स्वराज...



"ज्या दिवसाची वाट पाहत होते तो आज आला" असं तीन तासापूर्वी देशाच्या काश्मीर मुद्यावरून आपलं मत व्यक्त केलं. कदाचित ह्या दिवसाची त्या वाट पाहत होत्या. काश्मीरचा ट्विट हे त्यांचं शेवटचं ट्विट. काश्मीर आज खराखुरा स्वराज्याचा आनंद लुटत असताना नावात स्वराज असणाऱ्या सुषमा स्वराज हृदयाच्या झटक्याने कालवश झाल्यात.

वयाच्या २७ व्या वर्षी सर्वात कमी वयातील कॅबिनेट मंत्री, पहिली महिला विपक्ष नेता, पहिल्या दिल्लीच्या महिला मुख्यमंत्री. हरियाणात जन्म झाल्यानंतर मध्यप्रदेश मध्ये आपली राजकीय कर्मभूमी विस्थापित करणारी लोहमहिला होत्या. इंदिरा गांधींनंतर दुसऱ्या परराष्ट्र मंत्री. सात वेळा खासदार आणि तीन वेळा आमदार असल्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. भारताचं वर्चस्व विदेश स्थरावर नेताना आपल्या संभाषणाने जगाला भारत बदलतोय हे दाखवण्यात त्या यशस्वी ठरल्या होत्या.

पेशाने वकील असणाऱ्या सुषमांनी आपला पेशा लोकसभेत आपल्या खणखणीत आवाजाचा ठसा उमटवला. कुठलाही राजकीय वारसा नसताना अटलजी आणि मोदींच्या मंत्रिमंडळात आपल्या कार्यशैलीचा प्रभाव पाडला. बोलण्यातील तारतम्य, बोलण्यातील कौशल्य, बोलण्यातील सभ्यता आणि बोलण्यातील राजकीय शैली त्यांच्या नसानसात भरलेली होती. भारतीय जनता पक्षाला जनतेच्या नजरेत उंचावण्याच मुख्य काम करणाऱ्या त्या एक जनमाणसातल्या नेत्या होत्या. परराष्ट्रमंत्री असताना जगातील कुठल्याही भारतीयाला मदत हवी तर ती ते स्वतः करत होत्या. त्यांच्या ह्या कार्यशैलीची जगभरात चर्चा झाली होती.

बाळासाहेब ठाकरेंनंच्या इच्छेतील असलेल्या प्रंतप्रधान, भारतीय जनता पार्टीतील महिला शक्तीच्या नेत्या आज आपल्यात नाहीत. संसदेत सर्वाना ऐकवास वाटणार उत्कृष्ट हिंदी वक्तृत्व असलेला आवाज आज शांत झाला...

भावपूर्ण श्रद्धांजली..

डॉ. प्रशांत शिरोडे.

८ टिप्पण्या:

  1. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...