धाकल धनी..



लालबुंद सळ्यांनी राजांचे डोळे खोबण्यांनी जाळून टाकले.. हे वाक्य ऐकून सारा महाराष्ट्र रडला.. त्याच कारणही तसंच स्वराज्यरक्षक संभाजी मालिका शेवटच्या टप्प्यात असताना छत्रपती संभाजी महाराजांवर मरण यातनांची सुरवात गनिमांकडून झाली, त्या भागातील हे वाक्य... आणि आजच्या भागातील "राणीसाहेब, नव वर्षाची गुढी उभारता येणार नाही, औरंगजेबाने महाराजांना मृत्युदंडाची शिक्षा दिली".. सर्व काही मनाला लागून गेलं..

जगावं तर शिवसारखं आणि मरावं तर संभासारख.. छत्रपती संभाजी महाराजांची ज्या भूमीत पराक्रमाची यशोगाथा लिहली गेली त्या भूमीला हा पराक्रमच माहित नव्हता. डॉ. अमोल कोल्हे ह्या माणसाने हे शिवधनुष्य उचललं आणि जगाच्या पाठीवर ह्या इतिहासाच्या सुवर्ण क्षणांना हृदयस्थ भिडवल. मालिकेतील प्रत्येक पात्राने इतिहासाचे हे क्षण उभेउभ डोळ्यासमोर आणले. महाराष्ट्र हि शौर्याची भूमी, हि शिवरायांची भूमी, हि जिजाऊंची भूमी आणि त्याच भूमीने हे सुवर्णस्वप्न अनुभवलं..

येसूबाई, संभाजी महाराज, सोयराबाई, अनाजी पंत, बहिर्जी नाईक, हंबीरमामा आणि औरंगजेब ह्या पात्रांसह सर्वच पात्रांनी मालिकेला एक वेगळ्या उंचीवर घेऊन गेले. मालिकेच्या शेवटच्या भागापर्यंत रसिकप्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. प्रत्येक भागातील प्रेक्षपण, प्रत्येक वाक्यातील भारदस्त इतिहास, प्रत्येक पात्र उभेउभ प्रेक्षकांच्या मनात बसवण्यात हि मालिका यशस्वी झाली..

ह्या मालिकेच्या शेवटच्या भागापर्यंत संभाजी महाराजांच्या मृत्यूवर प्रसारमाध्यमांनी, लोकांनी जितकी चर्चा केली तितकी मालिकांच्या इतिहासात कुठल्याही मालिकेची झाली नाही. स्वराज्याच्या धाकल्या धन्याच्या प्रत्येक क्षणांना डॉ. अमोल कोल्हे सारख्या दमदार कलाकाराने तितक्याच दमदार शैलीत प्रेक्षकांच्या समोर उभं केलं. आज मालिकेच्या शेवटच्या भागात प्रेक्षकांच्या अश्रुनी ह्या मालिकेला अलविदा दिला...

जाता जाता स्वराज्याच्या धाकल्या धन्याचा इतिहास जगासमोर आणणाऱ्या डॉ. अमोल कोल्हेंचे मनस्वी आभार. तुमचे हे उपकार स्वराज्यभूमी नक्कीच विसरणार नाही..

डॉ. प्रशांत शिरोडे.

५ टिप्पण्या:

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...