास्त चौकारांच्या जोरावर क्रिकेटचा जन्मदाता इंग्लंड विश्वविजेता संघ झाला आणि न्यूझीलंडने विश्वचषकाचा अंतिम सामना पराभूत होण्याची हॅट्ट्रिक केली. इंग्लंडने १९७९, १९८३ आणि १९९२ ह्या तीन विश्वचषकात अंतिम सामन्यात हारल्याची जखम अंततः भरून काढली आणि ४४ वर्षाची विश्वचषक जिंकण्याची प्रतीक्षा संपली.

१९७५ पासून सुरु झालेला विश्वचषक ऑस्ट्रेलियाने पाच वेळेस, वेस्टइंडीज आणि भारत २ वेळेस, श्रीलंका आणि पाकिस्तान १ वेळेस जिंकला. कालच्या अंतिम सामन्यात एक वेगळाच खेळ बघायला भेटला आणि क्रिकेटच्या पंढरीत क्रिकेट जिंकल्याची भावना मनाला जाणवली. इंग्लंड संघ विजेता ठरला त्याबरोबरच न्यूझीलंड उत्कृष्ट उपविजेता संघ ठरला... वेल्डन इंग्लंड.. नाईस प्लेड न्यूझीलंड..

डॉ. प्रशांत शिरोडे.

४ टिप्पण्या:

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...