लालपरी..



महाराष्ट्रात फिरायला तशी मज्जाच खूप येते. कधी उन्हातून, कधी सावलीतून, कधी नदीतून, कधी डोंगरातून, कधी जंगलातून तर कधी छान रस्त्यातून.. महाराष्ट्रात फिरताना महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या लाल रंगाच्या गाडीतून प्रवास करण्याचा नेहमीच योग येत असतो. हि लाल रंगाची गाडी शहरापासून ते खेड्यापर्यंत, चांद्या पासून ते बांद्या पर्यंत, मुंबईपासून ते नागपूर पर्यंत, नाशिकपासून ते सावंतवाडीपर्यंत निस्वार्थ धावत असते. महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांच्या प्रमुख शहरात सुद्धा ती रोज धावत असते.

राज्याच्या विकासात अतिशय महत्वाचं योगदान ह्या लाल रंगाच्या एस टी बसच म्हणजेच लालपरीच आहे. दिवस रात्र न पाहता लोकसेवेचे अखंड व्रत जणू ह्या गाडीनं घेतलंय. हि एस टी बस लाल रंगापासून हिरवा, निळा ह्या रंगात पण अलीकडच्या काळात धावली. परिवर्तन, एशियाड, शिवनेरी, अश्वमेध आणि आता शिवशाही अश्या अनेक रूपात ती काळानुसार बदलते सुद्धा आहे. ४५ प्रवासी क्षमता असताना कधी एकदोन प्रवासी तर कधी ६५ ते ७० प्रवासी घेऊन जाते. प्रवासी असो वा नसो तरी ती आपल्या वेळात धावतेय. अनेक चालक आणि वाहक यांचं घर तीच चालवतेय. ती अनेकांची जीवनदायिनी आहे.

लालपरी आमची सेवा करते पण आम्ही तिच्या बद्दल तितके संवेदनशील नसतो. तिचे शीट्स कधी फाडतो, तिच्यावर कधी पेनाने लिहतो, कधी तिच्यात तंबाखू खाऊन थुकतो. हे कमी पडलं तर कधी हिंसाचारात तिला तोडतो, फोडतो, जाळतो. कारण काहीही असो पण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आम्ही तिलाच इजा पोहचवतो. नेहमी हे घडत असताना सुद्धा ती तिची सेवा चालूच ठेवते पण आम्ही कायमस्वरूपी सवेंदनशील होत नाही. विचार तर करायलाच हवा लालपरी सार्वजनिक सेवा करताना तीच नुकसान करणे म्हणजे हे आपलेच नुकसान होते. संवेदनशील होऊन लालपरीला मुक्तपणे तिची सेवा करू देणं आपलं कर्तव्यच समजायला हवं.

लालपरी अनेक वर्षांपासून अविरत धावल्यामुळे तिची आसण खिळखिळी होतात, खिडक्या तुटतात, धावण्याचा वेग कमी होतो. हे सगळं होत असताना ती आपलं काम करत असते आणि आपण तिला लाल डब्बा म्हणून साहजिकच बोलतो. होय तीच हे रूप प्रवासासाठी योग्य जितकं नाही तितकं आपलं तिला लालडब्बा उचारण पण योग्य नाही.

काहीही असो हि लालपरी महाराष्ट्राची सेवा कित्येक वर्षांपासून करतेय. आज तीच रूप काळानुसार बदलता बदलता शिवशाही सेवेपर्यंत आलं. जणू शिवरायांच्या स्वराज्यात काळानुसार बदल झालेत तशेच बदल करून शिवशाही आत्मसात करून लालपरीन जणू प्रवासाचंच रूपच बद्दल. काहीही असो पण लालपरीचा प्रवास करण्याची मज्जाच न्यारी. लालपरी अशीच वर्षोनुवर्ष चालत राहो आणि प्रवाश्याना प्रवासाचा आनंद देत राहो..

डॉ. प्रशांत शिरोडे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...