युद्ध आमचे सुरु..


जगाला हलवून टाकणार विषाणूच्या महाकाय  प्रसाराने जगभरात युद्धजन्य परिस्थिती झालेली दिसत आहे. हे युद्ध कोरोना नावाच्या विषाणूच आणि मानवजातीच आहे. "माणसा कधी माणूस होशील रे" ह्या वाक्याप्रमाणे माणसाला दुसऱ्यासाठी नाही  तर स्वतःसाठी माणूस होवून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेवून सामाजिक आरोग्याच्या काळजीची घेण्याची गरज आहे.

सगळीकडे चिंतेचं वातावरण आहे, दिवसेंदिवस कोरोनाच संकट गडद होत चाललंय. चीन, अमेरिका आणि युरोपियन देशांनी ह्या युद्धात दोन पावले मागे घेतली आहेत. हा विषाणू अगदी ताकदीने जगावर राज्य करू पाहत आहे. पहिल्या टप्यात ह्या एक देशातून दुसऱ्या देशात प्रवेश करतो. दुसऱ्या टप्यात हा दुसऱ्या देशातून येवून स्थानिक लोकांमध्ये पसरतो. तिसऱ्या टप्यात तो महाभयानक रूप धारण करतो आणि चौथ्या टप्यात तो माघार घ्यायला सुरवात करतो. पाचव्या टप्यात तो हरण्याची तयारी चालू करतो. आज ज्या चीनमध्ये हा विषाणू प्रथम युद्धासारखं थैमान घालत होता त्याच चीनमध्ये पाचव्या टप्यात आहे. भारत आज दुसऱ्या टप्यावर ह्या युद्धाचा सामना करत आहे.

भारतातील ह्या युद्धाची काळजी योग्यरीत्या घेत असताना काही नागरिकांच्या चुकीच्या मानसिकतेमुळे ह्या विषाणूच्या संसर्गाला खतपाणी भेटत आहे. हा लढा जगण्याचा आणि जगवण्याचा आहे. आपण डॉक्टर, पोलीस ह्यांसारखी कुठलीही विशेष जबाबदारी स्वीकारत नसताना ह्या विषाणूच्या साखळीला तोडण्यासाठी घरातच बसून स्वतःची काळजी घेत ह्या युद्धात आपल्यासाठी आणि आपल्या भारतीयांसाठी सामील व्हा. संयम बाळगताना सामाजिक भान ठेवा. पुढील दहा दिवस ह्या युद्धाच्या खऱ्या   लढतीचे आहेत. घरात बसा, स्वच्छता राखा, हात धुवा, कोणाच्याही संपर्कात येवू नका.. बस इतकं केलं तरी हि भारतमातेची सेवा करण्यासारखं झालं.

सरकारने काळजी घेताना ज्या सूचना दिल्या त्याच काटेकोरपणे पालन करा. कारण सरकार जगाच्या अनुभवाने ह्या युद्धाला सामोरं जात आहे. उद्याच्या जनता कर्फ्यूत पूर्णपणे सामील व्हा म्हणजे कोरोना विषाणूची वाढती साखळी कुठेतरी तुटण्यास मदत होईल. पुढील दहा दिवस असाच संयम ठेवला तर हे युद्ध कमी कालावधीत जिंकणारा भारत एकमेव देश राहील.

शास्रज्ञ नवीन शोधासाठी प्रयत्न करतायेत. डॉक्टर्स आणि आरोग्यसंस्था आपली भूमिका
सैनिका प्रमाणे बजावतायेत. पोलीस नेहमीसारखं
जीवाची पर्वा न करता आपली काळजी
घेतायेत. आता आपल्याला ह्या सर्वांच्या खांद्यावरील ओझं कमी करण्यासाठी स्वतःला शिस्त लावून घ्यायची आहे.

भारतभूमीने अनेक युद्ध लढलीत आणि जिंकलीतही. हे युद्धही जिंकायचं आहे आणि ते जिंकणारच, फक्त घरात राहून ह्या युद्धाला तोंड देताना नियमांचं पालन करून सुरु असलेल्या प्रादुर्भावाला रोखू या आणि सर्वांमिळून म्हणूया "युद्ध आमचे सुरु आणि आम्ही कोरोनाला नक्की हरवू...".

डॉ. प्रशांत शिरोडे..

३ टिप्पण्या:

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...