सभ्येतेतील विविधता.



गेल्या महिन्यात थायलंड ह्या जगाच्या नकाशावरच्या छोट्याश्या देशात जायचा योग आला. त्या देशात फिरताना सगळीकडे एक वेगळंच वातावरण पाहायला मिळालं. अगदी स्वागतापासून ते निरोपापर्यंत खूप काही वेगळं अनुभवायला भेटलं.

थायलंड तसा लष्करशाही असलेला देश. ह्या देशात स्त्री ७० टक्के आणि पुरुष ३० टक्के प्रमाणात आहेत. कुठल्याही क्षेत्रात स्त्री हि असण्या मागे हेच मुख्य कारण आहे. सभ्यतेची आणि नम्रतेची खरी भाषा इथं कळली कारण येथील प्रत्येक माणूस समोर भेटलेल्या माणसाला वाकून नमस्ते म्हणतो. कोणी आपल्यापेक्षा मोठा असेल तर त्याच्या पुढे वाकून चालतील. समोरच्याच म्हणणं व्यवस्थित ऐकून घेतील. चुकीचं काही होत असेल तर क्षणांचा विलंब न करता माफी मागतील. मोठ्या आवाजात बोलणं तर बघायला सुद्धा भेटलं नाही. नेहमी हसरा चेहरा असणारी लोक सगळीकडे दिसत होती.

बँकॉक येथे मागील काही वर्षभरापासून काम करणारी काही भारतीय लोक अनुभव सांगताना म्हणतात कि गेल्या तीन चार वर्षात कधी भांडण बघायला भेटलं नाही. रस्त्यावर कधी अपघात झाला तर पोलीस आणि विमा कंपनीची व्यक्ती येऊन त्या अपघाताची चौकशी करतात आणि योग्य ती कारवाई करतात पण अपघातातील व्यक्ती अपशब्दही काढत नाही. कामाच्या ठिकाणी कोणी अपशब्द किंवा वरच्या आवाजात बोललं तर समोरची व्यक्ती दुसऱ्या दिवसापासून कामाला येत नाही. याचाच अर्थ कुठल्याही व्यक्तीवर कुठलाही दबाव टाकला जात नाही. कधी चोरी हा प्रकार सुद्धा कानावर ऐकायला येत नाही.

थायलंड ह्या देशात अनेक देशातून लोक स्थायिक झालेली आहेत आणि ह्या देशात त्यांना योग्य ती वागणूक दिली गेली आहे. पण अलीकडच्या काळात त्यावर निर्बंध आणण्यात आली आहेत. बाहेरून आलेल्या पर्यटकाला अतिशय नम्रपणे मदत केली जाते. हिंदुस्थानातून गेलेल्या भगवान बुद्धांच्या विचारांवर चालणारा देश तितकाच हिंदू देवतांना मानताना दिसतो. ज्या देशातून सभ्यता शिकवली गेली त्याच देशात हि सभ्यता लोप पावत चालली असताना थायलंड सारखा देश त्यावर आपली अस्मिता टिकवून उभा आहे.

थायलंड म्हंटल का आपल्या मनात प्रथम वेगळी कल्पना येते पण ते तसं नाही कारण एवढ्या छोट्याशा देशाकडून शिकण्यासारखं खूप आहे. अतिशय स्वच्छ असे रस्ते. कामाच्या ठिकाणी स्त्री, पुरुष आणि तृतीय पंथी कुठलाही लिंग भेद केला जात नाही. स्रियांचं प्रमाण जास्त असल्यामुळे स्त्रीला अनेक व्यवसायातून जावं लागत पण त्या देशाच्या परिस्थिती नुसार ते कदाचित बरोबर राहू शकत.

सभ्येतेतील विविधता अनुभवताना आपल्या देशात सुद्धा हि गोष्ट होती पण काळानुसार आम्ही गमावली आणि दुसऱ्या देशांनी टिकवली..

डॉ. प्रशांत शिरोडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...