अलविदा वर्ल्डकप..


विश्वचषक स्वप्न हवेत स्थिरावल्यानंतर खूप दिवसानंतर स्पर्श ब्लॉगच्या लेखणीला थोड्या दिवसांच्या अलविदा नंतर पुन्हा लिहताना वर्ल्डकपची आजची मॅच कारण ठरली..

विश्वचषकात पंढरीच्या वारीसारखी अविरत असणारी विजयाची परंपरा आज अचानक खंडित झाली. विराटसेना जगात पहिल्याक्रमांकावर, विराट फलंदाजीत, जसप्रीत गोलनंदाजीत पहिल्या क्रमांकावर आपलं वर्चस्व टिकून होते. इंग्लंड सोडून सर्व संघाना पराभवाची चव चाखवली आणि न्यूझीलंडने भारताच्या संघाला पराभूत करून पुन्हा एकदा विश्वविजेतेची स्वप्न संपुष्टात आणली. दोनदा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तिसऱ्या विश्वचषकाचा घास तोंडात आल्यावर काढून घेतला. पहिला विश्वचषक ज्या भूमीत जिंकलो त्याच भूमीत हा विश्वचषक आहे म्हणून खूप आशा होत्या पण त्या आता पूर्णपणे संपल्या. दुसरा विश्वचषक आपल्या भूमीत मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर जिंकणारा भारतीय संघ क्रिकेटच्या पंढरीच्या लॉर्ड्सला मुकली.

पाच शतक करणारा रोहित, पाच अर्धशतक करणारा विराट, आणि चांगली सुरवात करणारा राहुल आज जणू मधल्या फळीची परीक्षा बघण्यासाठीच अवघ्या एक धावेवर बाद झालेत. गेलेल्या सामन्याच्या आशा पल्लवित केल्या त्या सर जडेजाने, हो आजच्या सामन्यासाठी तो सरच. गोलंदाजीत अव्वल असणारा जडेजा फलंदाजीतही आज अव्वल होता, पण त्याच्या प्रयत्नांना यशाची

किनार थोडी कमीच पडली. २०११ चा विश्वचषक षटकाराने जिंकून देणारा महेंद्रसिंग धोनी आज ५० धावा करून खेळत असताना आपलं उत्कृष्ट सामना संपवण्याच कौशल्य कुठेतरी गमावून बसल्याच जाणवलं आणि अटीतटीच्या लढतीत आपली विकेट गमावून बसला. २०११ चा विश्वचषक सचिनला समर्पित केला तसा २०१९ चा विश्वचषक धोनीला समर्पित करण्याच स्वप्न स्वप्नच राहील. दुसरीकडे पूर्ण विश्वचषकात बूम बूम बुमराला जगाच्या पहिल्या क्रमांकाचा गोलन्दाज म्हणून लौकिक करण्यात पूर्णपणे यश येताना नेहमीसारखा संकटमोचक म्हणून धावत राहिला.

विश्वचषकात पाकिस्तान आणि बांगलादेश सारख्या अखिलाडूवृत्तीना हरवून जणू भारतीयांचा आनंद वाढवून दिला, पण तोच आनंद द्विगुणित नाही करता आला. असो भारतीयांना विराट सेनेच्या खेळातून आनंदच भेटला. जिंकणे किंवा हारने हा खेळाचाच भाग, कोणीतरी एकच जिंकणार.. म्हणून भारतीयांसाठी अलविदा वर्ल्डकप आणि विराटसेनेसाठी वेल्डन इंडिया...

डॉ. प्रशांत शिरोडे.

४ टिप्पण्या:

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...