इसरोचा योद्धा ..



चांद्रयान २ ची चर्चा जणू देशातील कान्याकोपऱ्यात घुमतेय .. गेले ५५ दिवस हि मोहीम चालू झाल्यापासून तर चांद्रयान चंद्रावर पोहोचण्याच्या दिवसाच्या रात्री २ वाजेपर्यंत ह्या मोहिमेला जितकं चर्चिल गेलं नाही तितकं ह्या दोन दिवसात ते चर्चेत राहील. ना कुठली मॅच होती ना कुठला विशेष कार्यक्रम होता पण सारा देश चांद्रयान २ ह्या मोहिमेच्या अखेरच्या टप्याकडे मन लावून टेलिव्हिजन समोर बसला होता.

रात्री १.५२ मिनिटांनी चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा अंदाज असताना सर्व ठरल्याप्रमाणे घडत होत. इसरोच्या प्रेक्षपण गृहात लाल रेषेवरून हिरवी रेषा त्या मोहिमेचं गणित स्पष्ट करत होती. चांद्रयान कमी वेगात व्यवस्थितरीत्या चांदोमामाच्या कुशीत उतरावं हे ह्या मागचा उद्देश असताना, सर्व तसंच घडतही होत आणि शास्रज्ञ टाळ्या वाजवून आपला आनंद व्यक्त करत होते. अवघ्या २.१ किलोमीटर अंतरावर असताना चांद्रयानाचा संपर्क इस्रोच्या कक्षागृहापासून सुटला आणि सगळीकडे स्मशान शांतता पसरली. शास्रज्ञ ह्या थोड्या चुकलेल्या क्षणाला जणू जिवंत करण्याचा प्रयत्न करत होती आणि रात्रभर प्रयत्न करताना आशेची किनार यशाची वाट शोधत होती. हे प्रयत्न १२ वर्षाच्या अथक कष्टाची परीक्षा होती..

चांद्रयान मोहिमेचं नेतृत्व करताना ह्या मोहिमेचं सर्व माहिती आणि प्रसारण हाताळणाऱ्या एम. विनिता शेवटच्या क्षणापर्यंत माहिती देत होत्या. चांद्रयानाशी संपर्क तुटल्यानंतर त्या भावुक झाल्या आणि काय बोलावं ह्या विचारात शांत झाल्या. अशा वेळेस देशासह जगाला आणि समोर बसलेल्या प्रतप्रधानांना माहिती देण्यासाठी स्वतः इसरो प्रमुख म्हणून पुढे येऊन मोहिमेच्या स्थितीची जबाबदारी घेतली.

सकाळी देशाला ह्या विशेष प्रयत्नावर प्रतंप्रधानांनी संबोधल्यानंतर, प्रतंप्रधान इसरोच्या कार्यालयातून बाहेर पडताना एक भावनिक क्षण घडला. इसरोचे मुख्य डॉ. के. शिवन प्रंतप्रधानांना निरोप देताना भावुक होऊन ह्या मोहिमेचा प्रमुख म्हणून जबाबदारी घेताना प्रतंप्रधानाच्या खांद्यावर भावनेच्या भरात रडू लागले. जगाच्या पाठीवर पहिल्यांदा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मोहीम हाताशी घेणारा हा भावनिक झालेला योद्धा म्हणजेच डॉ. के. शिवन. ह्या भावनिक क्षणानंतर जगाला माहित झालेला अतिशय साध राहणीमान असलेला अवलिया म्हणजे डॉ. के. शिवन.

तामिळनाडूच्या खेड्या गावात गरीब शेतकऱ्याच्या घरात जन्मेलाला साधारण मुलगा. आठवी पर्यंत गावात शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी पैसा नसताना आंबे विकून बारावी पर्यंत शिकून नंतर बी. एस्सी. केलं. गणितात १०० पैकी १०० गुण मिळवून शिष्यवृत्ती मिळवून इंजिनेरींग करून पुढे अंतराळ क्षेत्रात पदवीत्तर अभ्यास करून आय. आय. टी. मुंबई येथून पीएचडी केली. पदवीच्या अभ्यासक्रमापर्यंत गरिबीमुळे पायात चप्पल न घातलेला हा सामान्य मनुष्य अंतराळक्षेत्रात अनेक दैदिप्यमान रचू लागला आणि त्या जोरावर इसरो ह्या भारतीय अंतराळ संस्थेचा मुख्य पदावर पोहचला. आपल्या कारकिर्दीत चांद्रयान सारख्या मोहिमेला पहिल्याच प्रयत्नात यशाच्याजवळ नेणाऱ्या ह्या योध्याचा भारत भूमीला नक्कीच गर्व आहे. भारत मातेच्या ह्या पुत्राच चांदोमामाच्या कुशीतल्या कुतूहलतेच स्वप्न प्रत्यक्षात घडो ह्याच मनोभावे शुभेच्छा ..

डॉ. प्रशांत शिरोडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...