माझा महाराष्ट्र....

माझा महाराष्ट्र....
म्हंटल तरी मनात स्वाभिमान आनंदाने भरून येतो. महाराष्ट्र म्हंटलं तर स्वाभिमान आलाच. संतांच्या ज्ञानगाथेपासून ते शिवरायांच्या यशोगाथेपर्यंत, स्वातंत्र्यसैनिकांच्या लढ्यापासून ते भारतीय सैन्यदलापर्यंत, साहित्याच्या वारसापासून ते कलेच्या उत्कर्षापर्यंत, संस्कृतीपासून ते सण उत्साहापर्यंत, विज्ञानापासून ते औद्योगिक क्षेत्रापर्यंत, निसर्गापासून ते धार्मिक स्थळापर्यंत, सह्याद्रीपासून ते हिमालयापर्यंत.. प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक मनात.. फक्त आणि फक्त माझा महाराष्ट्र..

भारतभूच्या गर्वाच्या शृखंलेत अभिमानच पुष्प नेहमीच वाहणारा महाराष्ट्र. नावातच महा म्हणजे मोठेपणाच राज्य असलेलं राष्ट्र. निसर्गाने सुद्धा भरभरून प्रेम केलेलं राज्य, कोकणची किनारपट्टी आणि सहयाद्रीच्या पर्वतरांगा जणू महाराष्ट्राला निसर्गाने सौंदर्याचा अलंकार चढवलाय. शेतीतल्या विविधतेतून सर्व प्रकारची उत्पन्न घेताना कांदा, द्राक्ष, केळी ह्या पिंकांमध्ये अग्रेसर असणार राज्य. औद्योगिक क्षेत्रात देशाचं नेतृत्व करणार राज्य. धार्मिक जपवणुकीत चार ज्योतिर्लिंग, साडे तीन शक्तीपीठ, अष्टविनायक सारखी अनेक धार्मिक स्थळ लाभलेली भूमी. संस्कृतीचा वारसा जपताना सण उत्साहातून परंपरेची जपवणूक करणारी भूमी. संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूमीने संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव दिलेत.

सर्व राज्यांना भूगोल आहे मात्र महाराष्ट्रभूमीला भूगोलाबरोबर स्वाभिमानाचा शिवरायांचा इतिहास आहे. ह्याच भूमीने स्वराज्य स्थापनेसाठी जिजाऊ दिल्या, जनतेच्या कल्याणासाठी राजा शिवराय दिलेत आणि स्वाभिमानाचा इतिहास घडवण्यासाठी शंभूराजा दिला.

स्वातंत्र्यसैनिकांनी खरी चळवळ ह्याच भूमींनी केली त्यात लोकमान्य टिळक, महात्मा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे वीरपुरुष दिलेत. भारतभूमीच्या संरक्षणकरता मराठा बटालियन आणि महार रेजिमेंट हि दोन सैन्यदलाची सेवा करणारी शाखा ह्याच भूमीने दिलीत. म्हणूनच म्हंटल जात जेव्हा जेव्हा हिमालयाला गरज पडते तेव्हा तेव्हा सहयाद्री खंबीरपणे पाठीशी उभा राहतो.

साहित्यक्षेत्रात कुसुमाग्रजांसारखे अनेक दिगज बहाल करताना भाषेचं म्हणजेच मराठी साहित्य संमेलन प्रत्येक वर्षी साजरी करणारी एकमेव भूमी. कलाक्षेत्रात लता मंगेशकरांसारख्या अनेक महान कलाकारांना कलेचा वारसा देणारी भूमी. भारतीय चित्रपट श्रुष्टीचे निर्माते दादासाहेब फाळके सारखे महान कर्तृत्वान लोक देणारी भूमी. क्रीडा क्षेत्रात सचिन तेंडुलकर सारखा सर्वोत्तम खेळाडू देणारी भूमी. विज्ञानात विशेष योगदान देताना जयंत नारळीकरांसारखे अनेक विद्याविभूषित देणारी हि भूमी. उद्योग क्षेत्रात रतन टाटा सारखे उत्तम व्यावसायिक देणारी भूमी.

पहिल्या महिला शिक्षिका सावित्रिबाई फुले आणि महिलांना शिक्षण, पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील देणारी भूमी.

हिंदुस्थानाच्या राजकारणाचा मुख्य गाभारा सांभाळणाऱ्या महाराष्ट्रभूमीने यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, शरद पवारांसारख्या अनेक राजकीय धुरंदराना दिल.

मुंबईसह महाराष्ट्र मिळविण्यासाठी ज्या १०५ हुतात्म्यांनी प्राण गमावले त्यांचं योगदान हे अवर्णनीय आहे कारण त्यांच्या बलिदानामुळे आपली मुंबई दिमाखानं महाराष्ट्रात आहे. बेळगाव कारवार सह अखंड महाराष्ट्र व्हावा हीच अपेक्षा. विदर्भ आमचाच आहे आणि तो आमच्यातच राहो ह्या सदीच्छा.

महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...