सूत्र...



सूत्रांच्या माहितीनुसार किंवा विश्वसनीय सूत्रांनुसार किंवा खात्रीलायक सूत्रानुसार हे शब्द इलेक्ट्रॉनिक मीडियावर नेहमी ऐकू येतात, पण सध्याच महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तर ह्या सूत्रांनी राजकीय पक्षांपेक्षा जास्त काम केलेलं दिसत.

सूत्रांनी विश्वसनीय आणि खात्रीलायक होताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच नव्हे तर मंत्रिमंडळच बनवून टाकलं. युती आणि आघाडी पेक्षा सुंत्राचीच माहिती जास्त येत होती, ती इतकी कि नवीन होणारी आघाडी जणू सुत्रानीच घडवून आणली काय? असा प्रश्न सामन्यांना पडू लागला. नवीन होणाऱ्या आघाडीला सूत्रांनीच महाशिवआघाडी आणि नंतर महाविकासआघाडी नाव देऊन टाकलं. सूत्रांनी संभाव्य मंत्रिमंडळ बनवलं, सूत्रांनी अनेक फार्मुले बनवली.. खरंच ह्या सूत्रांच कुतुहूलच..

ह्या सूत्रांनी बाकी कमालच केली, बंददरवाजाआडच्या बैठकीतले विषय सुध्दा सूत्रांनी आम जनतेसमोर आणलीत. सूत्रांनी तर नेत्यांच्या मनातल्या गोष्टीसुध्दा ओळखून सांगून टाकल्या. सरकार स्थापण्यासाठी पाठिंब्याचं पत्र प्रत्यक्षात अजून भेटलं नाही पण खात्रीलायक सूत्रांनी ते पोहचल्याच सांगूनही टाकलं. सूत्रांनी अनेकांच्या भेटीगाठीही परस्पर घडवून आणल्या आणि त्या भेटीगाठीनमधले निर्णयही सांगून टाकले.

नक्की हे सूत्र कोण असतील? हा प्रश्न जणू सगळ्यांनाच पडला असेल.. कदाचित हा प्रश्न महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल? ह्या प्रश्नापेक्षा जास्त महत्वाचा झाला आहे. हि सूत्र म्हणजे त्या पक्षातील कोणी व्यक्ती असतील किंवा त्या ठिकाणी काम करणारे नौकर किंवा पत्रकारांच्या मनातलाच असू शकतो. जो असेल तो पण सूत्रांनी काम मात्र अगदी जोमानं केलं, क्षणभरासाठी सामान्यांच्या मनातील प्रश्नांना उत्तर देवून तात्विक समाधान करून टाकलं.

आता प्रतीक्षा सरकार बनण्याची आणि खात्रीलायक सूत्रांची माहिती विश्वसनीय होण्याची...

डॉ. प्रशांत शिरोडे..

२ टिप्पण्या:

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...