ने मजसी ने मातृभूमीला...


वीर सावरकरांच्या ह्या काव्याची जाण मातृभूमीपासून दूर असल्यावर नक्की होते. आपल्या भूमीची, आपल्या माणसांची जाण परदेशात गेल्यावरच होते.

थायलंड आशिया खंडात येणारा देश. बँकाँग येथील स्वर्णभूमी आंतराराष्ट्रीय विमानतळावर पोह्चल्यावरच "स्वर्णभूमी" ह्या नावातच आपल्या ओळखीचा शब्द असल्याची जाण झाली. ह्या देशात कुणीही कुणाला भेटलं तर त्याला "सवसदिका"  म्हणजेच वाकून हाथ जोडून नमस्ते करतात. ते बघून मन अजूनच विचारांच्या विश्वात अडकलं कि ह्यांची नमस्कार करण्याची आणि आपली पद्धत सुद्धा एकच. रस्त्याने जाताना मंदिरा  सारखं काही तरी दिसू लागलं आणि बँकाँग मधील "वाटफॊ" ह्या मंदिरात जायचा योग आला.  गेल्यावर तर माझ्या विचारांना अवाक झाल्यासारखं झालं. मंदिर होत ते गौतम बुद्धाचं आणि हा देश बुद्धांच्या विचारांवर चालणारा देश. मंदिरात गेल्यावर आपल्या मंदिरांसारखा मंत्रघोष होत होता आणि मग माझ्या मनातील प्रश्नाचं उत्तर भेटलं. ज्या पावन भूमीत गौतम बुद्ध जन्मले त्या भूमीचे गुण ह्या भूमीत असतीलच... थोडं आपलं काहीतरी असल्यासारखं वाटलं..

बँकॉक मधला पहिला दिवस हा भारतीय जेवणाच्या शोधात होता आणि तो प्रश्न लवकर सुटला. हॉटेलच्या जवळच भारतीय उपहारगृह खूप होती आणि जेवण भारतासारखच, मग काय आनंद गगनात मावेनासा झाला. हॉटेल मध्ये हिंदीतच विचारलं गेलं तुम्हाला काय खायचं? खूप छान वाटलं. बँकॉक मध्ये इंद्रा मार्केट मध्ये गेल्यावर तर ते हिंदीतच बोलत होते, जणू मुंबईतल्या फॅशन स्ट्रीटवरच फिरतोय का अस  क्षणभर वाटलं. मन रमायला सुरवात होत होती. इंद्रा मार्केटजवळच "बायोक टॉवर" नावाची जगातली ४२ क्रमांकाची उंच इमारत बघितली. दुसऱ्या दिवशी जहाजावर जेवणाचा आनंद घेण्यासाठी गेलो. खास भारतीयांसाठी ते क्रूझ होत आणि जेवणासोबत भारतीय गाण्यावर नाचण्याचा आणि बँकॉक शहराचा आनंद घेता येत होता. गाणी म्हंटली तर अगदी "झालं झिंग झिंग झिंगाट" सुद्धा वाजलं. मग तर आनंद कुठं पोहचला याच भानच नाही राहील. त्यानंतर पुढच्या दिवशी पटाया शहरात गेलो आणि बघतो तर काय हॉटेल मधेच नाश्त्यासाठी भारतीय मेनू आणि बाहेर खूप सारे भारतीय जेवणाची उपहारगृह होती.

सगळा हा आनंद लुटत असताना जाण्याच्या एक दिवस अगोदर मातृभूमीची आस लागली. मन म्हणू लागलं बस झालं आता आपल्या देशात जावं. शेवटचा दिवस काढायचा म्हणून काढला. परतीच्या प्रवासाची चाहूल लागली आणि राहवलं गेलं नाही म्हणून स्वर्णभूमी विमानतळावरच हि लेखणी लिहून टाकली. खरंच मनापासून सावरकरांच्या काव्याची जाण झाली आणि जीव जाण्यासाठी तळमळला..

डॉ. प्रशांत शिरोडे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...