देव तू क्रिकेटचा...



सचिंन्न्न..., सचिंन्न्न... ह्या प्रेक्षकांच्या मनापासून निघणाऱ्या भावनेला जगभरातल्या क्रिकेटप्रेमींना अवाक करणारा आवाज. आज जरी प्रत्यक्षात खेळत नसला तरी तुजी कर्मभूमी वानखेडे मैदान अजून हि कुठल्याही सामन्यात तुज्या नावाच्या आवाजाचा जयघोष करते. हे सगळं फक्त तुज्यातल्या खेळाडूवृत्तीमुळे..

"सचिन रमेश तेंडुलकर" तमाम भारतीयांच्या नव्हे तर जगभरातल्या क्रिकेट प्रेमींच्या मनावर कित्येक वर्षांपासून अधिराज्य गाजवणार महान व्यक्तिमत्त्व. आमच्यासाठी सचिन, सच्य्या, सचू. हो एकेरी हाक. कारण तू आमच्या हृदयात आहेस. तू राजीव गांधी खेलरत्न, पदमविभूषण आणि सर्वोच भारतरत्न पुरस्कार विजेता आहेस. भारताचा सर्वश्रेष्ठ पुरस्कार विजेता असला तरी तुज्यासाठी सर, मास्टर ब्लास्टर, लिटल मास्टर अश्या अनेक पदव्या असताना आम्ही मात्र सचिनचं म्हटलो आणि म्हणत राहू.

क्रिकेटच्या विश्वातील सर्व रेकॉर्डस् तुज्याच नावावर, जगातील सर्व बॉलर तुलाच घाबरता, जगातील सर्व क्रिकेट टीम तुलाच खेळताना बघायला तडफडतात, जगात सर्वात जास्त प्रेक्षक वर्ग तुझाच, ऑस्ट्रेलियाचा सन्मानाचा पुरस्कार तुलाच, अनेक नवीन खेळाडू तुला डोळ्यासमोर ठेवून घडत आहेत. इतकं सगळं असताना तुझे पाय मात्र जमिनीवरच. तुज्यात एवढ्या मोठ्या गोष्टींचा किंचितसा सुद्धा गर्व नाही. सर्वाना सांभाळून प्रामाणिकपणे खेळणारा फक्त तूच. हो प्रामाणिक, कारण पंचांचा निर्णय तुला नेहमी अंतिम असायचा मग तू कधीच त्यावर
प्रश्न उपस्थित केला नाही मग तो निर्णय चुकीचा असला तरी. तुज्या खेळाडू वृत्तीला खरा सलाम.

सचिन खेळत असताना सारा भारत झोपायचा नाही हे तितकंच खरं, कारण सर्व भारतीयांना तुज्या खेळाची चाहूल लागलेली असायची. तू खासदार हि राहिलास, तू "अपनालय" ह्या सामाजिक संस्थेतून दरवर्षी २०० मुलांची जबाबदारी घेतोस. तुझी सामाजिक बांधिलकी हि तितकीच कौतुकास्पद.

तू ज्या दिवशी क्रिकेटला अलविदा दिलास तो दिवस आज हि आठवतो. तुझं ते खेळपट्टीला नमस्कार करून डोळ्यांना आसू आलेलं आम्हाला खूप भावून गेलं. तुझ ते शेवटच भाषण हे जग कधीच विसरू शकत नाही. तू तूच आहेस. तू आला तू बघितलं आणि तू जिंकलस. तू त्या दिवशी अलविदा हा व्यवसायिक खेळाचा घेतला, क्रिकेटचा अलविदा तर तू मरेपर्यंत नाही घेऊ शकत हे आम्ही जाणून आहोत. जगातील क्रिकेट प्रेमिंनवर अधिराज्य करणारा तू आमच्यासाठी एक मराठी असल्याचा सार्थ अभिमान आहेस आणि खरंच तू देव आहेस क्रिकेटचा...

४५ व्या वाढदिवसानिम्मित मनःपूर्वक मराठमोळ्या शुभेच्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...