खेळ मांडला...



महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हाच विषय सत्तेसाठी महत्वाचा ठरला.. निवडणुकीच्या आधी नेत्याची पक्षनिष्ठा खुंटीला टांगलेली बघितलेली असताना आता पक्षाचीच निष्ठा खुंटीला टांगलेली महाराष्ट्राने बघितली. एकंदर निष्ठा, प्रतिष्ठां ह्या राजकारणातील गोष्टी इतिहास जमा झाल्यासारखं दिसतंय..

युती आणि आघाडी जणू राजकीय परिस्थिती पाहून जुळवाजुळव करतायेत.. वैचारिक मतभेद असतील तर राजकीय मत एक होताना दिसतायेत. सत्ता केंद्रस्थानी असं महत्वाचं आहे आणि ते असावं कारण सत्तेचा उपयोग जसा होतो तसा दुरुपयोगही करता येतो हे मागील सरकारने राज्यात करून दाखवलं. सत्तेतून सामन्याचे प्रश्न सोडवण्यापेक्षा राजकारणातील चढाओढ कशी करता येईल ह्याकडे आवर्जून लक्ष दिल गेलं.

पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला शोभेसा निकाल महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत लागला. महाराष्ट्र जणू आता आमची मक्तेदारी आहे आणि आम्ही म्हणू तेच होईल अश्या दुनियेत असणाऱ्या लोकांना महाराष्ट्राने सत्तेच्या गणितापासून दूर ठेवलं. सत्तेचं गणित अपुरं पडत असताना सुद्धा आम्ही म्हणू तेच ह्या अविर्भावात असल्यामुळे सत्तेची चावी मागील सत्ताधाऱ्यांच्या हातून जाताना दिसतेय. मित्रपक्षाला ठरवलेली पद देण्यापेक्षा विरोधात बसणं महत्वाचं मानलं गेलं. ह्यातून प्रादेशिक पक्षांना कमी लेखण्याशिवाय दुसरी कोणतीही भावना दिसत नाही.

राज्यातला शेतकरी अवकाळी पावसाने होरपळला आहे पण ह्याची जाण राजकीय पक्षांना नाही कारण त्यांचा सत्तेचा खेळ काही संपताना दिसत नाही. राज्याच्या विस्कटलेल्या घडीला बसवण्यासाठी आता सरकारची गरज आहे. राष्ट्रपती लागवट राज्याला न परवडणारी आहे. सत्तेचं गणित जुळवताना राज्याने चांगले धडे दिले जेणेकरून कोणी राज्याला आपली मक्तेदारी समजणार नाही. ज्या राज्याने अनेक चांगली सरकार बघितली, आज तेच राज्य सत्तेसाठी, सरकारसाठी आस लावून बसलंय.

जी सत्ता नीती बिघडवताना दिसतेय, तीच सत्ता चांगल्या नीतीने राज्याच्या विकासाला गती देवो ह्याच सदभावना..

डॉ. प्रशांत शिरोडे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...