राष्ट्रीयत्व...



जम्मूरियत आणि काश्मिरीयत असा नागिरकत्वाचा वेगळा असणारा प्रवाह, भारतीय नागरिकत्वाच्या मुख्य प्रवाहापासून नेहमीच वेगळा राहिला. २६ जुलै पासून काश्मिरात चाललेल्या हालचाली विशेष घडामोडींसाठीच होत असाव्यात असा अंदाज वर्तवला जात होता आणि घडलंही तसंच. आज सकाळी राज्यसभेत जम्मूकाश्मीरच्या विशेष अधिकारातले कलम ३५ अ आणि ३७० हटवण्याचा प्रस्थाव मांडण्यात आला आणि पूर्ण देशात ह्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं.

देशाच्या राष्ट्रीयत्वाला आणि एकतेला ह्या कलमामुळे नेहमीच तडा देण्याचं काम झालं.  काश्मिरातली शांतता दुभंगण्याच सर्वात मोठं कारण म्हणजे हि दोन कलम. देशाशी एकनिष्ठता ह्या दोन कलमाच्या आवरणामुळे येत नव्हती. वेगळी राज्यघटना, वेगळा झेंडा भातीयत्वाला कधीच आत्मसात करू शकत नव्हता. काश्मीरखोऱ्याची अशांतता आणि पाकपुरस्कृत आतंकवादाचं मुख्य कारण हि दोन कलम. निसर्गाने सौंदर्य बहाल केलेल्या जम्मूकाश्मीरला ह्या कलमाने विद्रुप केलं. कुण्या एकदोन स्थानिक पक्षांनी आपली जहागिरी मानून हि आग जाणूनबुजून तेवत ठेवली. लोकांच्या हितापेक्षा स्वहित ठेवलं म्हणून हि कलम अबाधीत राहिली.

३७० कलमानुसार स्वायत्त राज्याच्या दर्जा, परराष्ट्र, अर्थ, संरक्षण आणि दूरसंचार वगळता इतर विभागांमध्ये केंद्राचा कायदा लागू करण्यासाठी राज्य सरकारची संमती आवश्यक, भारतीय नागरिक तिथे स्थायिक होऊ शकत नाही, एक वेगळी राज्यघटना, जम्मू-काश्मीर महिलेने इतर राज्यातील मुलाशी लग्न केलं असेल तर त्यालाही इथे जमीन खरेदी करता येणार नाही.. अशा अटी होत्या ज्यामुळे त्या राज्याचा विकास होणं कदापि शक्य नव्हतं. ३५ अ नुसार, 'कायम नागरिक' तोच आहे जो १४ मे १९५४ रोजी राज्याचा नागरिक होता आणि कायदेशीरदृष्ट्या त्याने राज्यात स्थावर संपत्ती खरेदी केली होती.

भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व हि स्थानिक जम्मूकाश्मिरी नागरिकांची इच्छा आज पूर्णत्वाला आली. काही विनाशकारी विपरीत बुद्धिना हा निर्णय कदाचित आत्मसात होणार नाही कारण त्यांची स्वायतत्ता आता अबाधित राहणार नाही. ह्या निर्णयामुळे जम्मूकाश्मीर शांत होऊन भारताचं नंदनवन पुन्हा फुलो आणि भारतीय संस्कृती गुण्यागोविंदाने नांदो हि सद्धीच्छा. केंद्र सरकारचे अभिनंदन आणि ह्या निर्णयाच्या अमलबजावणी नंतर पाकव्याप्त काश्मीर भारतात आणण्यासाठी असाच निर्णय होवो ह्याच शुभेच्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

७ टिप्पण्या:

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...