राजा त्रैलोक्याचा


स्वर्गाला चाहूल लागली होती, चैत्र पौर्णिमेच्या प्रकाशात सुद्धा अंधाराची दिशा भरकटली होती, चैत्राची देवदेवतांची पूजा मंदावली होती, मजीद मध्ये नमाज पठणानंतर अर्ध्या चंद्रकोराची आस संपली होती, देव पाण्यात आणि जनता पाण्यातल्या देवाकडे आस लावून बसली होती, तोंडाला अन्नाचा घास लागत नव्हता, पाचाडला रायगडाची आस लागली होती, रायगडाच्या प्रवेशद्वारात मावळ्यांची रात्रंदिवस चिंता लागली होती, सहयाद्रीच्या कड्याकपारातला वारा शांत झाला होता, गनिमाला चुणूक लागली होती. सगळं अघटित घडल्यासारखं वाटत होत.. शिवरायांना गोड लागत नव्हतं. आमचं राज दिसत नाही म्हणून सार रान कासावीस होत होत. शिवबा संभाजी राजांची वाट बघत होते. नियतीच्या मनात काहीतरी वेडंवाकडं चालू होत..

सगळ्यांना राजाला बर वाटत नसल्याची खबर भेटली होती, स्वराज्याचा धनी काहीतरी संकटात आहे म्हणून जनता काळजाचा ठोका लावून धरत होती. राजाला कुणी काहीतरी केलं नाही ना? ह्या प्रश्नात जनता व्याकुळ झाली होती. शिवरायांवर असच एकदा विषप्रयोग करून संकट आणलं गेलं होत, सर्व उपचार झाले होते तरीही ह्या संकटातून शिवरायांना एक वैदूबाबान संजीवनी देऊन वाचवल होत. त्या वैदूबाबाला संभाजी महाराजांनी जीवाची काळजी न करता आपल्या पाठीवर धावत धावत घेऊन गडावर आणलं होत. महाराजांना बर करण्यात यश आलं होत. शंभूराज्यांच्या प्रयत्नाला फळ भेटलं होत. महाराज बरे झाल्यानंतर वैदूबाबाला महाराजांनी विचारलं बाबा काय हवं तुम्हाला? तेव्हा वैदू बाबा म्हणाला "राज तुमच्या मुळे जगतोय तुम्ही बर झालात हेच माझ्यासाठी खूप हाय. खूप संकट भोगलीत पण स्वराजात लय खुश हाय. स्वराज्याचा धनी वाचवण्यात माझा हातभार लागला मी धन्य झालो राज मी धन्य झालो". केवढ प्रेम होत सामान्य जनमानसाच माझ्या राजावर. कारण राजानं हे स्वराज्य उभं केलं होत त्या गोरगरिबांसाठी, सामान्य जनतेसाठी. म्हणून जगाच्या पाठीवर असा राजा होणं शक्य नाही..

ह्या संकटामुळे जनता जास्त काळजीत होती, काहीही होवो आपल्या राजाला काहीही नको व्हायला. चैत्रपौर्णिमेचा दिवस जणू पौर्णिमा नव्हे तर अमावस्या म्हणून उजाडला. समध्या स्वराज्यात हनुमान जयंती असल्यासारखी वाटत नव्हती. भर दुपारच्या पहारी राजधानी रायगडाच्या द्वारावर काळा ढग जमू लागला होता. स्वराज्याच्या संस्थापकाला जणू स्वर्गाचं आमंत्रण आल्याचं वाटत होत. दुपार काही संपत नव्हती आणि संध्याकाळ काही होत नव्हती. नियतीला ह्यावेळेस ऐकायचं नव्हतं आणि स्वराज्याची पौर्णिमा जणू आमवस्याच झाली. यमाने महाराजांना रायगडाच्या महालातून स्वर्गाच्या महालात नेण्याचं ठरवलं होता आणि स्वराजाला पोरकं केलं. चैत्र पौर्णिमा, ०३ एप्रिल १६८० महाराजांना स्वराज्यातून घेऊन गेला. स्वराज्याचा राजा त्रैलोक्याचा राजा झाला.

महाराज गेल्या नंतर दुष्मनाच्या तोंडून सुद्धा चांगली दुवा निघाली ती म्हणजे "ये अल्ला किसी को दुश्मन देना होगा तो शिवा जैसा नेक बंदा दे". म्हणून म्हणावं लागत "असा राजा पुन्हा होणे नाही".

या भूमंडळाचे ठायी धर्म रक्षी ऐसा नाही..
महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे..

राज घ्या मनाचा मुजरा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...