सावरकर...


अंदमान आणि निकोबार बेट भारताच्या नकाशात ज्या महानायकामुळे आहे ते म्हणजे विनायक दामोदर सावरकर म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर.. स्वातंत्र्यवीर म्हणजेच स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावून वीर मरण आनंदाने स्वीकार केलेले सेनानी..

इंग्रजांच्या पारतंत्र्याला खरा सुरुंग लावून आपल्या भारतमातेची सेवा करताना सर्वात जास्त यातना भोगलेले स्वातंत्र्यसैनिक.. इंग्रजांना सर्वात जास्त धास्ती असलेला भारतमातेचा पुत्र.. आजही अंदमानच्या कारागृहात डोकावलं तर सावरकरांच्या काळ्यापाण्याची शिक्षा किती असह्य असेल त्याचा अनुभव येतो. प्रखर देशप्रेमाबरोबर मराठी साहित्य, हिंदुत्व अश्या अनेक विषयांवर अभ्येद्य योगदान. मातृभूमीच्या प्रेमापायी समुद्रात उडी मारून प्रवाहाच्या उलट्या दिशेने पोहत मातृभूमीच्या दर्शनाला पोहचलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व..

नाशिकमधल्या भगूर ह्या छोट्याश्या गावात इंग्रजांच्या स्वप्नांना चाकाचूर करून टाकणारा एक महापुरुष. स्वातंत्र्याची प्रेरणा महाराष्ट्राने राष्ट्राला दिली आणि स्वातंत्र्य कस मिळवायचं ह्याची संकल्पना सावरकरांनी दिली. मित्रमेळा हि संघटना उभारून तरुणांना स्वातंत्र्य लढ्यात सामील करून भारतमातेच्या स्वातंत्र स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवणारे स्वातंत्र्यवीर.. छत्रपती शिवरायांना दैवत मानणाऱ्या सावरकरांनी महाराजांची आरती
लिहली..

भारतरत्नाचे खरे दावेदार राजकीय द्वेषापायी भारतरत्न पुरस्काराला सन्मानित करू शकले नाही. मराठी मातृभूमीच्या सन्मानाचा मानबिंदू  आणि भारतभूमीच्या अखंड स्वप्नाचा चैतन्यबिंदू स्वातंत्र्यवीर सावरकरांना जन्मदिवशी भावपूर्ण  आदरांजली..

डॉ. प्रशांत शिरोडे.

1 टिप्पणी:

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...