छावा शिवरायांचा...


जन्मापासून मरेपरेपर्यंत अनेक संकटाना जवळ करत पराक्रमाची यशोगाथा भूतलावावर गाजवणारा पराक्रमी, बुद्धिमान, महायोद्धा, स्वराज्य संवर्धक, धर्माभिमानी राजा म्हणजेच शिवपुत्र संभाजी राजे..

शंभूराजे जन्माला आले तेव्हा छत्रपती शिवरायांना आनंदाची बातमी कानावर पडली कि युवराज जन्माला आले पण ते पालथे जन्माला आले. हि बातमी म्हंटल तसं शुभबरोबर अशुभ, पण त्यावर शिवराय तितक्याच आनंदाने म्हणाले "हो युवराज पालथे जन्मले ते स्वराज्य संकटाना पालथे करण्यासाठीच". जन्मावेळी शिवाजी महाराजांच्या ह्या आनंद उदगाराला प्रत्यक्षात सार्थ ठरवणारा राजा म्हणजे संभाजी महाराज. जिजाऊंनी आपल्या मोठ्या पुत्राच्या स्मृतिना आठवणीत ठेवण्यासाठी शिवपुत्राचं नाव संभाजी राजे ठेवलं होत. संभाजी राजांना जन्माच्या दोन वर्षांनंतर जन्मदाती आई सोडून गेल्याच दुःख जिजाऊंनी भरून काढलं. जिजाऊनच्या शिकवणीत स्वराज्याच दुसरं राजाश्रय घडवलं, वाढवलं आणि स्वराज्यासाठी उभं केलं.

वयाच्या ९ व्या वर्षी स्वराज्यासाठी मोगलांच्या तहात राजा जयसिंगाच्या अटीवर औरंगजेबाची मनसबदार आनंदाने घेणारा संभाजी राजा. वयाच्या १३ व्या वर्षी सुरतेवर चाल करून सुरत लुटणारा शिवाजी महाराजांचा पराक्रमी संभाजी राजा. वयाच्या १४ व्या वर्षी बुधभुषणम नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिणारे शास्र पंडित संभाजी राजे. संस्कृत, ऊर्दू, इंग्रजी सह १४ भाषणावर प्रभाव असणारे संभाजी राजे. अतिशय सुरेख नियोजनाने छत्रपती शिवरायांना आग्र्याच्या बंदीतून सोडवणारे शंभूराजे.. आग्र्याच्या भेटीत औरंगजेबाने कुस्तीसाठी आमंत्रित केल्यावर औरंगजेबाला उभ्या दरबारात बोलणारा "आमच्या लायकीचा कुस्तीगीर तुमच्या दरबारात नसल्याचं ठणकावून सांगणारे" पराक्रमी संभाजी राजे. वयाच्या १७ व्या वर्षी स्वराज्याचे पहिले युवराज म्हणून सन्मानित होऊन शिवरायांच्या राज्यकारभाराला सन्मानित करणारे राजकारणी संभाजी राजे. औरंगजेबाने कंटाळून आपला राजसन्मान मुकुट काढून, जो पर्यंत संभाजीला अटक करणार नाही तो पर्यंत राजमुकुट घालणार नाही अशी प्रतिज्ञा ज्यासाठी घेतली तो शौर्यपुरुष म्हणजे संभाजी राजे. स्वराज्य जिंकण्यासाठी स्वतः औरंगजेबाला दखनात येण्यास भाग पाडून त्याच स्वराज जिंकण्याचा स्वप्न अपूर्ण ठेवणारे संभाजी राजे. औरंगजेब, आदिलशाह, निजामशाह ह्या सर्व राजशायाना सळो कि पळो करणारा महापराक्रमी शंभू राजा. जगाच्या पाठीवर एक हि लढाई न हरणारा शौर्यपुरुष म्हणजे शिवपुत्र संभाजी महाराज.

स्वतःच्या स्वराज्यात आप्तस्वकीयांकडून वाईट वागणूक भेटल्यावर त्यावर मात करून स्वराज्य रक्षक झालेले संभाजी राजे. तत्कालीन दृष्ट राजकारणामुळे वडिलांच्या अंत्यसंस्कारास मुकणारे, रायगडावर दाखल झाल्यावर पुन्हा महाराजांचे अंत्यसंस्कार विधी पूर्ण करून घेणारे संभाजी राजे. स्वतःच्या नातलगांकडून फसवणूक होऊन औरंगजेबाच्या जाळ्यात अडकवलं गेल्या नंतर मरण यातना भोगताना अंगाची कातडी, हाताची नख, कान, डोळे, जीभ असे एक एक अवयव कित्येक दिवस काढत असताना औरंगजेबाची धर्मांतराची मागणी मरेपर्यंत न स्वीकारणारा धर्माभिमानी संभाजी राजा. म्हणूनच म्हंटल जात "जगावं तर शिवासारखं आणि मरावं तर संभासारखं".

जन्मापासून मरेपर्यंत संकटाना हरवणारा महान योद्धा औरंगजेबाच्या अनेक मरण यातना स्वीकारत शिवरायांच्या स्वराज्य स्वाभिमान शिकवणुकीला सार्थ ठरवून ११ मार्च १६८९ रोजी मरणाला आनंदाने जवळ करणाऱ्या युगपुरुष संभाजी महाराजांना स्मृतीदिनी मानाचा मुजरा..

जय हिंद.. जय महाराष्ट्र...

डॉ. प्रशांत शिरोडे.

२ टिप्पण्या:

  1. यावन रावण कि सभा शंभू बद्धयो बजरंग
    लहू लसतसम खूब खेल्यो रण रंग
    जो रवी छवी लढत होत बद रंग
    तो तुव तेज निहारी तखत तजो औरंग..!

    फाल्गुन वद्य अमावस्या, भीमा इंद्रायणी अश्रू ढाळत होत्या, संगमेश्वर वढू ची धरती राजेंच्या रक्ताने माखून निघाली होती..!
    राजे आणि कविकलश मुखात जिव्हा नसतांना मनसोक्त गप्पा मारत होते..!
    उभ्या स्वराज्याला जपण्याच्या आणि धर्माच्या संरक्षणाच्या..!
    💐
    शंभू राजे बलिदान दिवस, त्रिवार मानाचा मुजरा..!

    उत्तर द्याहटवा
  2. संभाजी महाराजांना स्मृतीदिनी मानाचा मुजरा.......

    उत्तर द्याहटवा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...