ईडी झाली येडी...



ऑफिसमध्ये एका मित्राने विचारलं हे ईडी म्हणजे काय? सध्या खूप ऐकू येतंय.. त्याचा प्रश्न तसा साहजिकच होता. गेल्या एकदोन वर्षात हे ईडी म्हणजेच एन्फोर्समेंट डायरेक्टरेट म्हणजेच अंमलबजावणी संचालनालय खूपच कामाला लागलाय. जणू एवढं एकच सरकारी कार्यालय जे काम करतंय. काम करतंय किंवा त्यांच्याकडून काम करून घेतलं जातंय.

अंमलबजावणी संचालनालय पैश्यांची घेवाणदेवाण योग्य रीतीने झाली नसेल तर त्याची चौकशी करून "निरपक्षपणे" संबधीतानावर गुन्हा दाखल करत. देशस्थरावर कर्त्याकरवित्याच्या जोरावर कामाला लागलेले हे कार्यालय सामान्यांना माहित नव्हतं. अचानक निवडणुका आल्या कि हे चमत्कार व्हावा तसं हे कार्यालय काम करू लागत. सर्व सरकारी कार्यालय असंच काम करू लागले तर देशाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. प्रश्न येतो तो ह्या अगोदर अशी वेळ कधीच आली नसेल का? आली असेल पण ती राजकीय फायद्यासाठी तर नव्हती. आजच्या घडीला ईडी म्हणजे एक राजकीय बाहुला म्हंटल तरी चुकीचं ठरणार नाही.

देशस्थरावर चालेल ईडीच हे निपक्ष काम महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावर जोराने चालू आहे. विशेष म्हणजे जुन्या कुठल्यातरी गोष्टी ईडीला चौकशीसाठी आता म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर आठवतायत. अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे चौकशीसाठी जावून आले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात राजकीय भूकंप केल्यानंतर विधानसभेत काळजी घेण्यासाठी ईडीने हि कारवाही केली असेल, शेवटी निपक्षपात.. गेल्या दोन दिवसापूर्वी शिखर बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांवर गुन्हा दाखल केला.. थोडं अचंबित होण्यासारखं होत, कारण त्यांचं कि शरद पवार ह्या बँकेवर कधी सदस्यच नव्हते. मग पवारांनीच ठरवलं जावून येवू ईडीच्या कार्यालयात तर इडीनेच थोडं विचार करून सांगितलं तुमची चौकशीची गरज नाही..

शरद पवार वयाच्या ८०व्या वर्षी महाराष्ट्र दौऱयावर निघाले आणि ईडीला चमत्कार झाला आणि घाईघाईत गुन्हा दाखल केला. जेव्हा हे अंगाशी आलं तेव्हा ईडीने आपला निर्णय थोडा सबुरीने घेतला. ईडी नक्की आपली स्वायत्त, निरपेक्ष आणि सरकारी असलेलं काम विसरली असं वाटू लागलं. कोणीतरी इशारा द्यावा आणि दावणीला बांधलेला जनावरासारख ईडीने पळत सुटाव हे तितकं योग्य नाही.

अंमलबजावणी संचालयानाने नावाप्रमाणे निरपक्षपने कामाची अंमलबजावणी केली तर सामन्यांना ईडी झाली येडी...? हा प्रश्न पडणार नाही..

डॉ. प्रशांत शिरोडे.

३ टिप्पण्या:

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...