आजही रायगड बोलतो..



छत्रपती शिवाजी महाराज.. मराठी माणसाच्या जीवनघडणीचा अविभाज्य संस्कार.. पावणे चारशे वर्षांनंतर त्याच सन्मानानं मराठी मनावर अविरत राज्य करणार दैदिप्यमान व्यक्तिमत्व.. महापुरुष, महानायक, महाविचारी, महापराक्रमी राजा.. कितीही विश्लेषण केलं तरी कमीच.

रायगडावर आजही गेलं तरी वाटत महाराज कसे असतील? रायगडावर कुठे बसत असतील? रायगडावरच्या पाऊलखुणा त्याच्याच आठवणींचा उजाळा देत असतात. राजदरबार, होळीचौक, बाजार, जगदीश्वराचं मंदिर, टकमक टोक, महाराजांची समाधी.. सर्व जणू आपल्याशी बोलतात. हाच तो पावन दुर्ग, ज्याने महाराजांचं उभं स्वराज्य बघितलं, वाढवलं आणि घडवलं..

रायगडावर जगदीश्वराच्या मंदिरात दहा मिनिट आजही शांत बसलं तर परमेश्वराचं वास्तव्य जाणवत. राजदरबारात आजही कुठूनही बोललं तर तो आवाज सिहासनापर्यंत पोहचतो. जणू तो दरबार महाराज असल्याची जाणीव करून देतो. हिरकणीच्या बुरुजावर बघितलं तर त्या आईच्या गौरवाची शाबासकी महाराज देताना दिसल्याची जाणीव होते.. पाचाडातील जिजाऊंच्या स्मारकांकडे बघितलं तर शिवाजी महाराज जिजाऊंच नित्यनियमाचं दर्शन घेताना दिसतात. संभाजी महाराजांचं राणीमहालातील वावरणं हि डोळ्यांसमोर उभं राहत..

रायगड आजही बोलतो आणि महाराजांचा इतिहास दाखवतो आणि दुःख हि व्यक्त करतो त्या इतिहासाच्या वारसदारांवर..

रायगडाच्या साक्षीने उभं आयुष्य श्रींच्या स्वराज्यसेवेत घालवून जगाच्या समोर आदर्श उभारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा..

डॉ. प्रशांत शिरोडे..

तानाजी ...


गेल्या शुक्रवारपासून हे नाव सारखं कानावर पडतंय आणि विशेष म्हणजे मराठी माणसाचं हे नाव इतर भाषिकांकडूनही तितक्याच जोमानं घेतलं जातंय. कारण पण तसच "तान्हाजी द अनसंग वॉरिअर " हा अजय देवगण निर्मित चित्रपट सिनेमाच्या अनेक सीमा पार करून लोकांच्या हृदयावर राज्य करतोय.. दाक्षिणात्य चित्रपटांना जस डोक्यावर घेतलं जात तसंच काही मराठी माणसांसह देशाने तानाजी चित्रपटास घेतलं.

"गड आला पण सिंह गेला" इतिहासाला सुपरिचित असलेली हि कहाणी नरवीर तानाजी मालुसरेंची.. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातही सुर्वण पानातील एक देदीप्यमान पान म्हणजे तानाजी. पोटच्या पोराचं लग्न असताना छत्रपतींच्या इच्छेसाठी कोंडाणा लढवण्याचं चंग बांधणारा मर्द मावळा. "आधी लगीन कोंडाण्याच मग माझ्या रायबाचं" गर्जना करून शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा मुख्य शिलेदार "किल्ले कोंडाणा" स्वराज्यात आणला ते तानाजी मालुसरे.

तानाजी सिनेमात इतिहासाच्या आठवणींना उजाळा देताना तानाजी पात्रास अजय देवगणने पूर्ण दाद दिली आहे. सिनेमात सत्य परिस्थितीला थोडं मनोरंजनात्मक रूप देऊन इतिहासात नेण्याचा उत्तम प्रयत्न करण्यात आला. अगदी सुरवातीपासून सिनेमाचं प्रत्येक पात्र उत्तमरीत्या काम करताना दिसत. छत्रपतींच्या इतिहासातील सुवर्णक्षणांना थोड्या काल्पनिक गोष्टींची जोड देऊन त्यातील रहस्यता उत्कृष्टरित्या मांडलेली  दिसते आणि संवाद पण तितकेच तोडीस तोड अनुभवायला भेटतात.

मराठी कलाकारांनी आपली भूमिका साजेशी पार पाडली आहे. शरद केळकर सारख्या मराठी कलाकाराला पत्रकार परिषदेत "आप शिवाजीका रोल कर रहे हो" ह्या वाक्याला तेथेच कापत पत्रकाराला त्याची चूक तिथेच दाखवून "छत्रपती शिवाजी महाराज" म्हणायचं असं छातीठोकपणे सांगितलं. आपला हा अभिमानाचा इतिहास जर बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यावर येत असेल तर त्याला प्रतिसाद देणं आपलं कर्तव्य आहे.

आपल्या इतिहासावरील चित्रपट बॉलीवूडला भुरळ पाडत असतील तर त्याला दाद देणं हि आपली जबाबदारी आहे.. एकदा तानाजी नक्की बघा..

डॉ. प्रशांत शिरोडे..

नागरिकत्व..



गेल्या काही दिवसापासून सगळीकडे नागरिकत्व ह्या शब्दाची चर्चा जितकी आहे तितकीच चर्चा सभोतालच्या बिघडलेल्या सामाजिक वातावरणाची आहे. CAA आणि NRC म्हणजेच सिटीझन अँमेंडमेंट ऍक्ट आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स म्हणजेच भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा..

लोकसभेत बहुमताने सहमत झाल्यानंतर ह्या कायद्याला सहमती भेटली. भारताच्या जवळील अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान ह्या मुस्लिमबहुल देशातून स्थलांतरित झालेल्या त्या देशातील अल्पसंख्यांक समाजातील लोकांना भारताचं नागरिकत्व देणारा कायदा. ह्या तीन देशातील बुद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन, पारसी आणि हिंदू ह्या अल्पसंख्यांक नागरिकांना भारतीय नागरिकत्व प्रधान करण्यासाठीचा कायदा. देशाच्या स्वातंत्र्यानंतर ह्या तिन्ही देशातील अत्याचारित अल्पसंख्याकांनी भारतात शरणार्थी पत्करली, पण नागरिकत्व नसल्यामुळे त्यांना भारतातील अनेक गोष्टींपासून वंचित रहावं लागत.

कायदा सहमत झाल्यानंतर हिंसेतील सर्वात मोठा धागा म्हणजे इतर समाज मुख्यतः मुस्लिम समाज ह्या कायद्यात समाविष्ट नाहीत. कदाचित हिंसा करणार्यांनी ह्या कायद्याला समजून न घेता त्याला जातीय वलय देवून कायद्यावर बोट उचलला आहे. तिन्ही देश जर मुस्लिमबहुल असतील तर तिथे मुस्लिम सुरक्षितच असतील ह्यात काही तर्क नसावा. भारतीय मुस्लिम ह्यात स्वतःला समजून घेताना कुठंतरी विपर्ह्यास झाल्यासारखं वाटतंय. त्याबरोबरच गैरमार्गाने घुसखोरी करणाऱ्या लोकांना देशातून बाहेर काढणंही तितकच महत्वाचं आहे. नुसत बाहेर काढून मोकळं होण्यापेक्षा ह्या कायद्याला योग्य रित्या अजमावून योग्य व्यक्तींना न्याय देणं महत्वाचं आहे आणि मुस्लिम बांधवानी त्याचा गैरसमज करणंही तितकस योग्य नाही. सर्वानी एकच लक्षात घ्यायला हवं हा तोच भारत आहे, ज्या भारताने ३७० कलम आणि राम मंदिरसारख्या संवेदनशील निर्णयात संयमता दाखवली.  

ह्या हिंसेची दुसरी बाजू म्हणजे राजकारण, त्यात अर्थव्यवस्थेचा मोडलेला कणा लोकांच्या डोक्यातून निघून जावा हा हेतू असू शकतो. दुसरा मुद्दा म्हणजे मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण होणं हा असू शकतो. अजून एक प्रश्न अनुत्तरीत तो म्हणजे ह्या विस्तापितांचं पुनर्वसन आणि त्याचा भार कोणत्या राज्यांवर असणार? ईशान्य पासून सुरु झालेली हिंसा दिल्ली पासून ते इतर राज्यात पोहचली. हि धकधकणारी आगच देशाच्या प्रगतीची कोंडी नक्कीच वाढवतेय.

कायदा समजून घेणं जितकं महत्वाचं आहे तितकच मतलबाच राजकारण शांत करण महत्वाचं आहे.

डॉ. प्रशांत शिरोडे.

मी महाराष्ट्र बोलतोय..



वेगळं वाटलं ना थोडं.. असंच सगळ्या देशाला आणि माझ्या मराठी माणसाला पण वेगळं वाटतंय. त्याच कारण पण तेच सत्तेसाठी भुकेले माझ्या भूमीतले राजकारणी. राजकारणाची पूर्ण गरिमा संपवून टाकली.. मी सगळ्या देशाला राजकारण शिकवलं आणि आज माझ्याच शिकवणीवर बोट ठेवला गेला...

एक महिना झाला मी माझ्या प्रदेशाचा मालक होण्याची वाट बघतोय आणि त्या मुख्य पदाला गलिच्छ राजकारणाने काळिमा फासली. विशेष म्हणजे दिल्लीच्या हुकूमशहांना माझ्यावर हुकूमुत गाजवताना बघून मला खूप दुःख झाल, ज्यांनी राजकारणाचे धडे माझ्याकडून घेतले आणि तेच आता माझं राजकारण करतायेत. आज इतकी मत माझ्याकडे उद्या तितकी मत त्याच्याकडे, आम्ही इतके फोडले त्यांनी तितके पळवले, हे सर्व बघून तर मला चीड येत होती.

शब्दाला जगणारा माझा मराठी माणूस आज दिल्लीशाहीपुढे शब्दाला बदलला आणि युती आघाडीचं राजकारण जणू मुंबईच्या समुद्रात वाहून गेल्याच वाटलं आणि काहीतरी वेगळंच वाटलं. जे घडलं ते चांगल्यासाठीच घडलं असेल असच म्हणावं लागेल, कारण ह्या सत्तेच्या खेळात राष्ट्रपती राजवट एका रात्रीत हटवून राज्यपाल भल्या पहाटे शपथविधी हि आटपून घेतात. ह्या लपवाछपवी आणि घाणरेड्या राजकारणात माझ्या अब्रूची लख्तरे टांगल्याची मला खूप जाणीव झाली. मला माझ्यातला स्वाभिमान माझ्याच लोकांकडून विकला गेल्याची मोठी जाणीव झाली. लढणारा महाराष्ट्र, लपणारा महाराष्ट्र अशी माझी चर्चा माझ्या मनाला बोचत राहिली.

मला चिंता पडली माझ्या सामान्य मतदारांची कि पुढच्या वेळेस ते मतदानासाठी कितीपत उत्सुक असतील? तो तर माझ्या मनाला मोठा प्रश्नच आहे. नवीन सरकारने माझी गरिमा सांभाळुन माझ्या मराठी माणसाची आणि खास करून शेतकऱ्याची काळजी घ्यावी हीच इच्छा... आणि "जय महाराष्ट्र" ह्या भावनेतील स्वाभिमान टिकवाल हीच सदीच्छा...

डॉ. प्रशांत शिरोडे..

सत्ता ...


सकाळी झोपेतून उठल्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पाहून अनेकांची थोडी राहिलेली झोपच उडाली. झोप उडण्याच कारण म्हणजे रात्रीपर्यंत सत्तेची गणित जुळत असताना आज वेगळाच काहीतरी घडताना महाराष्ट्राला दिसतंय.

युती आणि आघाडी निवडणूकीपुरता होत, राजकीय पक्षांची खरी भूक हि सत्ता होती. सर्व एकाच गोष्टीसाठी धडपडत होते ती म्हणजे सत्ता. मग पक्षनिष्ठा, शब्दनिष्ठा हे सर्व काळाच्या ओघात संपण्यात जमा झालं. सत्ता एकच निष्ठा बाकी दुसरं काहीही नाही, हेच आताच्या राजकारणाचं फलित आहे. महाराष्ट्राचं राजकारण नेहमी महाराष्ट्रात राहील पण आताच्या राजकारणाला दिल्लीची काळी नजर लागली असं दिसून  येत. स्वाभिमान, अभिमान जणू मानपणाच्या गर्दीत हरवून गेलेत..

प्रत्येक पक्ष सत्तेचा भुकेला असताना सतेची गणित हि सत्यासाठी नाही तर स्वार्थासाठी आहेत हे म्हणणं तितकच योग्य ठरू शकत. महाराष्ट्राने ह्या एक महिन्यात अनेक समीकरणे बघितली, राष्ट्रपती लागवट पण बघितली आणि राहिलेलं अवेळी मुख्यमंत्रीपदाची शपथ हि बघितली. विशेष म्हणजे इतक्या सकाळी सरकारी काम आणि त्यात राज्यपालांकडे जाऊन शपथविधीही होणं आणि राष्ट्रपती राजवट पण मागे घेणं, हे सर्व काहीतरी अघटित झाल्यासारखं होत. कदाचित राज्यपालही ह्या घडामोडींचे प्यादे असतील, पण ते नसावेत म्हणजे लोकशाहीला काहीतरी अनुसरून झाल्यासारखं असेल.

अजून महाराष्ट्राला काय बघायला भेटत ते बघावच लागेल. कदाचित महाराष्ट्राला याची आतुरता न राहता महाराष्ट्राला ह्या राजकारणाची चीड येऊ शकते. राजकारणाचं काय होत ते होतच राहील पण ह्यातून खरंच शिकण्यासारखं आहे, ते म्हणजे सत्तेसाठी होणार राजकारण आपापसातले संबंध न बिघडवता ह्या गोष्टींना हलकंफुलकं घेणंच महत्वाचं आहे...

आता प्रतीक्षा महाराष्ट्राच्या नव्या राजकारणाची..

डॉ. प्रशांत शिरोडे..

सूत्र...



सूत्रांच्या माहितीनुसार किंवा विश्वसनीय सूत्रांनुसार किंवा खात्रीलायक सूत्रानुसार हे शब्द इलेक्ट्रॉनिक मीडियावर नेहमी ऐकू येतात, पण सध्याच महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तर ह्या सूत्रांनी राजकीय पक्षांपेक्षा जास्त काम केलेलं दिसत.

सूत्रांनी विश्वसनीय आणि खात्रीलायक होताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच नव्हे तर मंत्रिमंडळच बनवून टाकलं. युती आणि आघाडी पेक्षा सुंत्राचीच माहिती जास्त येत होती, ती इतकी कि नवीन होणारी आघाडी जणू सुत्रानीच घडवून आणली काय? असा प्रश्न सामन्यांना पडू लागला. नवीन होणाऱ्या आघाडीला सूत्रांनीच महाशिवआघाडी आणि नंतर महाविकासआघाडी नाव देऊन टाकलं. सूत्रांनी संभाव्य मंत्रिमंडळ बनवलं, सूत्रांनी अनेक फार्मुले बनवली.. खरंच ह्या सूत्रांच कुतुहूलच..

ह्या सूत्रांनी बाकी कमालच केली, बंददरवाजाआडच्या बैठकीतले विषय सुध्दा सूत्रांनी आम जनतेसमोर आणलीत. सूत्रांनी तर नेत्यांच्या मनातल्या गोष्टीसुध्दा ओळखून सांगून टाकल्या. सरकार स्थापण्यासाठी पाठिंब्याचं पत्र प्रत्यक्षात अजून भेटलं नाही पण खात्रीलायक सूत्रांनी ते पोहचल्याच सांगूनही टाकलं. सूत्रांनी अनेकांच्या भेटीगाठीही परस्पर घडवून आणल्या आणि त्या भेटीगाठीनमधले निर्णयही सांगून टाकले.

नक्की हे सूत्र कोण असतील? हा प्रश्न जणू सगळ्यांनाच पडला असेल.. कदाचित हा प्रश्न महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल? ह्या प्रश्नापेक्षा जास्त महत्वाचा झाला आहे. हि सूत्र म्हणजे त्या पक्षातील कोणी व्यक्ती असतील किंवा त्या ठिकाणी काम करणारे नौकर किंवा पत्रकारांच्या मनातलाच असू शकतो. जो असेल तो पण सूत्रांनी काम मात्र अगदी जोमानं केलं, क्षणभरासाठी सामान्यांच्या मनातील प्रश्नांना उत्तर देवून तात्विक समाधान करून टाकलं.

आता प्रतीक्षा सरकार बनण्याची आणि खात्रीलायक सूत्रांची माहिती विश्वसनीय होण्याची...

डॉ. प्रशांत शिरोडे..

खेळ मांडला...



महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हाच विषय सत्तेसाठी महत्वाचा ठरला.. निवडणुकीच्या आधी नेत्याची पक्षनिष्ठा खुंटीला टांगलेली बघितलेली असताना आता पक्षाचीच निष्ठा खुंटीला टांगलेली महाराष्ट्राने बघितली. एकंदर निष्ठा, प्रतिष्ठां ह्या राजकारणातील गोष्टी इतिहास जमा झाल्यासारखं दिसतंय..

युती आणि आघाडी जणू राजकीय परिस्थिती पाहून जुळवाजुळव करतायेत.. वैचारिक मतभेद असतील तर राजकीय मत एक होताना दिसतायेत. सत्ता केंद्रस्थानी असं महत्वाचं आहे आणि ते असावं कारण सत्तेचा उपयोग जसा होतो तसा दुरुपयोगही करता येतो हे मागील सरकारने राज्यात करून दाखवलं. सत्तेतून सामन्याचे प्रश्न सोडवण्यापेक्षा राजकारणातील चढाओढ कशी करता येईल ह्याकडे आवर्जून लक्ष दिल गेलं.

पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला शोभेसा निकाल महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत लागला. महाराष्ट्र जणू आता आमची मक्तेदारी आहे आणि आम्ही म्हणू तेच होईल अश्या दुनियेत असणाऱ्या लोकांना महाराष्ट्राने सत्तेच्या गणितापासून दूर ठेवलं. सत्तेचं गणित अपुरं पडत असताना सुद्धा आम्ही म्हणू तेच ह्या अविर्भावात असल्यामुळे सत्तेची चावी मागील सत्ताधाऱ्यांच्या हातून जाताना दिसतेय. मित्रपक्षाला ठरवलेली पद देण्यापेक्षा विरोधात बसणं महत्वाचं मानलं गेलं. ह्यातून प्रादेशिक पक्षांना कमी लेखण्याशिवाय दुसरी कोणतीही भावना दिसत नाही.

राज्यातला शेतकरी अवकाळी पावसाने होरपळला आहे पण ह्याची जाण राजकीय पक्षांना नाही कारण त्यांचा सत्तेचा खेळ काही संपताना दिसत नाही. राज्याच्या विस्कटलेल्या घडीला बसवण्यासाठी आता सरकारची गरज आहे. राष्ट्रपती लागवट राज्याला न परवडणारी आहे. सत्तेचं गणित जुळवताना राज्याने चांगले धडे दिले जेणेकरून कोणी राज्याला आपली मक्तेदारी समजणार नाही. ज्या राज्याने अनेक चांगली सरकार बघितली, आज तेच राज्य सत्तेसाठी, सरकारसाठी आस लावून बसलंय.

जी सत्ता नीती बिघडवताना दिसतेय, तीच सत्ता चांगल्या नीतीने राज्याच्या विकासाला गती देवो ह्याच सदभावना..

डॉ. प्रशांत शिरोडे..

ठाणेकरांनो.. माणूसकीसाठी ..


आई आणि बाळाचं नातं काही वेगळंच असत. जगाच्या पाठीवर वावरताना अगदी पोटातील नाळेपासून ते रोजच्या जगण्यापर्यंत हे नातं निराळच असत. असंच, अविनाश जाधवांच फेसबुक अकाउंट बघत असताना एका आईची आणि बाळाची मनाला धक्का लावून जाणारी पोस्ट बघितली..

बाळाची तब्येत बरी नसल्यामुळे त्याला हॉस्पिटल ऍडमिट केलं होत. एक महिना झाल्यानंतर त्याच बिल साडेतीन लाखापर्यंत झालं होत. ते कुटुंब ७० हजारापर्यंत बिल भरू शकत होत, हॉस्पिटलने आईला आणि बाळाला पुढचे १८ दिवस फक्त बाळाला दूध पाजण्यापुरतं १५ मिनटं भेटू दिल. पैश्यांसाठी बाळाचे आईवडील टाटा, गोपाळ शेट्टी, शाहरुख खान, सलमान खान अश्या मदत करणाऱ्या लोकांच्या ऑफिसला गेले पण त्यांना कुठूनही मदत भेटली नाही. नंतर ३ दिवस हॉस्पिटलने आईला बाळाला भेटू देण्याचं बंद केलं.

आईबापांचा जीव कासावीस झाला आणि कुठूनही मदत मिळत नसताना ते मतदीसाठी अविनाश जाधवांकडे पोहचले. अविनाश जाधवांनी कुठलाही वेळ न घेता सरळ हॉस्पिटल गाठलं आणि बाळाला स्वतःच्या हाताने हॉस्पिटल बाहेर आणून आईवडिलांच्या हाती सोपवलं. त्या आईवडिलांना हे सगळं बघून काय करावं आणि काय नाही असं झालं. आनंदाच्या भरात भरल्याडोळ्यानी आईवडीलांनी अविनाश जाधवांचे पायच धरले आणि आपसूकच बोलले तुम्ही आमच्यासाठी देव आहात. विशेष म्हणजे हे कुटुंब उत्तर भारतीय होत. हे मुद्दामून नमूद करण्याचं कारण माणूसकीसाठी ते काहीही न बघता धावून गेले.

माणुसकीसाठी कशाची पर्वा न करणाऱ्या अविनाश जाधवांना जर ह्याबद्दल विचारलं तर त्यांचं मत असत "सामान्य माणसावर अमानुष अत्याचार होत असेल तर तो मला सहन होत नाही. मी हाथ जरी उचलला तरी तो सामन्यानवर उचलला नाही. जिथे चुकीचं तिथेच आम्ही टोकाची भूमिका घेतो, शेवटी आम्ही माणूसच आहोत आणि आमच्या इतकी माणुसकी कोणी दाखवणार नाही हेही तितकंच खरं आहे. मी आजपर्यंत हे सर्व निस्वार्थपणे केलं. मला हीच सेवा प्रतिनिधी म्हणून करायची आहे.."

ठाणेकरांनो, माणूसकीसाठी आणि आपल्या हक्काच्या माणसासाठी अविनाश जाधवांमागे उभं राहणं आपली जबाबदारीच आहे..

डॉ. प्रशांत शिरोडे.

ठाणेकरांनो ... फेरीवाला..


एल्फीस्टन स्टेशनच्या चेंगराचेंगरीनंतर अमानुष लोकांचे हकनाक बळी गेले. ह्या घटनेमागे अनेक कारण होती, आणि त्यातलं एक कारण म्हणजे फेरीवाला.. ह्याच्या विरोधात राज ठाकरे यांनी मोर्चा काढला आणि फेरीवाला मुक्त रेल्वे स्टेशन परिसरासाठी मनसे रस्त्यावर उतरली. रेल्वे अधिकारी, पोलीस आणि संघटना यांची मिलीभगत ह्या फेरीवाल्याना पाठीशी घालत होती. राज ठाकरेंच्या आव्हानाला साथ देताना ठाणे रेल्वे स्टेशन फेरीवालामुक्त करण्यासाठी जो माणूस अग्रेसर होता तो म्हणजे "अविनाश जाधव"..

मध्यरेल्वेवरच सर्वात जास्त वर्दळीच स्टेशन म्हणजे ठाणे स्टेशन. सुमारे ४००-४५० फेरीवाल्यांच्या साखळीने ठाणे स्टेशनला घेरलं होत. सामान्य प्रवाश्याला लोकल इतकाच स्टेशन परीसरात जीव मुठीत घेऊन चालावं लागत होत. फेरीवाल्यांची दडपशाही वाढली होती, कदाचित त्यांच्यावर प्रशासनाचा हप्त्यांच्या मायेने आशीर्वाद होता. प्रवाशांचे होणारे हाल कोणाला दिसत नव्हते. मुंबई ठाणेसह सर्व उपनगरात हि दयनीय अवस्था होती.

ऐन दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी अविनाश जाधव आपल्या कार्यकर्त्यांसोबत ठाणे स्टेशन परिसरात जाऊन फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाविरुद्ध उतरला. बघता बघता स्टेशन फेरीवालामुक्त होण्यास सुरवात झाली आणि ती २-३ महिने व्यवस्थित राहिली आणि नंतर पुन्हा तीच परिस्थिती दिसू लागल्यानंतर पुन्हा आंदोलन केल्यामुळे आजपर्यंत स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त आहे. भाऊबिजेसारख्या सणाच्या दिवशी जनसामान्यांच्या सोयीसाठी आंदोलन करून दिवाळीसारख्या सणाच्या दिवसात चार दिवस तुरंगात काढणारा व्यक्ती म्हणजे "अविनाश जाधव".

अविनाश जाधवांना विचारलं तर त्यांचं मत असत "सामान्य माणूस घरातून निघताना जीव मुठीत घेऊन निघतो आणि स्टेशन परिसरात फेरीवाल्यांच्या गराड्यात अडकतो. सामान्य माणसाला मोकळा श्वास घेता यावा. चेंगराचेंगरी सारखा प्रकार होऊ नये. स्टेशन स्वच्छ व सुंदर व्हावं हि त्यामागची भूमिका आहे. कोणाच्या पोटावर पाय ठेवणं आमची संस्कृती नाही, पण जनतेचं रक्षण करण हि आमची प्राथमिकता आहे".

मग ठाणेकर विचार काय करतायेत? आपलं मत मोकळ्या श्वासासाठी, आपलं मत फेरीवालामुक्त स्टेशन परिसरासाठी..

आपलं मत अविनाश जाधवांनाच...

डॉ. प्रशांत शिरोडे.

ठाणेकरांनो... पुरग्रस्तांच्या मदतीसाठी..



ऑगस्ट महिन्यात सांगली कोल्हापूर ह्या पश्चिम महाराष्ट्राच्या भागात पावसाने थैमान घातलं आणि अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढलं. झोपलेलं सरकार, नियोजनशून्य कारभार, श्रेयाच राजकारण ह्याशिवाय काहीही दिसलं नाही. देश स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना हा पूरग्रस्त भाग स्वतःच्या जीवाला ह्या संकटातून स्वातंत्र्य करत होता. अचानक आलेल्या ह्या नैसर्गिक आपत्तीत होत्याच नव्हतं झालं. निसर्गाचा विकोप बघवत नव्हता. माणसं जीव मुठीत घेऊन जगण्यासाठीची खटाटोप करीत होते. सगळं सगळं काही भयानक होत.

महाराष्ट्राच्या अनेक भागातून मदतीचा ओघ सुरु होता. कोणी खाण्याच्या वस्तू, कोणी औषध तर कोणी कपडे पाठवत होत. सगळीकडे पाणीच पाणी असताना मदत पोहोचवणं तसं अवघड काम होत. शौर्याची भूमी जणू संकटाची भूमी झाली आणि तिला अवघ्या महाराष्ट्राची आस लागली. दिवसा मागून दिवस जात होते पण पाऊस काही थांबत नव्हता.. अनेक मदती पोहचल्या पण प्रत्यक्षात जावून मदत करणारे अगदी थोडे होते आणि त्यात अग्रभागी एक नाव होत ते म्हणजे "अविनाश जाधव".

०९-१० ऑगस्टला ठाण्यात मदतीची हाक देवून हा ध्येयवेडा माणूस, मराठी माणसाच्या मदतीसाठी स्वतः हि मदत घेवून सांगलीत पोहचला. मदत करणाऱ्यांपैकी जास्त लोक शहरी भागात पोहचले पण अविनाश जाधव आपल्या टीमसह खेड्या गावात पोहचले. सांगली तालुक्यातही अमनापूर आणि ब्रह्मनाळ गावांना प्रत्यक्ष मदत केली. ब्रह्मनाळ गावात बोट उलटून १७ लोकांचा मृत्यू झाला तिथे भेट देवून त्यांचं सांत्वन केलं. अश्या परिस्थितीत रात्रंदिवस पाच दिवसापासून काम करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांचं मनोबल वाढवलं. त्यानंतर इचलकरंजी आणि मिरजमधील गावांमध्ये मदत करून. कोल्हापुर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील टाकोडा गावात जाऊन लोकांची मदत करताना मनस्थिती समजून घेतली. नुसती मनस्थिती नाहीतर तिथल्या घरांचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली आणि त्यासाठी अजूनही काम करताना हा माणूस धडपडताना दिसतोय.

ठाणेकरांनो, ठाण्याच्या बाहेर जाऊन मदत करणारा हा माणूस ठाण्यातील संकटात नेहमीच कामी येतो. ह्या विषयावर अविनाश जाधवांना प्रत्यक्ष विचारलं तर ते म्हणता "माझा मराठी माणूस संकटात मला बघवला जात नाही, माझा मराठी माणूस त्याच्या भूमीत हक्काने सुखी रहावा, मग ते नैसर्गिक संकट असो वा मनुष्यनिर्मित संकट असो. कोणीही नसेल तरी मी नक्कीच असेल..". संकटात सुखदुःखात मदतीला धावून येणाऱ्या अविनाश जाधवांना सरकारात पोहचवण्याची जबाबदारी तुमचीआमची..

मग विचार काय करता? आपलं मत संकटात धावून येणाऱ्या ध्येयवेड्या माणसासाठी... आपलं मत मराठी माणसाच्या संरक्षणकर्त्यासाठी..

डॉ. प्रशांत शिरोडे..

ठाणेकरांनो



ठाणे म्हणजे दहीहंडी सणासाठी ओळखलं जाणार शहर. स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या प्रेरणेने ह्या सणाचं महत्व द्विगुणित झालं. ह्याच सणाच्या निम्मिताने एक-दोन महिने सराव करून मराठी तरुण एकत्र येतात. मराठी माणसाला एकत्र आणणारा हा मराठमोळा सण.. मराठी तरुणांना ह्या सणाची एक वेगळीच आतुरता लागलेली असते..

मराठमोळ्या ह्याच सणावर काही वर्षांपूर्वी निर्बंध आणण्यात आले. सगळीकडे हा सण इतिहासजमा होण्याचं वातावरण झालं. सत्तेत असणारे अकार्यक्षम झाले होते. न्यायालयाने ह्या सणावर जाचक अटी लादल्या. मराठी तरुण हतबल झाला. मराठी सणाची आणि मराठी तरुणाची हि हतबलता एका महाराष्ट्र सैनिकाने हेरली तो म्हणजे "अविनाश जाधव" ..

न्यायालयाचा आदेश असताना, मनात न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करण्याची कुठलीही इच्छा नसताना, हा माणूस दहीहंडी मराठी सण साजरा करण्यासाठी मैदानात उतरला. "जय जवान" सारख्या जगप्रसिद्ध गोविंदा पथकाने अविनाश जाधवांच्या तळमळीला होकार दिला आणि मनसेच्या माध्यमातून सर्वात मोठी दहीहंडी मोठ्या आनंदाने साजरी केली. ह्या दहीहंडीसाठी स्वतःच्या अंगावर अविनाश जाधवांनी केसही घेतली. पण, ह्या माणसाने मराठी सणासाठी घेतलेला वसा मोठ्या उत्साहाने पुढे नेला..

अविनाश जाधवांना त्यांचं मत विचारलं तर ते म्हणता "माझा मराठी तरुण पब मध्ये जाऊन लाखो पैसे खर्च करून आनंद नाही घेऊ शकत. माझ्या लाखो मराठी तरुणाच्या एकतेसाठी आणि आनंदासाठी दहीहंडीची संस्कृती मी विकोपाला जाऊ देणार नाही. माझ्या मराठी माणसाच्या आनंदासाठी माझं जीवन समर्पित आहे. दहीहंडी सणासह सर्व मराठी सण अजून उत्साहाने साजरे होतील आणि मी त्यात अग्रभागी असेल..".

*ठाणेकरांनो, मग विचार काय करता..? आता, आपलं मत मराठी सणासाठी, मराठी संस्कृतीसाठी..आपलं मतं अविनाश जाधवांना..*

डॉ. प्रशांत शिरोडे.

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...