माझा राजा छत्रपती झाला..



शिवाजी महाराज... तत्कालीन परिस्थितीला आणि ऐतिहासिक नियतीला पडलेलं सोनेरी स्वप्न. स्वप्नातील विश्वाला लाभलेलं चंदेरी आकाश. विश्वातील मानवसृष्टीला भेटलेला अदभूत आदर्श. आदर्शांचा राजा म्हणावा कि राजांचा तो आदर्श. राजा म्हणून भूतलावावर हिंदुस्थानात राजस्वाचं अभिमान म्हणजे "छत्रपती". छत्रपती शिवाजी महाराज..

हिंदुस्थान सर्व बाजूनी मोगल, निजाम, कुतुबशाही सारख्या परकीय अतिक्रमणांनी वेढलेला होता. सगळीकडे मानवतेची शेकोटी पेटली होती. जंगलांतील वणवा पेटवा तसा सर्वत्र हैवानाचा कहर झाला होता. अत्याचार तर जणू खेळच बनला होता. स्वतःच्या विचारांना गुलामीचा पेहराव होता. जगण्यासाठी तुटपुंज्या भाकरीचा घास होता. कष्ट जनतेची आणि अधिकार परकीयांचा होता. हे सगळं सगळं विचित्र होत..

जिजाऊंना स्वराज्य हवं होत. रयतेला जगण्याचा अधिकार द्यायचा होता. महाराष्ट्राला पराक्रमाचा इतिहास द्यायचा होता. हिंदुस्थानाला सुवर्ण काळ द्यायचा होता. साम्रज्याशाहीतून स्वराज्य घडवायचं होत. जनतेला हक्काचा जाणता राजा द्यायचा होता. संस्कारातून संस्कृती घडवायची होती. राष्ट्रसेवा, धर्मसेवा आणि जनसेवा करायची होती. मूलभूत हक्क, न्याय आणि जगण्यासाठी स्वतंत्रता द्यायची होती. मावळ्यांच्या मनगटात पराक्रमाची मशाल पेटवायची होती. रयतेला राजा आणि राजाला छत्रपती बनवायचं होत.. ह्या सर्व मनस्वी भावनांना प्रत्यक्षात उतरवायचं होत..

शिवाजी महाराज जिजाऊंच्या स्वराज्य संस्कारात घडत असताना रयतेच्या सानिध्यात वाढत होते. रयतेच्या गरजा, इच्छा आणि अपेक्षा समजून घेत होते. जिजाऊंच्या भावनांना प्रत्यक्षात उतरवत होते. मावळ्यांना लढण्याच बळ देत होते. हे सगळं करत असताना राजे छत्रपती होणं तितकाच महत्वाचं होत. परकीयांची घोडदौड चालत असताना स्वराज्याच तोरण बांधण्यासाठी राज्याभिषेकाची तयारी चालू झाली. मावळ्यांच्या आणि रयतेच्या मनात आनंदाची दिवाळी सजवू लागली. सगळं होत असताना तत्कालीन मनोवृत्तीने क्षत्रित्वाच्या मुद्यावर राज्याभिषेकास नकार दिला. ह्या नकारानंतर काशीहून गागाभटांना राज्याभिषेकासाठी आमंत्रित करण्यात आलं. सर्व नद्या सागरांचं पाणी मागवण्यात आलं. पंचक्रोशीतील जनमाणसाला सामान्य रयतेला सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं. रायगडाला सजवण्यात आलं. सुवर्ण सिंहासन बनवण्यात आलं.

हिंदुस्थानच्या इतिहासातील सुवर्ण दिवस उजाडला आणि दैदिप्यमान राज्यभिषेक सोहळा मंत्रघोषात, चैतन्यरुपी वातावरणात, रयतेच्या आनंदात पार पडत असताना माझा राजा छत्रपती झाला...

डॉ. प्रशांत शिरोडे.

१० टिप्पण्या:

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...