रात्र वैऱ्याची..



अनेक संकटांचा सामना करत पुन्हा नव्याने सुरवात करणारा हिंदुस्थान.. आज हाच हिंदुस्थान एका कोरोना विषाणूच्या संकटाच्या उंबरठ्यावर येवून उभा राहिला आहे. रोज जगातल्या कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय, त्या पाठोपाठ भारताचाही वाढतोय. गेल्या १५ दिवसापूर्वी सर्व काही दिवसासारखं चाललं होत आणि आज अचानक काळरात्र आली. हि वेळ तशीच आहे, जी हिंदुस्थानच्या "वसुदेव कुटुंबकम" ह्या सकारत्मक विचाराने जगाला वाचवण्याच्या तयारीत आहे. आपण वाचू तर राष्ट्र वाचेल आणि राष्ट्र वाचल तर विश्व वाचेल.

आज शेअर मार्केट मध्ये गुतुवणुकदारांचं ५२ लाख हजारांच नुकसान झालं. उद्या हे कुठं जाईल याची शास्वती देता येत नाही. आज देश २१ दिवस बंद असेल आणि हा बंद जर यशस्वीरीत्या पाळला तर देश २१ वर्ष मागे जाण्यापासून वाचेल. आज भारतात मुंबईतल्या ५ डॉक्टरांना अहोरात्र उपचार करताना त्यांच्यातच कोरोनाचे लक्षणे दिसून आले. वेळीच दक्षता घेतली नाहीतर अनेक डॉक्टरांना ह्यातून जावं लागेल. प्रत्येक ४०००० माणसांमध्ये एक व्हेंटिलेटर आहे. जर हि महामारी पसरली तर इटली सारखी परिस्थिती निर्माण होईल. कोणता माणूस मारायचा? हा प्रश्न निर्माण होईल. मुंबई सारख्या शहरात ६० लोकांची दिवसाला कोरोना टेस्ट होते. उद्या हि परिस्थिती ओढवली तर साधी टेस्ट सुद्धा करता येणार नाही.

कोरोनाच्या संकटाला सकारत्मक घ्या. धकाधकीच्या जीवनात आपण कुटुंबाला, स्वतःला वेळ देऊ शकत नाही, तो वेळ आता भेटतोय. जीवन जगून घ्या. स्वतःला कामाशिवाय २० दिवस शांत बसता येत ह्याची परीक्षा करून घेताना स्वतःच्या विचारणा चालना द्या. आपला कुठला छंद असेल तर तो मनसोक्त जोपून घ्या. रोज टीव्ही बघायला भेटत नाही, ती हवी तेवढी बघून घ्या. घराची साफसफाई दिवाळीलाच होते ती ह्या दिवसात स्वतःहून करून घ्या. आनंदाने जगण्याची संधी आली आहे तीच सोन करून घ्या. भारत मातेचा अभिमान राष्ट्रगीतापुरता न ठेवता सरकारच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन राष्ट्रभक्ती सिद्ध करा..

केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांच्यापरीने योग्य पावलं उचलत आहे. आजपासून सारा देश लॉक डाउनच्या छायेत पुढील एकवीस दिवस राहणार आहे. प्रशासन सर्व परीने येणाऱ्या महाभयानक परिस्थितीला येण्यागोदरच थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. देश वाचविण्यासाठी डॉक्टर, पोलीस, प्रशासन स्वतःचा जीव धोक्यात टाकून आपल्याला घरीच बसण्याचं आव्हान करत आहे. ह्या सर्वाना कुटुंब आहेत पण आपल्या भारत भूमीच्या प्रेमापोटी ते देवदूत बनले आहेत. सीमेवरच्या सैन्यासारखं कोरोनाच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यांच्या सुरक्षेतेसाठी, भारतमातेच्या संरक्षणासाठी आपल्याला स्वतःची काळजी घ्यावी लागेल आणि तीच देशाची काळजी घेतल्यासारखाच असेल. आपण घरात बसून देश वाचवू, आपल्या प्रशासनाचं मनोधैर्य वाढवू.

डॉ. प्रशांत शिरोडे..

४ टिप्पण्या:

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...